इयत्ता : १० वी, विषय : हिंदी संपूर्ण (लोकभारती) सन २०१८-१९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 04:20 PM2019-02-18T16:20:12+5:302019-02-18T16:26:56+5:30
इयत्ता : १० वी, विषय : हिंदी संपूर्ण (लोकभारती) सन २०१८-१९ -कृतिपत्रिका मार्च २०१९पासून सुरु होणाऱ्या एस. एस. सी. ...
इयत्ता : १० वी, विषय : हिंदी संपूर्ण (लोकभारती) सन २०१८-१९ -कृतिपत्रिका
मार्च २०१९पासून सुरु होणाऱ्या एस. एस. सी. बोर्ड परीक्षेचा पॅटर्न यापूर्वीच्या परीक्षांपेक्षा वेगळा आहे. आता प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका येणार असून, या कृतिपत्रिका सोडविताना त्याचे स्वरुप समजून घेतले तर कृतिपत्रिका सोडविणे विद्यार्थ्यांना अधिक सोपे जाईल. खरे तर इयत्ता पाचवीपासूनच विद्यार्थी कृतिपत्रिकांचा सराव करत आले आहेत. परंतु बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेला पहिल्यांदाच १०० गुणांची कृतिपत्रिका येणार आहे.
त्यामुळे साहजिकच विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या मनात कुतूहल तसेच साशंकताही निर्माण झाली आहे. ही साशंकता दूर करण्यासाठी आपण कृतिपत्रिकेचे स्वरुप समजून घेतले तर नक्कीच आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाल.
हिंदी संपूर्ण (लोकभारती) हा द्वितीय भाषा म्हणून अभ्यासक्रमात अंतभूर्त असलेला एक विषय आहे. या विषयाची कृतिपत्रिका १०० गुणांची आहे. आज आपण संपूर्ण हिंदी (लोकभारती) या विषयाचे स्वरुप समजून घेऊ.
कृतिपत्रिकेचे ५ भागात विभाजन केले आहे.
१) गद्य विभाग - २४ अंक
कृ ती आकलन कृ ती आकलन कृ ती शब्दसंपदा अभिव्यक्ती
अ (पठित) २ + २ + २ + २ = ८ अंक
आ (पठित) २ + २ + २ + २ = ८ अंक
इ (अपठित) २ + २ + २ + २ = ८ अंक
२) पद्य विभाग - १८ अंक
कृ ती अ (पठित) - आ. कृ ती - २ + शब्दसंपदा - २ + सरल भावार्थ - २ = ६ अंक
आ (पठित) - पद्यविश्लेषण -
१) रचनाकार का नाम - ०१ )
२) विधा का नाम - ०१ )
३) पसंद की पंक्तियाँ - ०१ ) ६ अंक
४) पसंद होने का कारण - ०१ )
५) रचना से प्राप्त संदेश/प्रेरणा - ०२ )
कृ ती इ (अपठित) - आ. कृ ती - २ + शब्दसंपदा - २ + सरल भावार्थ - २= ६ अंक
३) पूरक पठन - ०८ अंक
कृ ती अ (पठित गद्य) - आकलन कृ ती - २ + अभिव्यक्ती - २ = ०४ अंक
आ (पठित पद्य) - आकलन कृ ती - २ + अभिव्यक्ती - २ = ०४ अंक
४) भाषा अध्ययन (व्याकरण) - १८ अंक
१) शब्दभेद - (पहचानना और वाक्य में प्रयोग) - ०२ अंक
२) अव्यय - (पहचानना और वाक्य में प्रयोग) - ०२ अंक
३) काल परिवर्तन - ०२ अंक
४) संधि - (पहचानना, विच्छेद करना, संधि शब्द बनाना) - ०२ अंक
५) वाक्यभेद - (अर्थ एवं रचना के अनुसार पहचानना
तथा परिवर्तन करना) - ०२ अंक
६) मुहावरे - (अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग एवं चयन) - ०२ अंक
७) वाक्य शुद्ध करना - ०२ अंक
८) सहायक क्रीया पहचानना - ०१ अंक
ु ९) प्रेरणार्थक क्रीयारुप लिखना - ०१ अंक
१०) कारक (पहचानना तथा भेद लिखना) - ०१ अंक
११) विरामचिह्न (वाक्य में प्रयोग) - ०१ अंक
५) उपयोजित लेखन - ३२ अंक
अ ) १) पत्रलेखन (औपचारिक / अनौपचारिक) - ५ अंक
२) गद्य आकलन (परिच्छेद पर आधारित
(५) पाँच प्रश्न तैयार करना) - ५ अंक
आ) १) वृत्तांत लेखन (६० से ८० शब्दों में) - ५ अंक
२) विज्ञापन लेखन (५० से ६० शब्दों में) - ५ अंक
३) कहानी लेखन (लगभग ७० से ८० शब्दों में) - ५ अंक
(मुद्दे / सुवचन / शब्दों के आधार पर, तीनों में से एक ही प्रकार)
इ) १) निबंध लेखन - - ७ अंक
(दो मेंं से किसी एक विषय पर लगभग ८० से १०० शब्दों में)
गद्य व पद्य विभागातील शब्दसंपदा कृ तीत समाविष्ट घटक -
(अनेकार्थी शब्द, शब्द - युग्म, समानार्थी, पर्यायवाची शब्द, विलोम शब्द, उपसर्ग, प्रत्यय अनेक शब्दों के लिए एक शब्द, कठिन शब्दों के अर्थ, लिंग, वचन, विरामचिह्न, कृं दत, तद्धित, तद्भव, तत्सम तथा विदेशी शब्द आदि पुछे जाते हैं।)
विद्यार्थ्यांनी सराव करत असताना वरील सर्व घटकांचा अभ्यास करावा. त्यामुळे त्यांना शब्दसंपदा कृ ती सोडविणे सोपे जाईल. आकलन व अभिव्यक्ती या कृ तींची तयारी करत असताना पाठ्यपुस्तकाचे तीन ते चार वेळा वाचन करावे. स्वमत अभिव्यक्तीची कृ ती ही दैनंदिन व्यवहारातील समस्या, विज्ञान, पर्यावरण, प्रदूषण यांसारख्या विषयावर विचारली जाते. विद्यार्थ्यांनी विषयाचे आकलन करुन ८ ते १० वाक्यात आपले अनुभव / अनुभूती मांडायचे आहे.
पद्य विभागात पद्य विश्लेषण हा नवीन भाग आहे. विद्यार्थ्यांनी यांची तयारी करताना पाठ्य पुस्तकातील कवितांचा अर्थ समजून घ्यावा. पद्याचे लेखक / कवी, पद्याचा प्रकार (विधा), पद्यातील काही ओळी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तसेच त्या पद्यातून प्राप्त होणारा संदेश / प्रेरणादेखील समजून घ्यावी. कारण या कृतीत पाठ्यपुस्तकातील कवितेचे नाव दिले जाते व त्या पद्याचे विश्लेषण करायचे आहे.
व्याकरण व उपयोजीत लेखन या विभागात पूर्वीप्रमाणेच कृ ती दिल्या जातात. फक्त पत्रलेखनाचे स्वरुप बदलले आहे.
पत्रलेखनाचे बदललेले स्वरुप (औपचारिक पत्राचे स्वरुप)
दिनांक : ................
प्रति,
...............
...............
विषय : ...........................................................
संदर्भ : ............................................................
महोदय,
विषय विवेचन : ..................................................
...........................................................................
...........................................................................
भवदीय/ भवदीया,
नाम : ................
पता : ................
.......................
ई-मेल आईडी : ....................................
(पूर्वी लिफाफा तयार करण्याची पद्धत होती. ती पद्धत बंद होऊन ई-मेल आईडी लिहिण्याची पद्धत आली आहे.)
विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना मनावर कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता शांत मनाने जावे. प्रश्नपत्रिकेपेक्षा नक्कीच कृ तिपत्रिका सोपी आहे. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे. कृतिपत्रिका सोडविताना शक्यतो क्रमाने सोडवावी.
- श्री. वाल्मिक सेल्या वळवी
(सहाय्यक शिक्षक)
फाटक हायस्कूल, रत्नागिरी