सह्याद्रीच्या कुशीत वसलेले 'झिरी' देवस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 10:23 PM2018-02-12T22:23:34+5:302018-02-12T22:23:59+5:30

आयुध निर्माणी कंपनी परिसरालगत शहापूर मंडळ वनपरिक्षेत्र परिसरात असलेल्या सह्यांद्री भिमसेन पहाडीच्या पर्वतरांगामध्ये हिरव्या शालुने नटलेल्या कुशीत झिरी येथे भोळ्या शंकराच्या वास्तव्यामुळे धार्मिक महत्व प्राप्त झालेले आहे.

'Ziri' Devasthan situated in Sahyadri Kushit | सह्याद्रीच्या कुशीत वसलेले 'झिरी' देवस्थान

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले 'झिरी' देवस्थान

Next
ठळक मुद्देआज महाशिवरात्री : भाविकांची उसळणार गर्दी

आॅनलाईन लोकमत
जवाहरनगर : आयुध निर्माणी कंपनी परिसरालगत शहापूर मंडळ वनपरिक्षेत्र परिसरात असलेल्या सह्यांद्री भिमसेन पहाडीच्या पर्वतरांगामध्ये हिरव्या शालुने नटलेल्या कुशीत झिरी येथे भोळ्या शंकराच्या वास्तव्यामुळे धार्मिक महत्व प्राप्त झालेले आहे. येथे दरवर्षी विदर्भातील हजारो भाविक दर्शनाकरिता मुक्कामाने या ठिकाणी येतात.
भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गापासून शहापूरच्या दक्षिणेस चार किलोमीटर तर ठाणा पेट्रोलपंप याठिकाणाहून दक्षिणेस सहा किलोमिटर अंतरावर नांदोरा गावाशेजारी शहापूर मंडळ वन परिक्षेत्रामध्ये सह्यांद्री भिमसेन पहाडीच्या मतधोमध झिरी हे स्थान आहे. या परिसरात छोट्या छोट्या पहाडीच्या रांगा आहेत. पहाडीच्या रांगामध्ये भोले शंकर यांचे देवस्थान आहे. अलिकडेच घोषित जिल्हा पर्यटन यादीत या ठिकाणची नोंदी केली आहे.
महाशिवरात्री निमित्त पाच दिवसापर्यंत येथे जत्रेचे स्वरूप असतो. पुर्वी याठिकाणी भंडाºयाहून विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान आता भंडारा, शहापूर, ठाणा, जवाहरनगरहून खासगी वाहनांची वाहतूक वाढली आहे. ही वाहतूक यंत्रणा सांभाळण्यासाठी जवाहरनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नेवारे यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.
या ठिकाणचे एक वैशीष्ट आहे की जमिनीपासून १०० मीटर उंच अंतरावर पहाडीवरील दगड चिंपांमधून एक निर्मल पाण्याचा झरा सदैव बाराही महिने वाहन असतो. म्हणून या ठिकाणाला झिरी असे शब्द प्रयोग लावण्यात आले. या ठिकाणी दोन पाण्याचे कुंड आहेत. एकाचा वापर पिण्याकरिता तर दुसºया कुंडांचा वापर बाह्यवापराकरिता करण्यात येतो.
निसर्गाची अदभुत किमया दगडातून पाणी पहाडीच्या खालच्या नळाला पुरातन काळातील विहिर आहे, जी बाहुली नावाने प्रसिद्ध आहे. या पहाडीच्या कुशीमध्ये शिवमंदिर, राधाकृष्ण, अम्बादेवी, चवरागड, राम-लक्ष्मण, शिवपीड, गोरखनाथ, हनुमान, गणेश, शिवाजी आणि दर्शनालू करिता विशालकाय या वृक्षाखाली एक सभा मंडप आहे. या ठिकाणी शिवरात्रीच्या पर्वावर १३ फेब्रुवारी पासून पाच दिवसाची यात्रा आयोजित केली आहे.
यात्रेकरू करीत सुलभ शौचालयाची सार्वजनिक व्यवस्था करण्यात आलेली नाही. याकरिता शासनाने याकडे जातीने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

Web Title: 'Ziri' Devasthan situated in Sahyadri Kushit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.