इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय- बुद्धिमत्ता चाचणी, तर्कसंगती व अनुमान (भाषिक) : नातेसंबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 11:39 AM2019-01-17T11:39:42+5:302019-01-17T12:12:40+5:30
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय- बुद्धिमत्ता चाचणी, तर्कसंगती व अनुमान (भाषिक) : नातेसंबंध या घटकासाठी आपल्याला कुटुंबातील सदस्यांचे परस्परांशी असलेले नाते आणि नातेसंबंध माहिती असणे गरजेचे आहे.
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय- बुद्धिमत्ता चाचणी, तर्कसंगती व अनुमान (भाषिक) : नातेसंबंध
महत्त्वाचे मुद्दे...
१) या घटकासाठी आपल्याला कुटुंबातील सदस्यांचे परस्परांशी असलेले नाते आणि नातेसंबंध माहिती असणे गरजेचे आहे.
२) नाते ओळखताना आपण स्वत: आहे असे समजून ओळखण्याचा प्रयत्न करावा.
मी माझ्या
आतीचा - भाचा
आजी-आजोबांचा नातू
आई-वडिलांचा - मुलगा
मावस बहिणीचा- मावस भाऊ
बहीण-भावाचा - भाऊ
मामा-मामीचा - भाचा
मावशीचा - भाचा
पत्नीचा - पती
भाचा-भाचीचा - मामा
आतेभावाचा -मामेभाऊ
मेहुणा-मेहुणीचा - भाऊजी
मामेभावाचा - आत्तेभाऊ
सासू-सासऱ्यांचा - जावई
बहिणीचा - दीर
मुलगा-मुलगीचा - वडील
पुतण्याचा - काका
काका-काकीचा - पुतण्या
आईचे नातलग...
सासू - आजी
भाची - मामेबहीण
जाऊ - काकी
पुतणी - चुलत बहीण
वहिनी - मामी
नणंद - आत्या
आई - आजी
भाऊजी - काका
पती - वडील
पुतण्या - चुलत भाऊ
सासरे - आजोबा
भाचा - मामेभाऊ
दीर - काका
सोडविलेले प्रश्न -
१) दीक्षाची आई माझ्या आईला आई म्हणते, तर दीक्षा माझी कोण? (२०१७)
१) मावशी २) आतेबहीण ३) मामेबहीण ४) भाची
स्पष्टीकरण
आई आई
बहीण
मी दीक्षा
भाची
पर्याय क्र. ४ बरोबर
२) भावेशचे एकुलते एक काका माझ्या वडिलांना बाबा म्हणतात, तर भावेश माझा कोण?
१) मुलगा २) चुलतभाऊ ३) पुतण्या ४) नातू
काका बाबा वडील
भावेश मुलगा मी
पर्याय क्र. १ बरोबर
३) माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते, तर तुझी आई माझी कोण?
१) आत्या २) मामी ३) काकी ४) मावशी
स्पष्टीकरण -
मामा -
आई - बहीण वडील-
माझी - तुझ्या आई (मामी)
म्हणून मामी उत्तर येईल.
४) रामाची काकू ही शामची मामी आहे, तर राम शामचा कोण?
१) मावसभाऊ २) आतेभाऊ ३) चुलतभाऊ ४) मामेभाऊ
स्पष्टीकरण -रामाची काकू जर शामची मामी असेल तर रामाची आई पण शामची मामी होईल. म्हणजे राम हा मामाचा मुलगा होईल, त्यानुसार राम हा मावसभाऊ असेल.
म्हणून पर्याय १ बरोबर.
५) सोहेलचे बाबा अल्ताफचे मामा आहेत, तर अल्ताफची आई सोहेलची कोण?
१) मावशी २) मामी ३) आत्या ४) काकी
स्पष्टीकरण -
बाबा मामा मामा
सोहेल - आत्या - आई अल्ताफ
पर्याय ३ बरोबर
सरावासाठी प्रश्न-
१) अनिल सूरजला म्हणाला, ‘तुझे बाबा माझ्या बाबांच्या एकुलत्या बहिणीचे पती आहेत. तर अनिल हा सूरजचा कोण?
१) मावसभाऊ २) आतेभाऊ ३) चुलतभाऊ ४) मामेभाऊ
२) संजयला दोन काका व एक आत्या आहे, तर संजयच्या आजोबांना एकूण किती अपत्ये आहेत?
१) ३ २) ४ ३) ५ ४) १
३) स्नेहलचे बाबा तनिष्काचे मामा आहेत, तर तनिष्काची आई स्नेहलची कोण?
१) आत्या २) मावशी ३) बहीण ४) काकी
४) सुजित म्हणाला, सुजाताची आई ही माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे, तर सुजित सुजाताचा कोण?
१) मामा २) वडील ३) काका ४) आजोबा
५) अनन्याची आई माझ्या आईला आई म्हणते, तर अनन्या माझी कोण?
१) मावशी २) मामेबहीण २) आतेबहीण ४) भाची
६) अंजुमला सहा बहिणी आहेत, तिची एक बहीण शिक्षिका आहे, तर शिक्षिका बहिणीला एकूण बहिणी किती?
१) ५ २) ६ ३) ७ ४) ८
७) रावसाहेब फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवून म्हणाले, हिच्या मामाची एकुलती एक बहीण ही माझी आई लागते, तर फोटोतील व्यक्ती रावसाहेबची कोण?
१) आत्या २) मावशी ३) बहीण ४) मामेबहीण
८) प्रज्ञाला चार काका आहेत, तर सांगलीत राहणाऱ्या काकाला भाऊ किती?
१) ३ २) ४ ३) ५ ४) २
९) शुभमच्या आईच्या आईचे एकुलते एक जावई शुभमच्या काकाचे कोण?
१) वडील २) मामा ३) भाऊ ४) मामेभाऊ
१०) सुकन्याची मुलगी ही प्रियांकाचा मुलगा प्रसादची आतेबहीण आहे, तर सुकन्या प्रसादच्या आईची कोण?
१) आत्या २) नणंद ३) आजी ४) बहीण
११) सानियाच्या सासूच्या मुलीच्या एकुलत्या एक भावाशी सानियाचे काय नाते आहे?
१) मेहुणी २) पत्नी ३) मुलगी ४) बहीण
१२) कोमल ही जयच्या मुलीची मावशी आहे, तर कोमलचे जयशी असलेले नाते काय आहे?
१) दीर २) बहीण ३) मेहुणी ४) भाऊ
उत्तरसूची :- १) ४ २) २ ३) १ ४) १ ५) ४ ६) २ ७) ३ ८) २ ९) ३ १०) २ ११) २ १२) ३
संकलक : तारीश आत्तार
जि. प. शाळा, खरशिंग, ता. कवठेमहांकाळ