इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -घटक - शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 06:22 PM2019-01-07T18:22:26+5:302019-01-07T18:29:23+5:30
माणूस, पक्षी, पाने, फुले, झाडे, प्राणी, फळे, मुले, मुली, ग्रह, नक्षत्र, तारे, कीटक, भाज्या, जिल्हे, डाळी, महिने व वस्तू इत्यादी नावे म्हणजे नाम होय.
इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा - मराठी
महत्त्वाचे मुद्दे -
अ) नाम
१) माणूस, पक्षी, पाने, फुले, झाडे, प्राणी, फळे, मुले, मुली, ग्रह, नक्षत्र, तारे, कीटक, भाज्या, जिल्हे, डाळी, महिने व वस्तू इत्यादी नावे म्हणजे नाम होय.
२) या घटकानुसार प्रश्नात किती नामे झाली आहेत, असाही प्रश्न असतो.
ब) सर्वनाम - मी, आम्ही, तू, तुला, मला, आपण, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे,
ज्या, जे, ज्या, कोण, काय, आपण, स्वत: ही सर्व सर्वनामात येतात.
क) विशेषण - दिलेल्या वाक्यातील कशी, केवढा, कसा, कसे, कसली याबद्दल जे उत्तर असते ते विशेषण असते.
ड) क्रियापद - वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियादर्शक शब्द म्हणजे क्रियापद होय.
नमुना सोडविलेली उदाहरणे -
* पुढील वाक्यातील नाम ओळखून पर्याय रंगवा.
१) उतारा २) हसरा ३) बावरा ४) बोलका
स्पष्टीकरण - यात उतारा हा शब्द नाम आहे.
१) नियम २) आम्ही ३) लाल ४) चार
स्पष्टीकरण - यातील नियम हा शब्द नाम येईल.
३) पुढील वाक्यात किती नामे आली आहेत?
अझीम आणि त्याचा मित्र अविष्कार शाळेला धावत गेली.
१) तीन २) चार ३) पाच ४) दोन
स्पष्टीकरण - या वाक्यात अझीम, मित्र, अविष्कार व शाळा ही नामे.
४) स्नेहलने देवाला -------- सुंदर हार बनविला
रिकाम्या जागी योग्य नाव निवडा
१) तीन २) फुलांचा ३) पिवळा ४) तो
स्पष्टीकरण - फुलांचा हार यामुळे फुलांचा पर्याय बरोबर आहे.
५) किती सुंदर इमारत आहे ही!
वरील वाक्यातील नाम पर्यायातून निवडा
१) आहे २) किती ३) सुंदर ४) इमारत
स्पष्टीकरण - इमारत हे नाम आहे.
६) पुढील गटातील सर्वनाम ओळखा
१) पण २) स्वत: ३) सुंदर ४) पाच
स्पष्टीकरण - वरील पर्यायातील स्वत: हे सर्वनाम आहे.
७) पुढील वाक्यात किती सर्वनाम आली आहेत?
तो, तिची बहीण व त्याचा मित्र यांना घेऊन स्वत:च्या घरी आला.
१) तीन २) चार ३) पाच ४) सहा
स्पष्टीकरण - सर्वनाम - तो, तिची, त्याचा, स्वत: ही सर्वनामे आहेत.
८) पुढील पर्यायातील सर्वनाम नसलेला पर्याय शोधा.
१) स्वत: २) कोण ३) ना ४) तू
स्पष्टीकरण - पर्याय क्र. ३ मध्ये जा हे क्रियापद आहे.
९) पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती?
वाक्य - तुला कोण हवे आहे?
१) नाम २) विशेषण ३) सर्वनाम ४) क्रियापद
स्पष्टीकरण - कोण हे सर्वनाम आहे.
सोडविण्यासाठी प्रश्न
१) पुढील वाक्यात रिकाया जागी योग्य नाम निवडून पर्याय रंगवा.
आमच्या शाळेचा खो-खो सामना पहायला --------- जमले.
१) अभिनेता २) श्रोते ३) प्रेक्षक ४) शिल्पकार
२) महाराष्ट्रात गोदावरी, शास्त्री, कृष्णा, तापी या नद्या आहेत. या वाक्यात किती नामे आहेत.
१) पाच २) चार ३) सात ४) सहा
३) आम्ही ती सर्व गोष्टींची पुस्तके त्यांना परत केली. या वाक्यात किती सर्वनामे आली आहेत?
१) एक २) दोन ३) तीन ४) चार
४) पुढील वाक्यातील नाम ओळखा
१) त्याचे दप्तर मोठे असते
१) त्याचे २) दप्तर ३) मोठे ४) असते
५) किती सुंदर आहे ही मूर्ती! या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
१) ही २) सुंदर ३) मूर्ती ४) आहे
६) रिकाम्या जागी योग्य सर्वनाम ओळखा
खाली पडलेला ---------- चेंडू मला दे
१) ती २) तू ३) तो ४) मला
७) गटात न बसणारा पर्याय निवडा
१) कोण २) काय ३) तुका ४) मी
८) पुढील वाक्यातील नाम ओळखा
भारत माझा सुंदर देश आहे
१) सुंदर २) माझा ३) भारत ४) आहे
९) तिने देवापुढे समई लावली. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा
१) नाम २) सर्वनाम ३) क्रियापद ४) विशेषण
१०) खालील वाक्यातील नामांची संख्या ओळखा
आले, लवंग, मोहरी, लसूण, जिरे, तमालपत्र हे मसाल्याचे पदार्थ आहेत.
१) पाच २) सहा ३) सात ४) आठ
११) पुढील पर्यायातील सर्वनाम नसलेला पर्याय निवडा
१) कुठे २) जो ३) त्यांच्या ४) आपण
१२) मी व माझा काका त्यांच्या भावाला घेऊन आपल्या शाळेत गेलो. या वाक्यातील सर्वनामांची संख्या किती?
१) चार २) तीन ३) दोन ४) एक
१३) आपणास उदंड आयुष्य लाभो! या वाक्यातील नाम असणारा पर्याय ओळखा.
१) आपणास २) उदंड ३) आयुष्य ४) लाभो.
१४) झाडावर काही फळे आहेत. या वाक्यातील सर्वनाम ओळखा
१) झाडावर २) काही ३) फळे ४) आहेत
१५) पुढीलपैकी नाम नसलेला पर्याय निवडा
१) देश २) धैर्य ३) शूरपणा ४) प्रशस्त
उत्तरसूची
१) ३, २) ४, ३) ३, ४) २ ५) १, ६) ३, ७) ३, ८) ३, ९) १, १०) ४, ११) १, १२) २, १३) ३, १४) २, १५) ३
संकलक : तारीश आत्तार
जि. प. शाळा, खरशिंग, ता. कवठेमहांकाळ