जि.प. शिक्षक युपीएससीत उत्तीर्ण
By admin | Published: July 6, 2015 12:31 AM2015-07-06T00:31:15+5:302015-07-06T00:31:15+5:30
तालुक्यातील कुडेगाव जिल्हा परिषद शाळेत कार्यरत संदीप गोपालदास मोहुर्ले या शिक्षकाने भारतीय लोकसेवा आयोगाची परिक्षा ऊत्तीर्ण केली आहे.
परिश्रमाचे चीज : संदीप मोहुर्ले कुडेगाव शाळेत कार्यरत
लाखांदूर : तालुक्यातील कुडेगाव जिल्हा परिषद शाळेत कार्यरत संदीप गोपालदास मोहुर्ले या शिक्षकाने भारतीय लोकसेवा आयोगाची परिक्षा ऊत्तीर्ण केली आहे. त्यांना ७३० वी रँक मिळाली आहे.
मूळचे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील रहिवाशी असलेले संदीप मोहुर्ले हे २००३ मध्ये डीएड शिक्षक म्हणून भंडारा जिल्ह्यातील कांद्री येथे रुजू झाले. त्यानंतर त्यांनी मुक्त विद्यापीठातून बी.ए., बी.एस.सी. उत्तीर्ण केले. त्यानंतर लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, उन्हाळ्याची सुटी आणि दररोज अभ्यास करुन केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. चौथ्या प्रयत्नात त्यांना यश आले. यासंदर्भात मोहुर्ले यांच्याशी संपर्क साधला असता, दिल्लीहून बोलताना ते म्हणाले, लोकसेवा आयोगाची परिक्षेविषयी ग्रामीण भागात नाहक गैरसमज आहेत. ग्रामीण असो की शहरी हा न्युनगंड विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही बाळगू नये. लोकसेवेची तयारी करण्याची तयारी असेल तर मनाशी दृढ निश्चय केला पाहिजे. यश हमखास मिळेल, असे ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)