इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय - गणित, मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 10:48 AM2019-01-19T10:48:07+5:302019-01-19T10:50:12+5:30
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय - गणित, घटक - मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. दिलेल्या अंकापासून सर्वात लहान संख्या बनविताना दिलेल्या अंकात 0 हा अंक असल्यास तो डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहावा लागेल. उदा. 2, 0, 3, 5, 4 या अंकापासून सर्वात लहान बनविताना 20345 अशी बनेल.
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय - गणित, घटक - मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे.
महत्त्वाचे मुद्दे -
- दिलेल्या अंकापासून सर्वात लहान संख्या बनविताना दिलेल्या अंकात 0 हा अंक असल्यास तो डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहावा लागेल. उदा. 2, 0, 3, 5, 4 या अंकापासून सर्वात लहान बनविताना 20345 अशी बनेल.
- दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी संख्या तयार करताना दिलेले अंक उतरत्या क्रमांने मांडावेत.
उदा. 3, 1, 8, 2, 5 पासून बनणारी सर्वात मोठी संख्या 85321 असेल.
- चार किंवा पाच अंक दिले असता सहा किंवा सात अंकी सर्वात मोठी किंवा सर्वात लहान संख्या बनविताना अनुक्रमे सर्वात मोठी संख्या बनविताना सर्वात मोठा अंक पुन्हा पुन्हा लिहावा. तसेच सर्वात लहान संख्या बनविताना सर्वात लहान अंक पुन्हा पुन्हा लिहावा.
उदा. 4, 7, 1, 8 पासून सर्वांत मोठी सहा अंकी संख्या बनविताना 888741 अशी बनेल.
- लहान संख्या = 111478 अशी तयार होईल.
- शून्य अंक संख्या बनविताना *******असल्यास सर्वात लहान संख्या बनविताना डावी पहिल्या अंकानंतर शून्य पुन्हा पुन्हा लिहावा.
उदा : 4, 0, 3, 1 पासून सर्वात लहान सहा अंकी संख्या = 100034
: सोडविलेले प्रश्न : -
(1) 4, 5, 6, 0, 8 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निमपट किती? (2018)
(1) 1,27,108 (2) 45, 554 (3) 63, 554 (4) 91, 108
स्पष्टीकरण - 4,5,6,0,8 पासून होणारी
सर्वात मोठी संख्या = 86540
सर्वात लहान संख्या = 40568
यांची बेरीज 127108 याची निमपट = 63554
उत्तर पर्याय क्र- 3
(2) 7, 4, 0, 2, 3, 5 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून लहानात लहान सहा अंकी बनवा
(1) 754320 (2) 023457 (3) 203457 (4) 230457
स्पष्टीकरण - लहानात लहान संख्या बनविताना अंकाचा चढता क्रम लावावा पण 0 अंक असल्यामुळे अंक दुसºया स्थानी घ्यावा लागेल.
म्हणजेच 023457 असे न घेता 203457 असे उत्तर पर्याय क्र. - 203457
(3) 2, 4, 1, 5, 7, 6 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणारी सहा अंकी लहानात लहान समसंख्या कोणती ?
(1) 1,2,4, 5,7,6 (2) 216754 (3) 765421 (4) 145672
स्पष्टीकरण- 2,4,1,5,7,6 या अंकापासून सुरुवातीला लहानात लहान संख्या बनवू
1,2,4,5,6,7 ही संख्या तयार होईल यातील सर्वात लहान सम अंक शेवटी घ्यावा. म्हणजे लहानात लहान सम संख्या तयार होईल.
145672 हे उत्तर येईल.
उत्तर पर्याय क्र- 4
(4) 0, 2, 3, 4 हे सर्व अंक वापरून सहा अंकी लहानात लहान सम संख्या तयार करा.
(1) 200043 (2) 200034 (3) 222034 (4) 220034
स्पष्टीकरण- वरील उदाहरण सोडविताना 0, 2, 3, 4 पासून लहानात लहान संख्या आधी बनवू. 200034 आता ही सम संख्या आहे का ते पाहू.
सम आहे म्हणून पर्याय क्र. -2 बरोबर
(5) 2 ते 9 या क्रमिक अंकापैकी कोणतेही 6 अंक प्रत्येकी एकदा वापरून सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या बनवा.
(1) 456789 (2) 987654 (3) 987645 (4) 986547
स्पष्टीकरण- पर्यायात विषम संख्या असेलेले पर्याय.
पर्याय क्र. 1, 3, 4 आहेत. यातील सर्वात मोठी संख्या
पर्याय क्र- 3 मध्ये 987645 आहे.
सरावासाठी प्रश्न :
(1) 4, 0, 3, 5 यातील प्रत्येक अंकाचा वापर करून सहा अंकी लहानात लहान संख्या बनवा.
(1) 300045 (2) 300054 (3) 300540 (4) 305004
(2) 5, 0, 4, 12 या अंकापासून तयार होणारी लहानात लहान सम संख्या कोणती ?
(1) 10244 (2) 10245 (3) 10254 (4) 54210
(3) ज्या संख्येत 3 व 5 अंक नाहीत व इतर अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान पाच अंकी संख्या कोणती ?
(1) 10234 (2) 10246 (3) 10264 (4) 10245
(4) पाच अंकी सर्वात मोठ्या संख्येत चार अंकी सर्वात मोठी संख्या मिळविल्यास बेरीज किती येईल?
(1) 10998 (2) 109998 (3) 109989 (4) 108998
(5) 4, 9, 5, 7 हे अंंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती?
(1) 5175 (2) 5166 (3) 3195 (4) 5275
(6) 3 ते 9 या क्रमिक अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणारी सहा अंकी लहानात लहान सम संख्या कोणती ?
(1) 345678 (2) 345768 (3) 867534 (4) 358746
(7) 9, 5, 4, 6, 1, 2 या अंकापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून सहा अंकी लहानात लहान संख्या कोणती तयार होईल?
(1) 124569 (2) 126549 (3) 125459 (4) 125469
(8) सहा अंकी लहानात लहान संख्येतून किती वजा केल्यास पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल ?
(1) 999 (2) 99 (3) 2 (4) 7
(9) 4, 6, 0, 3, 2, 7 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून लहानात लहान सहा अंकी विषम संख्या कोणती?
(1) 023467 (2)203467 (3)230467 (4) 023647
(10) 7, 2 चा अंकाचा वापर करून सात अंकी मोठ्यात मोठी सम संख्या बनवा.
(1) 7777772 (2)770072 (3)7000002 (4) 77777772
(11) पाच अंकी सर्वात लहान संख्येला चार अंकी सर्वात लहान संख्येने भागल्यास भागाकार किती?
(1) 100 (2)10 (3)1000 (4) 10000
(12) 5,2, 7, 3 हे अंक वापरून तयार होणाऱ्या सहा अंकी मोठ्यात मोठ्या संख्येच्या शतकस्थानी कोणता अंक येईल?
(1) 2 (2) 3 (3) 5 (4) 7
(13) पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व चार अंकी लहानात लहान विषम संख्या यांची बेरीज किती?
(1) 109999 (2) 100999 (3) 110000 (4) 110001
(14) 3, 1, 7, 2 हे अंक वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान 5 अंकी संख्येच्या शतकस्थानी कोणता अंक येईल?
(1) 0 (2) 2 (3) 4 (4) 8
उत्तरसुची :-
(1) 2 (2) 2 (3) 2 (4) 2 (5) 1 (6) 1 (7) 1 (8) 1 (9) 2 (10) 1 (11) 2 (12) 3 (13) 1 (14) 2
संकलक : तारीश आत्तार
जि. प. शाळा, खरशिंग, ता. कवठेमहांकाळ