जिल्हा परिषद सदस्याला मारहाण

By admin | Published: March 27, 2016 12:16 AM2016-03-27T00:16:25+5:302016-03-27T00:16:25+5:30

ठेकेदारीच्या कामावरून उद्भवलेल्या भांडणाचे रूपांतर मारहानीत झाले. यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्याच एका जिल्हा परिषद सदस्याला शाळेत जावून अश्लील शिवीगाळ..

Zilla Parishad assaulted the member | जिल्हा परिषद सदस्याला मारहाण

जिल्हा परिषद सदस्याला मारहाण

Next

साकोली येथील घटना : काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली मारहाण
साकोली : ठेकेदारीच्या कामावरून उद्भवलेल्या भांडणाचे रूपांतर मारहानीत झाले. यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्याच एका जिल्हा परिषद सदस्याला शाळेत जावून अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना साकोली येथील एका शाळेत होळीच्या दिवशी घडली.
या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात झाली नसली तरी या प्रकरणाची परिसरात मोठी चर्चा आहे. त्याला धक्काबुक्की करीत मारहाण केली. एवढ्यावरच हे कार्यकर्ते शांत बसले नाही तर एकाने तर शाळेतील टेबल खुर्च्याही अस्ताव्यस्त केल्या. हा प्रकार पाहुन जिल्हा परिषद सदस्य व इतर शिक्षक घाबरले व त्यातील काहींनी सामंजस्याची भूमिका घेत प्रकरण मिटविले. या प्रकरणाची तक्रार महाराष्ट्र प्रदेश कमेटीकडे करणार असल्याची माहिती असून या प्रकरणाची परिसरात चर्चा आहे. त्या जिल्हा परिषद सदस्याला शिवीगाळ करून मारणारे काँग्रेसचे कार्यकर्ते कोण होते? याची निश्चित माहिती मिळू शकली नाही. (तालुका प्रतिनिधी)
 

Web Title: Zilla Parishad assaulted the member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.