ग्रामपंचायतमधील व पथदिव्यांचे विद्युत देयक जिल्हा परिषदेने भरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:16 AM2021-09-02T05:16:36+5:302021-09-02T05:16:36+5:30
३१ लोक ०१ आय मशीन साकोली : तालुक्यातील सर्व सरपंचांनी पुढाकार घेत ग्रामपंचायतमधील पाणीपुरवठा व पथदिव्यांचे विद्युत देयक जिल्हा ...
३१ लोक ०१ आय मशीन
साकोली : तालुक्यातील सर्व सरपंचांनी पुढाकार घेत ग्रामपंचायतमधील पाणीपुरवठा व पथदिव्यांचे विद्युत देयक जिल्हा परिषदेने भरावे, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन सेवासंघाचे अध्यक्ष पवनकुमार शेंडे यांच्या नेतॄत्वात देण्यात आले. या वेळी नयना चांदेवार, शालीक खर्डेकर, प्रेमकुमार गहाने, हरिश लांडगे, मुंडीपार, प्रल्हाद शेंदरे, उषा डोंगरवार, आशा लाडे, उशिका शेंडे, पुस्तकला सुधाकर उईके, गायत्री राधेश्याम टेंभुर्णे, मोहन लंजे, लीलाधर सोनावणे, हरिश्चंद्र दोनोडे, पुरुषोत्तम रुखमोडे, मुकेश कापगते, वनिता बोरकर, चंदा कांबळे, रवींद्र खंडाळकर आदी उपस्थित होते. वैश्विक जागतिक कोरोना महामारीसदॄश्य प्रकोप परिस्थिती उद्भवली आहे. दीड वर्षापासून आर्थिक, सामाजिक परिस्थिती बिकट झालेली आहे. ग्रामीण स्तरावर लॉकडाऊनमुळे आर्थिक टंचाई असल्याने टॅक्स देणे परवडत नाही. त्यातच ग्रामपंचायतीला जादा विद्युत देयके भरण्याचा मार सहन करावा लागत आहे.
कामधंदे, रोजगार ठप्प असल्याने ग्रामस्थ पंचायतीच्या कराचा भरणा वेळेवर भरू शकत नाहीत. सर्व स्वच्छता व आरोग्य सोयीसुविधांचा भुर्दंड पंचायत प्रशासनावर बसला आहे. अशात ग्रामपंचायतीला टॅक्स व सामान्य निधीतून विद्युत देयके भरण्याची वेळ आली. गाव अंधारात पडल्याने जनतेला रात्री बाहेर पडणे कठीण झाले आहे. तुटपुंज्या उत्पन्नातून, आर्थिक व्यवहारातून विद्युत देयक भरणे ग्रामपंचायतीसाठी तारेवरची कसरत आहे. ग्रामीण भाग व हा जंगलव्याप्त व राखीव व्याघ्र प्रकल्प अभयारण्य प्रभावक्षेत्र असल्याने सभोवताली हिंस्र प्राण्यांचा वावर आहे. यामुळे मानवी वाईट कृत्ये घडणे संभवनीय बाब आहे. जिल्हा परिषदेने अजून ग्रापंचायतीला ५० टक्के निधी पाणीपुरवठ्याचा पैसा वळता केलेला नाही. ग्रामपंचायत प्रशासन टप्प्याटप्प्याने भरणा करेल, असे निवेदनात आश्वस्त केले आहे. यामुळे शंभर टक्के शासन स्तरावर प्रस्ताव मंजूर करण्यात यावा व तात्पुरती देयके भरण्यास शिथिलता प्रदान करावी, या आशयाचे निवेदन देण्यात आले.