युवक, महिलांनी घडविला स्वच्छतेतून कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:25 PM2017-12-31T23:25:27+5:302017-12-31T23:26:50+5:30

देश स्वच्छ व निर्मल व्हावा ही जबाबदारी शासनाने घेतली आहे. त्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत.

Youth, women were transformed into cleanliness | युवक, महिलांनी घडविला स्वच्छतेतून कायापालट

युवक, महिलांनी घडविला स्वच्छतेतून कायापालट

Next
ठळक मुद्देभंडाऱ्यात श्रमदानातून धर्मशाळेचे रुप पालटले: पालोरा येथे ग्रामस्थांसह विद्यार्थी, महिला सरपंचाचा पुढाकार

निश्चित मेश्राम।
आॅनलाईन लोकमत
पालोरा (चौ.) : देश स्वच्छ व निर्मल व्हावा ही जबाबदारी शासनाने घेतली आहे. त्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. ही जबाबदारी शासनाची असली तरी, ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाची आहे. हे कार्य पालोरा (चौ.) येथील महिला सरपंचांनी करून दाखविले. नवीन वर्षाच्या मुहुर्तावर गावात राहणाऱ्या शिक्षकांना, अंगणवाडी मदतनीस, सेविका, आशा अनेकांनी हाताशी घेऊन स्वत: व सदस्यांसह संपूर्ण गावाची स्वच्छता केली.
नवीन वर्षाची सुरुवात होताच अनेक नागरिक वेगवेगळे संकल्प करतात. मात्र येथील नवनिर्वाचित सदस्य अनिता गिऱ्हेपुंजे यांनी संपूर्ण गाव स्वच्छ करण्याचा संकल्प केला. सर्व सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थांसह गावातील सर्व रस्ते झाडून स्वच्छतेचा संदेश दिला. स्वच्छतेसाठी जे कधी घराबाहेर पडले नाही, असे अनेक चेहरे हातात झाडू घेवून स्वच्छता अभियानात सहभागी झाले. गावातील वॉर्डावॉर्डातील गल्ल्या, रस्ते संपूर्ण स्वच्छ करण्यात आले. प्रत्येक कुटुंबंनी आपल्या घरासमोरील घाण, केर, कचरा स्वत: स्वच्छ करावा अशी तंबी देण्यात आली. ग्रा.पं. सदस्यसह अनेक कर्मचारी यात सहभागी झाले. गावातील केरकचरा पेटविण्यात आला. गावात स्वच्छता बघायला मिळत आहे. प्रत्येक गावातील सरपंचांनी असा पुढाकार घेतल्यास गावांचा सर्वांगीन विकास होईल.
जिल्हा सामान्य रुग्णालयात श्रमदान
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयात बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवकाईकांना निवासाची सोय व्हावी यासाठी धर्मशाळेचे बांधकाम करण्यात आले. परंतु येथे सर्वत्र घाणीने विळखा घातला असल्याने तिथे जाण्याचीही कुणाची हिंमत होत नव्हती. शहरातील एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपच्या माध्यमातून काही तरुणांनी एकत्रित येत आज रविवारला या धर्मशाळेत स्वच्छता अभियान राबवून परिसराचा कायापालट केला.
शहरातील चांदणी चौक या अत्यंत दुर्लक्षित आणि संवेदनशील भागातील काही तरुणांनी एकत्रित येत जय शंभूनारायण ग्रूप तयार केला व लोकहिताच्या कामांचा विडा उचलला. रुग्णालयाच्या मागील सागर तलावाची नियमित स्वच्छता व देवीदेवतांच्या विसर्जनाच्या वेळी येणाºया भाविकांची काळजी घेण्याचे कार्य या ग्रूपचे सदस्य चोखपणे करतात. गोरगरीबांच्या मदतीला धावून जाण्यात ग्रूपचे सदस्य नेहमीच तत्पर असल्याचे दिसून येतात.
सध्या थंडीचे दिवस असल्याने रस्त्यावर निराश्रीत म्हणून जीवन जगणाऱ्यांना घोंगडी वाटप करून त्यांना मायेची उब देण्याचे पुण्यकर्मही या युवकांकडून करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात रुग्णांसोबत येणारे नातेवाईक व वऱ्हांड्यात उघड्यावर किंवा पायऱ्यांवर रात्र काढत असल्याचे चित्र रोजच पाहावयास मिळते.
रुग्णालय परिसरात धर्मशाळा असली तरी घाणीने बरबटल्याने ती पाय ठेवण्यायोग्यही नव्हती. या धर्मशाळेचा कायापालट करून तेथे नातेवाईकांना राहता यावे या दृष्टीने त्यांना गादी, ब्लँकेट, उशी नि:शुल्क उपलब्ध करून देण्याचा मानस शंभू नारायण ग्रूपच्या सदस्यांनी केला. याबाबतची सर्व माहिती जिल्हा शल्य चिकित्सक रवीशेखर धकाते यांना देण्यात आली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत युवकांना प्रोत्साहन दिले व आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. यानंतर आज रविवारला युवकांनी स्वयंस्फूर्तने एकत्रित येत धर्मशाळा परिसरात स्वच्छता अभियान राबविले. सकाळपासून स्वच्छतेसाठी राबणाºया हातांनी दुपारपर्यंत परिसरात पूर्णत: कायापालट घडवून आणला. याकरिता जिल्हा शल्य चिकित्सक व कर्मचाऱ्यांसह शंभू नारायण ग्रूृपचे सदस्य गोवर्धन निनावे, विशाल भुरे, निरंजन निनावे, राकेश खेडकर, शुभम आंबीलकर, नंदू उपरीकर, बंडू पराते, बाला निखाडे, चंदू पराते, रजत भुरे, गोलू सोनेकर, कुणाल बोकडे, कृपान तांडेकर, सोपान उपरीकर, राहुल शेंदरे, प्रदुन्य निनावे, रवी खेडकर यांच्यासह अनेक युवकांचे सहकार्य लाभले. या ग्रृपच्या पुढाकारातून धर्मशाळा परिसराला नवे रूप प्राप्त झाले आहे.
सर्वांना पाणी मिळण्यासाठी एक तासाचे भारनियमन
या भागात पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे व वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याच्या टाक्या लहान आहेत. पाणी मुबलक मिळावे म्हणून येथील धनाढ्यांनी टिल्लू पंप लावून पाणी चोरणे सुरु केले. किती लोकांवर कारवाई करणार म्हणून येथील सरपंचांनी पाण्याचा पुरवठा होताना कोणी टिल्लू पंप लावू नये म्हणून एक तास विद्युत गावातील बंद केला जात आहे. यात अनेकांनी विरोध दर्शविला. मात्र सर्वांना पाणी मिळावे म्हणून हे भारनियमन केले जात आहे.

कुणासोबत संबंध खराब होऊ नये व सर्वांना पाणी मिळावे म्हणून आम्ही ग्रा.पं. तर्फे एक तासाचे भारनियमन सुरु केले आहे. ज्या प्रमाणे पवनी नगरपरिषदचे मुख्याधिकारी माधवी मडावी यांनी संपूर्ण पवनी शहर स्वच्छ केले त्यांचे गुण अंगीकारून मी या कामाला सुरुवात केली आहे.
-अनिता गिऱ्हेपुंजे, सरपंच, ग्रा.पं. पालोरा

Web Title: Youth, women were transformed into cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.