जि.प. पदाधिकाºयांच्या दौºयावर आचारसंहितेचा ‘लगाम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 11:37 PM2017-09-12T23:37:18+5:302017-09-12T23:37:18+5:30

जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता १ सप्टेंबरपासून लागू झाली आहे. या आचारसंहितेतही जिल्हा परिषद पदाधिकाºयांनी त्यांच्या शासकीय वाहनाने दौरे सुरुच ठेवले होते.

Zip 'Restraint' of Code of Conduct at the office of the office bearers | जि.प. पदाधिकाºयांच्या दौºयावर आचारसंहितेचा ‘लगाम’

जि.प. पदाधिकाºयांच्या दौºयावर आचारसंहितेचा ‘लगाम’

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : जिल्हाधिकाºयांनी बजावले आदेश

प्रशांत देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता १ सप्टेंबरपासून लागू झाली आहे. या आचारसंहितेतही जिल्हा परिषद पदाधिकाºयांनी त्यांच्या शासकीय वाहनाने दौरे सुरुच ठेवले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आज जिल्हा परिषद प्रशासनाला पत्र बजावून पदाधिकाºयांच्या दौºयांवर ‘लगाम’ लावला आहे.
ग्रामीण विकासाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाºया जिल्हा परिषद ही ग्रामपंचायतचा महत्वाचा केंद्रबिंदू आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायतच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने १ सप्टेंबर पासून जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. असे असताना येथील पदाधिकाºयांनी त्यांचे शासकीय वाहन प्रशासनाकडे जमा न करता या वाहनातून शासकीय दौरे सुरुच ठेवले. यामुळे निवडणुकीच्या काळात सदर पदाधिकाºयांकडून वाहनाच्या माध्यमातून दौरा करून निवडणूक असलेल्या गावात किंवा लगतच्या गावात आदर्श आचार संहितेचा भंग होण्याची शक्यता नाकारता येण्याजोगी नाही. त्यामुळे प्रशासनाच्या आदर्श आचारसंहितेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, उपाध्यक्ष राजेश डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, समाजकल्याण सभापती नीळकंठ टेकाम, अर्थ व बांधकाम सभापती विनायक बुरडे व महिला व बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले हे जिल्हा परिषदेची धुरा सांभाळीत आहेत.
या पदाधिकाºयांना जिल्ह्याचा दौरा करण्याकरिता जिल्हा परिषद प्रशासनाने सर्वांना वाहन दिलेले आहे. मात्र जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागली असताना त्या पदाधिकाºयांनी वाहन शासनाकडे जमा न करता त्या वाहनातून अद्यापही दौरे सुरु आहेत.
जिल्ह्यात होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला आज सायंकाळी पत्र बजावले. या पत्रात त्यांनी जिल्हा परिषद पदाधिकाºयांना जिल्हा परिषद ते त्यांचे भंडारा येथील शासकीय निवासस्थान या दरम्यान सदर वाहनाचा वापर करण्याची त्यांचा मुभा दिली आहे. आज सायंकाळी प्राप्त झालेल्या पत्रामुळे जिल्हा परिषद पदाधिकाºयांचे नियोजित शासकीय दौºयांवर अंकुश येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आज सायंकाळी सामान्य प्रशासन विभागाला पत्र प्राप्त झाले. या पत्राच्या अनुषंगाने जिल्हा परिषदचे सर्व पदाधिकारी आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून १४ सप्टेंबरला शासकीय वाहन परत करतील.
-भाग्यश्री गिलोरकर, अध्यक्ष जि.प.भंडारा.

Web Title: Zip 'Restraint' of Code of Conduct at the office of the office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.