मुख्याध्यापकाच्या निलंबनावरून जिल्हा परिषद तापली

By admin | Published: March 11, 2017 12:23 AM2017-03-11T00:23:53+5:302017-03-11T00:23:53+5:30

तुमसर तालुक्यातील परसवाडा येथील पदवीधर शिक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक ए. एम. हलमारे यांच्या निलंबनाचा आदेश मुख्य कार्यपालन अधिकारी अहिरे यांनी आज काढला.

The Zilla Parishad was dissolved after suspension of Headmaster | मुख्याध्यापकाच्या निलंबनावरून जिल्हा परिषद तापली

मुख्याध्यापकाच्या निलंबनावरून जिल्हा परिषद तापली

Next

प्रकरण परसवाडा येथील शिक्षकाचे : सीईओंनी फिरविला निलंबनाचा आदेश
भंडारा : तुमसर तालुक्यातील परसवाडा येथील पदवीधर शिक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक ए. एम. हलमारे यांच्या निलंबनाचा आदेश मुख्य कार्यपालन अधिकारी अहिरे यांनी आज काढला. ही बाब लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जि.प. चे पदधिकारी व सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यामुळे निलंबनाचा आदेश रद्द करण्याची नामुष्की सीईओंवर ओढविली.
परसवाडा येथील पदवीधर शिक्षक हलमारे यांची बदली करण्यात आली होती. त्यांच्यावर गैरवर्तणुकीचा ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची जिल्हा परिषद शिक्षण विभागाने चौकशी केली. यात ते दोषी आढळून आल्याचा अहवाल शिक्षण विभागाने मुख्य कार्यपालन अधिकारी अहिरे यांना सादर केला. दरम्यान हलमारे यांनी बदली करावी अशी भूमिका तुमसर येथील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने लावून धरली. यामुळे शिक्षकाची इतरत्र बदली करण्यात आली. या प्रकरणामुळे ग्रामस्थांनी शिक्षक हलमारे यांची बाजू घेत त्यांची बदली रद्द करावी यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याची भूमिका घेवून आठवडाभर शाळा बंद पाडली. यावर तोडगा म्हणून शिक्षक हलमारे यांना परत शाळेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले.
आज तुमसर पंचायतची मासिक सभा होती. या सभेत शिक्षकाच्या निलंबनाची मागणी लावून धरत १४ मार्चपर्यंत कारवाई न केल्यास पंचायत समितीचे काम बंद पाडण्याचा ठराव घेतला. पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अहिरे यांनी शिक्षक हलमारे यांच्या निलंबनाचे आदेश काढले. शिक्षकाच्या बाजूने अख्ख गाव असताना निलंबनाचा आदेश दुपट्टीपणा असल्याचा आरोप जिल्हा परिषदच्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पदाधिकारी व सदस्यांनी केला. शिक्षकाचे निलंबन रद्द करावे या मागणीला घेवून जिल्हा परिषदेमध्ये जि.प. पदाधिकारी व सीईओ यांच्यात चर्चा झाली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव धनंजय दलाल यांनीही जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेवून सीईओंना निलंबन रद्द करण्याबाबत भूमिका मांडली. त्यानंतर काही तासापुर्वीच निघालेले निलंबन आदेश सीईओंनी थांबविले. दरम्यान यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ताठर भूमिका घेतल्याने सीईओंना त्यांनीच काढलेल्या निलंबनाच्या आदेशाला थांबविण्याची नामुष्की ओढविली. (शहर प्रतिनिधी)

सीईओ सापडले निलंबनाच्या कचाट्यात
दुपारच्या सुमारास शिक्षक हलमारे यांच्या निलंबनाचा आदेश सीईओ अहिरे यांनी काढला. तो तुमसर पंचायत समितीला प्राप्त झाला. दरम्यान राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निलंबन मागे घेण्याबाबदची भूमिका घेतली. यामुळे निलंबन आदेश काढणारे सीईओच या कचाट्यात अडकले. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला निलंबन मागे घेत असल्याचे सांगून जि.प. मधून काढता पाय घेतला. वृत्त लिहीपर्यंत निलंबन मागे घेण्यात आल्याचा आदेशावर सीईओ अहिरे यांची स्वाक्षरी झालेली नव्हती. होळीनिमित्त सीईओ गावाकडे निघून गेल्याने या निलंबनाच्या प्रकरणावरुन पडदा उठलेला नाही.

शिक्षण विभागात परसवाडा येथील शिक्षक हलमारे यांच्या प्रकरणाची चौकशी केली. यात ते दोषी आढळून आल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यानंतरही त्यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई ही चुकीची असल्याने काढण्यात आलेला निलंबनाचा आदेश थांबविण्यात आलेला आहे.
-राजेश डोंगरे
उपाध्यक्ष, जि.प. भंडारा

Web Title: The Zilla Parishad was dissolved after suspension of Headmaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.