इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय : बुध्दिमत्ता चाचणी, घटक- गटाशी जुळणारे पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 10:34 AM2019-01-25T10:34:40+5:302019-01-25T10:41:46+5:30
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय : बुध्दिमत्ता चाचणी, लेख क्र. 23, घटक- गटाशी जुळणारे पद, उपघटक - शब्दसंग्रह, या घटकामध्ये प्रश्नामध्ये काही शब्द दिलेले असतात. त्याच्या संबंधित शब्द पर्यायातून निवडायचा असतो.
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय : बुध्दिमत्ता चाचणी, लेख क्र. 23, घटक- गटाशी जुळणारे पद, उपघटक - शब्दसंग्रह
महत्त्वाचे मुद्दे -
- या घटकामध्ये प्रश्नामध्ये काही शब्द दिलेले असतात. त्याच्या संबंधित शब्द पर्यायातून निवडायचा असतो.
- फळे, भाज्या, नदी, रंग, महान व्यक्ती, ऋतू, महिने, क्रिया, भाषा, राज्य, दिशा, प्राणी, देश, राज्य, जिल्हा पदार्थ, अवयव, पक्षी, वाहने, पर्वत, डोंगर, गड-किल्ले, जोडशब्द, विविध कामे ३० सारख्या बाबीवरती प्रश्न विचारले जातात.
नमुना प्रश्न :
पुढील प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा.
(1) मोठे आतडे, जठर, लहान आतडे (2017)
(1) ग्रासिका (2) श्वासपटल (3) हृदय (4) वृक्क
स्पष्टीकरण- मोठे आतडे, जठर, लहान आतडे हे पचनसंस्थेचे भाग आहेत. म्हणून पर्यायातील ग्रासिका हे या गटाशी जुळणारे पद आहे.
(2) मेंदू, फुफ्फुसे, हृदय........ (2018)
(1) जीभ (2) हात (3) यकृत (4) पाय
स्पष्टीकरण- आंतरिंद्रिये- मेंदू, फुफ्फुसे, हृदय म्हणून यकृत गटाशी जुळेल.
(3) वात, वायू, पवन...........
(1) अनल (2) समीर (3) समर (4) वारू
स्पष्टीकरण- वात, वायू, पवन हे वाऱ्याविषयी समानार्थी शब्द आहेत, म्हणून समीर हे पद जुळेल.
(4) तंबोरा, सतार, वीणा, गिटार............
(1) तबला (2) सनई (3) संतूर (4) मृदंग
स्पष्टीकरण- तंबोरा, सतार, वीणा, गिटार ही तंतुवाद्ये आहेत. म्हणून संतूर पर्याय जुळेल.
(5) मार्च, मे, आॅक्टोबर..............
(1) जुलै (2) एप्रिल (3) फेब्रुवारी (4) जून
स्पष्टीकरण- मार्च, मे, आॅक्टोबर हे महिने 31 दिवसांचे असतात. म्हणून जुलै हा पर्याय येईल.
स्वाध्याय :
(1) विटा, सिमेंट, लोखंड.............
(1) कपडे (2) बूट (3) घर (4) खडी
(2) तीळ, भुईमूग, जवस...............
(1) मूग (2) मटकी (3) करडई (4) सोयासॉस
(3)गणेशउत्सव, अंगारकी संकष्टी, गोपालकाला...............
(1) होळी (2) संक्रांत (3) जन्माष्टमी (4) वटपौर्णिमा
(4) आवळा, जांभूळ, आंबा................
(1) पपई (2) बिब्बा (3) पेरू (4) कलिंगड
(5) गोदावरी, कृष्णा, तापी..................
(1) कळसूबाई (2) हिमालय (3)भीमा (4) खिंड
(6) आंबोळी, इडली, डोसा..........
(1) जिलेबी (2) मोदक (3) मिसळ (4) भाकरी
(7) शिंगाडा, जलपर्णी, पानकणीस.............
(1) गुलाब (2) कमळ (3) चाफा (4) जाई
(8) तांबडा, हिरवा, निळा.............
(1) काळा (2) जांभळा (3) आकाशी (4) लाल
(9) अडीच, दीड, अर्धा...............
(1) दोन (2) पावणेतीन (3) साडेचार (4) दहा
(10) संताजी, तानाजी, मदारी..........
(1) राजाराम (2) बाजीप्रभू (3) घोरपडे (4) सिद्दी
(11) सिंधुदुर्ग, विजयदुर्ग................
(1) जंजिरा (2) रायगड (3) तोरणा (4) प्रतापगड
(12) पंढरपूर, सोलापूर, नागपूर............
(1) कोल्हापूर (2) हरिपूर (3) शिवापूर (4) कराड
(13) शिंगरू, वासरू, करडू.............
(1) वाघ (2) बछडा (3) हरिण (4) शेळी
(14) गणपती, गज, गजानन..........
(1) लंबोदर (2) शिव (3) माता (4) कृष्ण
(15) तबला, डमरू, ढोल.............
(1) सनई (2) नगारा (3) संतूर (4) तंबोरा
उत्तरसूची :-
(1) 4 (2) 3 (3) 3 (4) 2 (5) 3 (6) 1 (7) 2 (8) 2 (9) 3 (10) 2 (11) 1 (12) 1 (13) 2 (14) 1 (15) 2
- तारीश आत्तार
संकलक : खरशिंग, ता. कवठेमहांकाळ, जिल्हा परिषद शाळा