तुडूंब भरलेल्या प्रकल्पांतील पाण्याचे नियोजन शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 06:00 AM2019-11-27T06:00:00+5:302019-11-27T06:00:48+5:30
भंडारा जिल्ह्यात गोसे प्रकल्पासह विविध मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प आहेत. यावर्षी झालेल्या पावसाळ्यात बहुतांश प्रकल्प तुडूंब भरले आहेत. गोसेसह इतर प्रकल्पातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ पावसाळ्यात प्रशासनावर आली होती. या अतिरिक्त पाण्यामुळे काही गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आता जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प पाण्याने तुडूंब आहेत.
मुखरु बागडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर (चौ.) : ल्ह्यिात यंदा दमदार पावसाने सर्व प्रकल्प तुडूंब भरले आहेत. पाण्याची कुठेही टंचाई भासणार नाही, अशी स्थिती आहे. परंतु या प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन केले जात नाही. त्यामुळे उन्हाळा आला की, अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. यासाठी पाणीटंचाईच्या कृती आराखड्याचा अभ्यास करून नियोजन करण्याची गरज आहे.
भंडारा जिल्ह्यात गोसे प्रकल्पासह विविध मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प आहेत. यावर्षी झालेल्या पावसाळ्यात बहुतांश प्रकल्प तुडूंब भरले आहेत. गोसेसह इतर प्रकल्पातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ पावसाळ्यात प्रशासनावर आली होती. या अतिरिक्त पाण्यामुळे काही गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आता जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प पाण्याने तुडूंब आहेत. या प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु प्रशासन केवळ पिण्यासाठी पाणी राखीव ठेवून इतर पाण्याबाबत कोणतेही नियोजन करीत नाही. पाटबंधारे विभाग सिंचनासाठी पाणी सोडते, परंतु त्या पाण्याचेही कोणते नियोजन नसते. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना पाणीच मिळत नाही.
आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून अशा तीन टप्प्यात पाणीेटंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात येते. भूजल सर्वेक्षण विभागाकडून तयार करण्यात आलेल्या या आराखड्यावर संबंधित विभागाचा अभिप्राय घेतला जातो. नंतर विभागीय आयुक्तांच्या स्वाक्षरीने अंतिम स्वरुप दिले जाते. दरवर्षीू ही प्रक्रिया पार पाडली जाते.
त्यावेळी प्रकल्पाच्या पाण्याचा विचार केला जातो. यावर्षी तुडूंब भरले असतानाही कुठेही नियोजन दिसत नाही. त्यामुळे अगदी नदीतिरावरील गावांसह अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण होते. त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाचे लाखो रुपये खर्च होते. त्यामुळे या पाण्याचा सदुपयोग करून पिण्यासोबतच शेतकºयांना सिंचनासाठी देण्याची गरज आहे. वरिष्ठांनी या प्रकरणी लक्ष ेदेऊन नियोजनाची गरज आहे.
उपसा सिंचन ठरू शकते जीवनदायी
लाखनी तालुक्यातील पागोरा, नेरला उपसा सिंचनचे पाणी चुलबंदसह नाल्यात सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मांगली बांध, मचारणा, जेवनाळा, कवडसी, खैरी आदी गावात याचा प्रत्यय आला. १२ पंपापैकी तीन पंपाने पाणी उपसा करून एका पाण्याने शेती धोक्यात येते ती टाळली जाऊ शकते. मार्चनंतर हे पाणी नदीनाल्यात सोडल्यास पिण्याच्या पाण्याचे वांधे होणार नाही. परंतु यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.