इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा - बुध्दिमत्ता चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 06:34 PM2019-01-05T18:34:36+5:302019-01-05T18:40:30+5:30

इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा विषयातील उदाहरणे अचूक सोडविण्यासाठी निरीक्षण क्षमता, निर्णयक्षमता व वेग महत्त्वाचा असतो. (2) 1 ते 100 पर्यंत मूळसंख्या जोडमूळ, सममूळ, विषममूळ

Etc. 5th Scholarship Test - Intelligence Test | इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा - बुध्दिमत्ता चाचणी

इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा - बुध्दिमत्ता चाचणी

googlenewsNext
ठळक मुद्देइ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा लेख क्र. 4  बुध्दिमत्ता चाचणी

इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा , लेख क्र. 4  बुध्दिमत्ता चाचणी

महत्त्वाचे मुद्दे : (1) या विषयातील उदाहरणे अचूक सोडविण्यासाठी निरीक्षण क्षमता, निर्णयक्षमता व वेग महत्त्वाचा असतो.
(2) 1 ते 100 पर्यंत मूळसंख्या जोडमूळ, सममूळ, विषममूळ
(3) 1 ते 30 वर्गसंख्या
(4) 1 ते 15 घनसंख्या
(5) त्रिकोणी संख्या, चौरस संख्या
वरील संख्यांची माहिती अचूक असावी लागते.
(6) तसेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अचूक व वेगाने करता यावेत.

आता पाहूया विषयातील घटकानुसार माहिती

घटक - क्रम ओळखणे
उपघटक - संख्यामालिका

महत्त्वाचे मुद्दे - (1) क्रमाने संख्या ओळखताना सुरुवातीला खालील मुद्यानुसार त्यातील संख्यांची पडताळणी करावी लागते.
* मूळसंख्या, जोडमूळ, सहमूळ, दोन संख्यातील फरक, संख्यांची पट, वर्गसंख्या, घनसंख्या
* दोन संख्यातील बेरीज/गुणाकार/ भागाकार म्हणजे पुढील संख्या
* चढता-उतरता क्रम
* दिलेल्या संख्यातील अंकांची बेरीज
* सम-विषम संख्या
* अपूर्णांकानुसार संख्या दिल्या असतील अंश/छेद यांची तुलना किंवा क्रमाने संख्या पहावी लागते.
* काहीवेळा वरील सर्व मुद्दे पडताळणी करताना निरीक्षण क्षमता जेवढी चांगली तेवढे उत्तर अचूक व जलद काढता येते.

सोडविलेली उदाहरणे -

(1) प्रश्न- पुढील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या पर्यायांमधून निवडा.
(1) 114, 85, 62, 43 [ ] , 13 (2018)
(1) 26 (2) 18 (3) 24 (4) 21
स्पष्टीकरण - 114, 85, 62, 43 [26], 13

29 23 19 17 13
वरील संख्यामालिकेत संख्यांचा फरक काढला असता 29, 23, 19, 17, 13 अशा उतरत्या क्रमाने असलेल्या मूळसंख्या इतक्या आहेत. म्हणून पर्याय क्र. 1 बरोबर
(2) 11, 12, 16, 52, [ ], 92, 96
(1) 77 (2) 56 (3) 61 (4) 83
स्पष्टीकरण : 11 12 16 52 [56] 92 96

1 4 36 4 36 4
वरील संख्यामालिकेत 11, 12, 16, 52, ----------
अधोरेखित केलेल्या अंकांचा वर्ग करून ते त्या संख्येत मिळवले असता पुढील संख्या मिळते.

उदा : 11 1 2 11+1 =12---2 2---12+4 =16

म्हणून पर्याय क्र. 2 बरोबर

(3) 2, 12, 36, 80, 150, 252 [ ]

(1) 352 (2) 343 (3) 392 (4) 349

स्पष्टीकरण - वरील संख्या या तयार होताना वर्ग व घन यांच्या बेरजेइतकी आहे.
उदा : 12 + 13 = 1 +1= 2, 22+23= 4+8=12
32+33=9+27=80, 42+43=16+64=80
52+53= 25+125=150, 62+63=36+216=252
याच क्रमाने 72 +73 =49+343=392
म्हणून पर्याय क्र. 3 बरोबर

(4) 1 , 1, 1, 1 [ ]
3 5 7 9
(1) 1 , (2) 1, (3) 1, (4) 1
10 12 8 11

स्पष्टीकरण :- दिलेल्या अपूर्णांकाच्या छेदातील फरक 2 आहे. त्यानुसार क्रमाने 1 ही संख्या येईल. म्हणून पर्याय
क्र. 4 बरोबर 11
(5) 23, 24, 28, 37, 53 [ ]
(1) 88 (2) 78 (3) 68 (4) 69
स्पष्टीकरण : - 23 24 28 37 53 [78]

1 4 9 16 25
संख्यातील फरक क्रमाने वर्गसंख्या आहेत.

सरावासाठी प्रश्न-
(1) 5, 7, 10, 15, 22, 23 [ ]

(1) 44, (2) 45, (3) 46 (4) 48
(2) 47, 41, 31, 23 [ ]

(1) 19, (2) 13 (3) 17 (4) 18
(3) 377, 872, 917 [ ]

(1) 945 (2) 449 (3) 357 (4) 678
(4) 2, 6, 8, 14, 22, 36, 58, 94 [ ]

(1) 152 (2) 250 (3) 210 (4) 152
(5) 25, 32, 37, 47, 58, 71, 79 [ ]

(1) 89 (2) 95 (3) 85 (4) 87
(6) 1, 4, 9, 16, 25 [ ]

(1) 36 (2) 49 (3) 64 (4) 25
(7) 7, 8, 10, 13, 17, [ ]

(1) 28 (2) 21 (3) 22 (4) 19
(8) 4, 16, 36, 64 [ ]

(1) 8 (2) 80 (3) 144 (4) 100
(9) 14, 18, 26, 38 [ ]

(1) 62 (2) 49 (3) 63 (4) 42

(10) 33, 333, 3333, [ ]
(1) 3 (2) 330 (3) 33333 (4) 33303

(11) 1 , 8, 27 , 64 [ ]
3 3 3 3
(1) 82 (2) 125 (3) 25 (4) 81
3 3 3 3

(12) क. श्. . छ [ ]
(1) ढ (2) 100 (3) उ (4) ऊ
(13) 8, 18, 32, 50, 72 [ ]
(1) 98 (2) 96 (3) 100 (4) 102
(14) 11, 14, 20, 29, [ ]
(1) 85, (2) 41 (3) 39 (4) 44
(15) 27, 64, 8, [ ]
(1) 9 (2) 16, (3) 1 (4) 4

उत्तरसूची :-
(1) 3 (2) 3 (3) 2 (4) 2 (5) 2
(6) 1 (7) 3 (8) 4 (9) 1 (10) 3
(11) 2 (12) 3 (13) 1 (14) 2 (15) 3

संकलक : तारीश आत्तार
जि. प. शाळा, खरशिंग, ता. कवठेमहांकाळ

Web Title: Etc. 5th Scholarship Test - Intelligence Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.