जि.प. कर्मचाऱ्यांच्या बदलीचे वेळापत्रक जाहीर
By admin | Published: May 6, 2016 12:32 AM2016-05-06T00:32:00+5:302016-05-06T00:32:00+5:30
जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांचे सार्वत्रिक बदल्यांचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले असून ६ ते १३ मे या कालावधीत बदल्या होणार आहेत.
६ ते १३ दरम्यान बदल्या : जिल्हा परिषद पदाधिकारी उपस्थित राहतील
भंडारा : जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांचे सार्वत्रिक बदल्यांचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले असून ६ ते १३ मे या कालावधीत बदल्या होणार आहेत. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समुपदेशन कार्यक्रम वेळापत्रकानुसार होईल. बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी वेळापत्राकानुसार हजर राहण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी दिल्या आहेत.
६ मे रोजी सकाळी १० ते २ या कालावधीत सामान्य प्रशासन विभाग, लघुपाटबंधारे विभाग, वित्त विभाग, बांधकाम विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, त्याच दिवशी दुपारी ३ ते ६ या वेळेत पंचायत विभागातील बदल्यांचे कार्यक्रम ठरविण्यात आला आहे.
१० मे रोजी सकाळी १० ते १२ पशुसंवर्धन आणि महिला व बालकल्याण विभाग, दुपारी १२ पासून आरोग्य विभाग, ११ मे रोजी सकाळी १० पासून शिक्षण विभाग माध्यमिक, १२ व १३ मे शिक्षण विभाग (प्राथमिक) असे बदल्यांचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. बदल्या करताना सर्वप्रथम नक्षलग्रस्त भागात तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून कार्यरत कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात येणार आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या संमतीने त्यांना पाहिजे त्याठिकाणी बदली देण्यात येणार आहे. सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षापेक्षा जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रशासकीय दृष्टिकोनातून बदली करण्यात येईल. शासन निर्णयानुसार प्राधान्यक्रमाने विनंती बदलीसुध्दा करण्यात येणार आहे. पक्षघाताने आजारी कर्मचारी, अपंग, हदयरोग, किडणीरोग, कर्करूग्ण, आजी माजी सैनिकांची पत्नी, विधवा, घटस्पोटीत, परित्यक्त्या, कुमारीका आणि वयाचे ५३ वर्ष पूर्ण करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना विनंती बदली करतांना पाच वर्षाची अट शिथील करण्यात आली आहे. प्रशासकीय बदलीत देखील सवलत देण्यात येणार आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यावर आक्षेप मागवून अंतिम यादी जिल्हा परिषद कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे.