जुन्या आपसी वादातून थरार; भर रस्त्यावर युवकाची तलवारीने हत्या

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: August 22, 2023 09:24 AM2023-08-22T09:24:26+5:302023-08-22T09:25:02+5:30

भर रस्त्यावर ही घटना घडल्याने परिसरात दहशत पसरली आहे.

youth was killed with a sword on the street in bhandara city | जुन्या आपसी वादातून थरार; भर रस्त्यावर युवकाची तलवारीने हत्या

जुन्या आपसी वादातून थरार; भर रस्त्यावर युवकाची तलवारीने हत्या

googlenewsNext

गोपालकृष्ण मांडवकर, लोकमत न्यूज नेटवर्क, भंडारा : पंधरा दिवसापूर्वी झालेल्या जुन्या वादातून एका २५ ते ३० वर्षाच्या युवकाला भर रस्त्यात तलवारीसारख्या शस्त्राने पोटात भोसकून आणि दगडविटांचे घाव घालून ठार केल्याची घटना भंडारा शहराचा भाग असलेल्या गणेशपूर रोडवरील जिल्हा परिषदेच्या मागे घडले घडली. अभिषेक कटकवार असे मृताचे नाव असून, तो शहरातील टप्पा मोहल्ला येथे राहणारा आहे.

रात्री सुमारे बारा वाजताच्या दरम्यान अभिषेक, त्याचा भाऊ आणि अन्य एक सहकारी येत असताना गणेशपूर रोडवरील सुमारे १५ जणांच्या टोळीने त्यांना गाठले. मुख्य महामार्गाकडे जाणाऱ्या रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेट समोरच त्याच्यावर घाव घालण्यात आले. या हल्ल्यात रक्तबंबाळ होऊन तो जागीच ठार झाला. या घटनेनंतर सोबत असलेल्या त्याच्या भावाने मोबाईलवरून नातेवाईकांना माहिती दिली. घटनेनंतर पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी दाखल होऊन प्रेत रुग्णालयात पाठवून शस्त्र ताब्यात घेतले. 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तलवारीसारख्या धारदार शस्त्रने त्याच्या पोटात वार करून नंतर दगड आणि विटांनी त्याच्या डोक्यावरही घाव घालण्यात आले. हल्ल्यामध्ये वापरलेली वीट आणि दगड घटनास्थळी पडून होते. रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता. सकाळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि रक्ताने माखलेली वीट, दगड, दोन तलवारी व अन्य वस्तू जप्त केल्या. 

जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी रात्रीच तीन युवकांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे. भर रस्त्यावर ही घटना घडल्याने परिसरात दहशत पसरली आहे.

Web Title: youth was killed with a sword on the street in bhandara city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.