इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा - विषय - मराठी, घटक - लिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:44 AM2019-01-15T11:44:47+5:302019-01-15T12:02:54+5:30
इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -: लेख क्रमांक १४, विषय - मराठी, घटक - लिंग, ज्या नामावरुन ते पुरुष जात किंवा स्त्री जात आहे हे समजते, त्याला त्या नामाचे लिंग म्हणतात.
इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -: लेख क्रमांक १४, विषय - मराठी, घटक - लिंग
महत्त्वाचे मुद्दे -
ज्या नामावरुन ते पुरुष जात किंवा स्त्री जात आहे हे समजते, त्याला त्या नामाचे लिंग म्हणतात.
लिंग प्रकार
१) पुल्लिंग - तो
२) स्त्रीलिंग - ती
३) नपुसकलिंग - ते
- लिंग ओळखताना नाम एकवचनी असावे. अनेकवचनी नाम असेल तर ते प्रथम एकवचनी करुन घ्यावे.
- काही नाम उभयलिंगी असतात (उदा. डॉक्टर, इंजिनिअर, सैनिक)
सोडविलेले प्रश्न -
१) पिंपळाची पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. बोल्ड केलेल्या नामाचे लिंग ओळखा. (२०१७)
१) पुल्लिंग २) स्त्रीलिंग ३) नपुसकलिंग ४) उभयलिंग
स्पष्टीकरण - पाने अनेकवचनी आहे, त्याचे प्रथम एकवचनी करुया, म्हणजे ‘पान’ होईल.
मग ते पान असं होतं. नपुसकलिंग पर्याय क्र. ३ बरोबर
२) गटात न बसणारा पर्याय निवडा
१) बांग २) आग ३) डाग ४) शाळा
स्पष्टीकरण - ती - बाग, ती - आग, तो - डाग, ती - शाळा.
म्हणून डाग नपुसकलिंग गटात बसणारा पर्याय नाही.
३) जसे वाघ्या : मुरळी तसे पंडित : ?
१) पंडिती २) पंडिता ३) पंडिन ४) पंड्या
स्पष्टीकरण - पंडित - पंडिता हा पर्याय येईल.
४) पुढीलपैकी निश्चितपणे फक्त पुल्लिंगी नाम असलेला पर्याय कोणता?
१) वेळ २) ढेकर ३) बाग ४) हिरा
५) खालील वाक्यातील नपुसकलिंगी ओळखा.
बागेतील सुंदर फुले शोभा वाढवतात.
१) सुंदर २) फुले ३) शोभा ४) बाग
महत्त्वाचे लिंगप्रकार शब्द
पुल्लिंग स्त्रीलिंग पुल्लिंग स्त्रलिंग
विद्वान विदुषी महिष म्हैस
तेली तेलीण शुक सारिका
धोबी धोबीण राघू मैना
गोप गोपी बोका भाटी
उंट सांडणी कावळा कावळी
बेडूक बेडकी व्याही विहीण
मोर लांडोर नर मादी
नपुसकलिंगी शब्द -
केळ, चांदणे, वरण, ऊन, फूलपाखरु, रेडकू, पोट
सोडविण्यासाठी प्रश्न -
१) लिंगानुसार विरुद्ध लिंगी शब्द ओळखा
हंस : ? १) हंसा २) हंसी ३) हंसीन ४) हंसिणी
२) ‘सुया’ या शब्दाचे लिंग ओळखा.
१) पुल्लिंग २) स्त्रीलिंग ३) नपुसकलिंग ४) उभयलिंगी
३) पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात येणारा शब्द कोणता?
१) शिक्षक २) लेखिका ३) इंजिनिअर ४) संपादक
४) जसे मेंढा : मेंढी : महिष : ?
१) रेडकू २) रेडा ३) महिषी ४) म्हैस
५) खालीलपैकी लिंगानुसार वेगळा शब्द कोणता?
१) कळशी २) मडके ३) घागर ४) बादली
६) ‘घोडा’ शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द पर्यायातून शोधा
१) घोडे २) घोड्या ३) घोडी ४) शिंगरु
७) वर : ----------- विरुद्धलिंगी शब्द कोणता?
१) खाली २) वधू ३) नवरी ४) विधूर
८) लिंगानुसार योग्य जोडी कोणती?
१) सुतार-सुतारणी २) वाघ-वाघिणी ३) तेली-तेलीण ४) पोरगा-पेरगे
९) ‘पुत्र’ या शब्दाचा योग्य विरुद्धलिंगी शब्द कोणता?
१) कन्या २) बाळ ३) पुतणी ४) पुतण्या
१०) जनक या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता?
१) राणी २) जननी ३) जानकी ४) जन्मदाती
११) उभयलिंगी असणारा शब्द पर्यायातून निवडा.
१) इंजिनिअर २) धोबी ३) पोलीस ४) डॉक्टर
१२) ‘डॉक्टर’ या शब्दाचे लिंग ओळखा.
१) पुल्लिंग २) स्त्रीलिंग ३) नपुसकलिंग ४) उभयलिंग
१३) खरशिंग शाळेत विविध प्रकारची पुष्कळ झाडे आहेत.
या वाक्यातील बोल्ड केलेल्या शब्दाचे लिंग ओळखा.
१) पुल्लिंग २) स्त्रीलिंग ३) नपुसकलिंग ४) उभयलिंग
१४) कोकणातील घरे सुंदर दिसतात. बोल्ड केलेल्या शब्दाचे लिंग ओळखा.
१) पुल्लिंग २) स्त्रीलिंग ३) नपुसकलिंग ४) यापैकी काहीही नाही
१५) अयोग्य जोडी ओळखा
१) सासू-सासरा २) बोका-भाटी ३) वाघ-वाघिण ४) वर-विधूर
१६) खालील पर्यायातून योग्य जोडी ओळखा.
१) एडका-मेंढी २) म्हैस-वृषभ ३) घोडा - शिंगरु ४) महिष - शेळी
१७) खालील पर्यायापैकी पुल्लिंगी शब्द कोणता?
१) खाते २) गाड्या ३) आंबे ४) वाटा
१८) गटातून किती स्त्रीलिंगी किती ते ओळखा.
शेळ्या, घरे, गावे, शाळा, घागरी, कळशी, मैदान, बॅट
१) चार २) पाच ३) तीन ४) सहा
१९) ‘गाय’ या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता?
१) रेडा २) वासरु ३) बैल ४) गायी
२०) खालीलपैकी स्त्रीलिंगी नसलेला शब्द ओळखा.
१) गाडी २) भावा ३) सभा ४) विनोद
उत्तरसूची - १) ३ २) २ ३) ३ ४) ४ ५) २ ६) ३ ७) २ ८) ३ ९) १ १०) २ ११) २ १२) ४ १३) ३ १४) ३ १५) ४ १६) १ १७) ३ १८) २ १९) ३ २०) ४
संकलक : तारीश आत्तार
जि. प. शाळा, खरशिंग, ता. कवठेमहांकाळ