इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-मराठी, घटक - अलंकारिक शब्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 05:09 PM2019-02-04T17:09:10+5:302019-02-04T17:17:11+5:30
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-मराठी, घटक - अलंकारिक शब्द, अकलेचा कांदा- मुर्ख माणूस * अरण्यरुदन- ज्याचा उपयोग नाही, असे कृत्य
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-मराठी, घटक - अलंकारिक शब्द
महत्त्वाचे शब्द : -
- अकलेचा कांदा- मुर्ख माणूस * अरण्यरुदन- ज्याचा उपयोग नाही, असे कृत्य
- ओनामा- सुरुवात * उंबराचे फूल - दुर्मिळ वस्तू
- खडाष्टक- जोरदार भांडण * गुळाचा गणपती- मंदबुध्दी
- टोळभैरव- नासाडी करणारे लोक
- पांढरा परीस- लबाड * मृगजळ- केवळ आभास
- लंबकर्ण- बेअकली * शेदाड शिपाई- भित्रा
- सव्यसाची- उलटसुलट काम करणारा
- बावनकशी सोने- अतिशय प्रामणिक मनुष्य
- तुळशीत भांग- चांगल्या घराण्यात वाईट व्यक्ती जन्मणे.
- त्राटिका - कजाग बायको
- पंक्तीप्रपंच- पक्षपात
- तिरसिंगराव- तिरसट माणूस
- नखशिखांत- सर्व शरीरभर
- मेषपात्र- कर्तृत्वशून्य
- लोणकढी- खोटी बातमी
- सतीचे वाण- दृढ निश्चय
नमुना प्रश्न :-
(1) बिनभाड्याचे घर या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ सांगा
(1) शाळा (2) घराला भाडे नसणे (3) तुरुंग (4) मंदिर
(2) सुळावरची पोळी या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा.
(1) जीव धोक्यात घालणारे काम (2) उंच वस्तू (3) खाण्याचा पदार्थ (4) अशक्य काम
(3) खूप श्रीमंत या अर्थाचा अलंकारिक शब्द शोधा.
(1) गर्भश्रीमंत (2) नवकोट नारायण (3) कर्णाचा अवतार (4) देवमाणूस
(4) जमदग्नी- रागीट माणूस तसे मदनाचा पुतळा -
(1) उदार माणूस (2) भांडखोर माणूस (3) खूप देखणा (4) श्रीमंत माणूस
(5) गळ्यातला ताईत या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता?
(1) अतिशय सुंदर पुरुष (2) अत्यंत प्रिय व्यक्ती (3) गरीब स्वभावाचा मनुष्य (4) अतिशय झोपाळू
(6) कसलीही पारख नसलेला याअर्थी असणारा अलंकारिक शब्द खालीलपैकी कोणता?
(1) गाजरपारखी (2) गारगोटी (3) अगडबंब (4) गाजरभोपळा
(7) खालील पर्यायातून अलंकारिक शब्दाची चुकीची जोडी शोधा.
(1) नवकोट नारायण-अतिशय श्रीमंत (2) सांबाचा अवतार- भोळा माणूस
(3) वामनमूर्ती- ठेंगणी व्यक्ती (4) अकलेचा खंदक- निष्ठूर मनाचा
(8) घरात बसून राहणारा-
1) मायेचा पूल (2) घर कोंबडा
(3) गळ्यातला ताईत (4) अपशकुनी
(9) आरंभ करणे या शब्दसमूहासाठी कोणता अलंकारिक शब्द वापरतात?
(1) प्रारंभ (2) श्रीगणेशा
(3) मूळवद (4) खडास्टक
(10) अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा.
मचाण-
(1) बांबूचा मंडप (2) उंचावर बांधलेला मंडप
(3) पाण्यावरचे घर (4) गवताचे घर
(11) खटकेबाज भांडण म्हणजे कोणता अलंकारिक शब्द होईल?
(1) धोपट मार्ग (2) अरुण्यरुदन
(3) खडाष्टक (4) थंडा फराळ
(12) खालील शब्दगटात अलंकारिक शब्द नसलेला पर्याय ओळखा.
(1) शेंदाड शिपाई (2) चौदावे रत्न
(3)भाग्यवान (4) पांढरा परीस
(13) रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द वापरा.
डॉ. आबिद मणेर यांच्याकडे तपासणी केल्यावर नक्कीच ....... उपाय मिळतो.
(1) खरा (2) रामबाण
(3) निश्चित (4) अकलेचा कांदा
(14) बोके संन्यासी....
(1) ढोंगी माणूस (2) मांजराची एक जात
(3) संन्यासी माणूस (4) कारस्थान करणारा
(15) गटाशी जुळणारा पर्याय निवडा
पांढरा कावळा, पांढरा परीस, पाताळ तंत्री.....
(1) अतिशय दुर्मिळ (2) आटोकाट प्रयत्न
(3) तत्कालीक वैराग्य (4) पिकले पान
(16) बृहस्पती, ओनामा, नखशिखांत.....
(1) मेषपात्र (2) खरा माणूस
(3) सुरुवात (4) वेगळा माणूस
उत्तर सूची : -
(1) 3 (2) 1 (3) 2 (4) 3 (5) 2 (6) 1 (7) 4 (8) 2 (9) 2 (10) 2 (11) 3 (12) 3 (13) २ (14) 1 (15) 4 (16) 1
- संकलन - तारीश आत्तार
जिल्हा परिषद शाळा खरशिंग ता. कवठेमहांकाळ