जिंदगीभर एहसान नही भुलेंगे साहब...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 05:00 AM2020-05-23T05:00:00+5:302020-05-23T05:00:56+5:30
जवळपास १५ ते २० दिवस व्यवसाय केला अन् देशात कोरोना विषाणुचा वाढता प्रभाव दिसून आला. शासनाने जमावबंदी व संचारबंदीचे आदेश निर्गमीत करताच यांचा व्यवसायही बंद पडला. चप्राड येथील समाजमंदिरात वास्तव्य करु लागले. सुरुवातीच्या दिवसात जमा असलेल्या पैशातून संसाराचा गाडा चालविला. मात्र हाताला कामच नसल्याने अल्पावधीच उपासमारीची वेळ त्यावर आली.
दयाल भोवते।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदुर : लोखंडी हत्यारे बनवून विक्री करणे हा त्यांचा मुळचा व्यवसाय. मुळचे मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील असून दरवर्षी मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येऊन व्यवसाय करुन संसाराचा गाडा चालवित होते. मात्र यावर्षी कोरोना विषाणुच्या थैमानाने होत्याचे नव्हते झाले. काम तर बंदच पण पोटाचाही प्रश्न सुटेना. अशातच गावकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीने भारावून जात जाता जाता 'जिंदगीभर एहसान नही भुलेंगे साहब' म्हणत रवाना झाले. गाडी लोहार कुटुंब आपली आपबिती सांगाताना अनेकांचे डोळे पाणावले.
वाचकांना कथानक वाटावे अशी ही वास्तवदर्शी चित्र आहे. लाखांदूर तालुक्यातील चप्राड येथील चार महिन्यापुर्वी जवळपास होळीच्या सणाच्या दरम्यान मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील जवळपास १५ नागरीक बैलगाडीतून भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात दाखल झाले. तालुक्याच्या ठिकाणाहून लोखंड विकत घेऊन आणणे व त्यापासून शेतीसाठी लागणारी अवजारे तयार करुन विकणे हा त्यांचा मुळचा व्यवसाय.
जवळपास १५ ते २० दिवस व्यवसाय केला अन् देशात कोरोना विषाणुचा वाढता प्रभाव दिसून आला. शासनाने जमावबंदी व संचारबंदीचे आदेश निर्गमीत करताच यांचा व्यवसायही बंद पडला. चप्राड येथील समाजमंदिरात वास्तव्य करु लागले. सुरुवातीच्या दिवसात जमा असलेल्या पैशातून संसाराचा गाडा चालविला. मात्र हाताला कामच नसल्याने अल्पावधीच उपासमारीची वेळ त्यावर आली. त्यांनी बैलगाडीला असलेले बैल विकुन आपल्या संसाराचा गाडा चालविला. नंतर आपली समस्या गावातील पदाधिकाऱ्यांना सांगुन मदतीची विनवणी केली. गावातील नागरिकांनी जमेल ती मदत करुन त्यांच्या संसाराचा गाडा चालविण्यात हातभार लावला.
संसार सुरु असतांनाच लॉकडाऊन वाढतच असतानाचे पाहुन त्यांनी स्वगावी जाण्याचा निर्धार करीत मदतिला धावणाºया पदाधिकाºयांना सांगितले. पदाधिकाºयांनी त्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाकडून त्यांना स्वगावी जाण्याची परवानगी दिली. स्वगावी जात असतांना उपस्थीत नागरिकांचे डोळे पाणावले असतांना प्रत्येकाच्या तोंडातुन एकच शब्द बाहेर पडत होते 'जिंदगीभर एहसान नही भुलेंगे साहब....' याप्रमाणे अनेक मजूर कोरोनाच्या संकटात अडकले असून त्यांच्या मदतीसाठी हात सरसावत आहेत.