इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:- मराठी, घटक -विशेषण व क्रियापद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 01:34 PM2019-01-09T13:34:36+5:302019-01-09T13:35:15+5:30
अकराव्या होडीला बांधलेली बारावी सामानाची होडीदेखील छान चालली आहे, वाक्यात अकराव्या, बारावी, छान ही विशेषणे आहेत.
लेख क्र. 9 विषय :- मराठी : घटक -विशेषण व क्रियापद
सोडविलेले प्रश्न-
(1) पुढील वाक्यातील विशेषणांची संख्या किती?
अकराव्या होडीला बांधलेली बारावी सामानाची होडीदेखील छान चालली आहे. (2018)
(1) तीन (2) चार (3) दोन (4) पाच
स्पष्टीकरण : दिलेल्या वाक्यात अकराव्या, बारावी, छान ही विशेषणे आहेत.
म्हणून पर्याय क्र. 1 बरोबर.
(2) पप्पू चौथ्या मजल्यावर रहायचा या वाक्यातील विशेषण ओळखा.
(1) पप्पू (2) चौथ्या (3) मजल्यावर (4) रहायचा
(3) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रामाणिक मुले सर्वांना आवडतात.
(1) नाम (2) सर्वनाम (3) विशेषण (4) क्रियापद
स्पष्टीकरण : वरील वाक्यात मुलांविषयी विशेष माहिती सांगणारा प्रामाणिक हा शब्द विशेषण आहे.
(4) गटातील वेगळा शब्द ओळखा.
(1) हसरा (2) गोड (3) शौर्य (4) काळा
(5) मी सुंदर चित्र रेखाटले, या वाक्यातील क्रियापद कोणते आहे.
(1) मी (2) सुंदर (3) चित्र (4) रेखाटले
स्पष्टीकरण : दिलेल्या वाक्यात क्रिया दर्शविणारा शब्द रेखाटले हा आहे. म्हणून पर्याय क्र. 4 क्रियापद आहे.
(6) असिया उद्या सहलीला जाईल, या वाक्यातील क्रियापद ओळखा.
(1) जाईल (2) सहलीला (3) उद्या (4) असिया
(7) गटातील वेगळा शब्द ओळखा.
(1) गा (2) ना (3) ला (4) खा
(8) दिलेल्या वाक्यात योग्य क्रियापद निवडून वाक्य अर्थपूर्ण बनवा.
वाक्य : उद्या आम्ही मुले सुंदर गाणे.......
(1) खाणार (2) गातो (3) गाणार (4) गातात
नमुना प्रश्न :-
(1) पुढील वाक्यातील क्रियापद ओळखून त्याच्या पर्यायाचा वर्तुळ रंगवा.
वाक्य : सुंदर झाले आता जेवण सगळे.
(1) आता (2) जेवण (3) सगळे (4) झाले
(2) पुढील पर्यायातील क्रियापद निवडा.
(1) लाच (2) वाच (3) काच (4) पाच
(3) राजूने सुरेल गाणी गाऊन श्रोत्यांना खूश केले, या वाक्यातील विशेषण कोणते?
(1) मने (2) सुरेल (3) खूश (4) श्रोत्यांना
(4) असिया कविता पाठ करते, या वाक्यातील क्रियापद कोणते?
(1) असिया (2) कविता (3) पाठ (4) करते
(5) तनिष्का हुशार आहे म्हणून ती गुरूजींना आवडते, या वाक्यातील विशेषण सांगा.
(1) तनिष्का (2) हुशार (3) म्हणून (4) आवडते
(6) आपण नेहमी करावा प्रयत्न, या वाक्यातील क्रियापद ओळखा.
(1) आपण (2) प्रयत्न (3) करावा (4) नेहमी
(7) वेगळा शब्द कोणता ते निवडा.
(1) खाणे (2) बोलणे (3) दाणे (4) चालणे
(8) एखाद्या वाक्यात नामाबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी काय वापरतात?
(1) क्रियापद (2) विशेषण (3) सर्वनाम (4) नाम
(9) पुढील वाक्यातील विशेषण सांगा
पाऊस पाणी भरपूर झाले
(1) भरपूर (2) पाऊस (3) पाणी (4) झाले
(10) एक वृध्द स्त्री पुढे आली. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
(1) नाम (2) सर्वनाम (3) विशेषण (4) क्रियापद
(11) ऐपतीच्या मानाने करावा खर्च, या वाक्यातील क्रियापद कोणते?
(1) खर्च (2) करावा (3) मानाने (4) ऐपतीच्या
(12) वाचतो मी पुस्तक कधी तरी, या वाक्यातील क्रियापद कोणते?
(1) वाचतो (2) मी (3) पुस्तक (4) कधी तरी
(13) वाघ हा हिंस्त्र प्राणी आहे, या वाक्यातील विशेषण ओळखा
(1) हिंस्त्र (2) वाघ (3) प्राणी (4) आहे
(14) वेडात मराठे वीर दौडले सात, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सांगा.
(1) नाम (2) सर्वनाम (3) विशेषण (4) क्रियापद
(15) शिवरायांचे डोळे तेजस्वी होते, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सांगा
(1) नाम (2) सर्वनाम (3) विशेषण (4) क्रियापद
(16) हिरवी : पाने तसेच ............ : फळे
(1) रसाळ (2) उंच (3) गोरी (4) सुवासिक
(17) ‘हिरवी झाडे हेच माझे खरे मित्र’, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सांगा.
(1) सर्वनाम (2) नाम (3) विशेषण (4) क्रियापद
(18) शब्दगटातील वेगळा शब्द कोणता?
(1) पडले (2) जिंकले (3) येणार (4) दोन
(19) तन्वीने....... फळे खाल्ल्यामुळे तिची तब्येत बिघडली, या वाक्यातील रिकाम्या जागी योग्य विशेषण निवडा.
(1) नासकी (2) टपोरे (3) गोड (4) निवडक
(20) रबरी चेंडू भिंतीवर आदळला, या वाक्यातील ‘आदळला’ या शब्दाची जात कोणती?
(1) नाम (2) सर्वनाम (3) क्रियापद (4) विशेषण
उत्तरसूची :-
(1) 4 (2) 2 (3) 2 (4) 4 (5) 2
(6) 3 (7) 3 (8) 2 (9) 1 (10) 3
(11) 2 (12) 1 (13) 1 (14) 4 (15) 3
(16) 1 (17) 3 (18) 4 (19) 1 (20) 3
संकलक : तारीश आत्तार
जि. प. शाळा, खरशिंग, ता. कवठेमहांकाळ