इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा - विषय : मराठी, घटक - काळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 10:37 AM2019-01-23T10:37:27+5:302019-01-23T10:45:00+5:30
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा - विषय : मुख्य काळ १) वर्तमानकाळ २) भूतकाळ ३) भविष्यकाळ, वर्तमानकाळ - क्रिया चालू असते, भूतकाळ - पूर्वी क्रिया झालेली असते, भविष्यकाळ - क्रिया पुढे होणार असते
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा - विषय : मराठी, घटक - काळ, लेख क्रमांक 21
महत्त्वाचे मुद्दे -* मुख्य काळ
१) वर्तमानकाळ
२) भूतकाळ
३) भविष्यकाळ
- वर्तमानकाळ - क्रिया चालू असते
- भूतकाळ - पूर्वी क्रिया झालेली असते
- भविष्यकाळ - क्रिया पुढे होणार असते
- वर्तमानकाळातील क्रियापद - खातो, जेवतोस, पळता, पाहतो, पाहते, बसतात, बसते इ.
- भूतकाळातील क्रियापद - बसलो, बसलास, जेवली, खाल्ले, पळाला.
- भविष्यकाळातील क्रियापद - जेवेन, जाणार, ऐकेन, बसतील, होणार आहे.
नमुना प्रश्न -
१) पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा (२०१७)
‘कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची’
१) भविष्यकाळ २) भूतकाळ ३) वर्तमानकाळ ४) साधाकाळ
स्पष्टीकरण - उभी असायची म्हणजे क्रिया झालेली आहे. म्हणून भूतकाळ
२) पुढील वाक्याचा काळ ओळखा (२०१८)
‘आपण चमचमणाऱ्या चंद्रचांदण्यांची शोभा पहायला जाऊ’
१) भूतकाळ २) भविष्यकाळ ३) वर्तमानकाळ ४) साधाकाळ
स्पष्टीकरण - पहायला जाऊ म्हणजे अजून जाणार आहे म्हणून- भविष्यकाळ
३) पुढील पर्यायातून भविष्यकाळी क्रियापद ओळखा.
१) सुटला २) सुटेल ३) जेवला ४) जेवतो
स्पष्टीकरण - सुटेल या क्रियापदानुसार क्रिया पूर्ण नाही म्हणून पर्याय क्र. २
४) पुढील शब्दांमध्ये किती भूतकाळी क्रियापद आहेत तो पर्याय निवडा.
विणले, जाईन, जेवतो, बसला होता, गाणार, गातो, उठला, बसविला, झोपतो
१) तीन २) चार ३) पाच ४) सहा
स्पष्टीकरण - विणले, बसला होता, उठला, बसविला इ. भूतकाळी क्रियापद आहेत.
पर्याय क्र. २
५) भविष्यकाळी वाक्य पर्यायातून निवडा
१) आम्ही अभ्यास केला
२) सुहास सकाळी लवकर उठला
३) श्रेया स्पर्धेला जाणार आहे
४) सकाळी तू जाऊन आलीस
स्पष्टीकरण - पर्याय क्र. ३ मध्ये ‘जाणार आहे’ हे क्रियापद क्रिया पूर्ण करीत नाही
स्वाध्याय -
१) वर्तमानकाळी क्रियापदाचा पर्याय कोणता?
१) पडेल २) उठेन ३) सारवले ४) पुसतो
२) खालील वाक्य योग्य क्रियापदाने पूर्ण करा
सुवर्णाने सुट्टीत खूप मंदिर ----
१) पाहते २) पाहिले ३) बघेल ४) जाते
३) भविष्यकाळी क्रियापदाचे वाक्य कोणते?
१) किती सुंदर वडापाव होता!
२) गाडीत जागा मिळेल काय मला?
३) चित्र खूपच छान आहे.
४) मी खूप अनुभव घेतो.
४) खालील पर्यायापैकी वर्तमानकाळी वाक्याचा पर्याय कोणता?
१) बाबा शेताला गेले.
२) आईला खूप काळजी होती.
३) काकू स्वयंपाक करते.
४) नदीला पूर येणार आहे.
५) भविष्यकाळी वाक्य पर्यायातून शोधा
१) आस्वाद घ्या नव्या गोष्टींचा
२) गेले ते दिवस गेले
३) मला इतिहास खूप आवडतो
४) तो निघाला शेताला
६) खालील वाक्याचा काळ ओळखा
केव्हा आलात काका तुम्ही?
१) वर्तमानकाळ २) भूतकाळ ३) साधाकाळ ४) भविष्यकाळ
७) खालील वाक्यातील काळ ओळखा.
हजारो मावळ्यांनी किल्ला सर केला
१) वर्तमानकाळ २) भविष्यकाळ ३) भूतकाळ ४) यापैकी नाही
८) वेगळा पर्याय निवडा
१) जाईल २) जाणार होतो ३) गेलो ४) बसेन
९) खालील वाक्याचा काळ ओळखा
समाजसेवक समाजासाठी काहीतरी नवीन काम करतील.
१) भविष्यकाळ २) वर्तमानकाळ ३) साधाकाळ ४) वर्तमानकाळ
१०) स्वप्नाली परवा गावाला जाईल वाक्यातील काळ ओळखा.
१) वर्तमानकाळ २) सकाळ ३) भविष्यकाळ ४) संध्याकाळ
११) गटातील वेगळा पर्याय निवडा.
१) सकाळ २) वर्तमानकाळ ३) भविष्यकाळ ३) भूतकाळ
१२) तारीश पुस्तक वाचत आहे. या वाक्यातील काळ कोणता?
१) गतकाळ २) भूतकाळ ३) साधाकाळ ४) वर्तमानकाळ
१३) आयेशा बाबा मेडिकलमध्ये गेली. पुढील वाक्य भविष्यकाळात रुपांतर करा.
१) आयेशा बाबा मेडिकलमध्ये जाईल.
२) आयेशा बाबा मेडिकलमध्ये जाते
३) आयेशा मेडिकलमध्ये होती
४) आयेशा बाबा मेडिकलमध्ये जात आहे.
१४) आणखी पाच वर्षांनी काय ----? वाक्य पूर्ण करा.
१) होते २) होईल ३) खाल्ले ४) बसलो
१५) गटात न बसणारे क्रियापद निवडा.
१) बसेन २) असणार ३) जाईल ४) घेतो
उत्तरसूची -
१) ४ २) २ ३) २ ४) ३ ५) १ ६) २ ७) ३ ८) ३ ९) १ १०) ३ ११) १ १२) ४ १३) १ १४) २ १५) ४
- तारीश आत्तार
संकलक : खरशिंग, ता. कवठेमहांकाळ, जिल्हा परिषद शाळा