ग्रामस्थांनी स्वच्छतेसाठी सहकार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:32 AM2017-10-19T00:32:03+5:302017-10-19T00:33:40+5:30
स्वच्छता हीच ईश्वरसेवा असून आपल्या गावचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवल्यास अनेक रोगांपासून मुक्ती मिळून नागरिकांचे आयुष्य वाढते यासाठी स्वच्छतेला अग्रक्रम देऊन प्रत्येकाने सहकार्य करावे, .....
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती: स्वच्छता हीच ईश्वरसेवा असून आपल्या गावचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवल्यास अनेक रोगांपासून मुक्ती मिळून नागरिकांचे आयुष्य वाढते यासाठी स्वच्छतेला अग्रक्रम देऊन प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले़ दत्तक घेतलेल्या भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे स्वच्छता मोहीम कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते़
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद भुसारी, तहसीलदार आदेश शिदोंडे, ठाणेदार बी़ डी़ मडावी, कृषी अधिकारी पेचे, गोलीवार, पं़ स़ सभापती विधा कांबळे, उपसभापती नागोबा बहादे, जि़ प़ सदस्य मारोती गायकवाड, नरेंद्र जिवतोडे, महेश टोंगे, सुमीत मुडेवार, प्रवीण ठेंगणे, धनराज विरूडकर, तुपे, सरपंच गायत्री बागेसर आदींची उपस्थिती होती़ यावेळी वृक्ष व पुस्तके देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला़ सांसद आदर्शग्राम चंदनखेडा ग्रामपंचायतीअंतर्गत १५ आॅक्टोबरला ग्रामसमृद्धी व स्वच्छता पंधरवाडानिमित्य आयोजित स्वच्छता अभियान व आरोग्य शिबिराचे उद्घाटन ना़ अहिर यांचे हस्ते करण्यात आले़ गावातील होतकरू तरूणांना रोजगार मिळविण्यासाठी स्वयंरोजगार निर्मितीची आवश्यकता असून गावातच निर्मितेच्या छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायातुन काम मिळून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असे मत ना़ अहिर यांनी व्यक्त केले़ यावेळी उपस्थित सर्वांना ना़ अहिर यांनी स्वच्छतेची शपथ दिली़ उपस्थित मान्यवराचे या प्रसंगी मोलाचे मार्गदर्शन लाभले़ येथील मुख्य चौकातुन महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली़ महात्मा गांधी़जींच्या पुतळ्याला माल्यापर्ण केले़ सेंद्रीय खतसाठवण प्रकल्पाचे ना़ अहिर यांनी उद्घाटन केले़ ना़ अहिर यांनी बचतगटाच्या वस्तु प्रदर्शनास भेट दिली़ बांबुपासून निमित्त साहित्याचे अवलोकन केले़ जिल्हा परिषद आरोग्य विभागाद्वारे आयोजित नि:शुल्क रोगनिदान व नेत्रतपासणी शिबिराला भेट दिली़ प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलची पाहणी करून समाधान व्यक्त केले़ तालुका कृषी अधिकारी पेचे यांनी किटकनाशक फवारणीबाबत प्रात्यक्षिकातून माहिती दिली़ डॉ़ ए़ पी़ जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधुन शहनाज शेख, नौका शेख, श्रेया या विद्यार्थिंनीनी प्रेरणादिननिमित्त पाठयपुस्तकाचे वाचन केले़ हात धुवा कार्यक्रमअंतर्गत शहनाज शेख हिने प्रात्याक्षिक करून दाखविले़ नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना आहे़ यांचे हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले़ यावेळी बचतगट महिला व शिक्षकांचाही सत्कार ना़ अहिर यांचे हस्ते करण्यात आला़
या कार्यक्रमाचे संचालन मंदा हेपट यांनी केले़ राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे सांगता झाली़ कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विठ्ठल कलकर, देविंद्र बागेसर, सोनकुसरे, गुरूजी, अविनाश लुले, डॉ़ ढेगळे, सुरज चौधरी, राजु धात्रक, ईश्वर , राजु भलमे, आकाश वानखेडे आणि ग्रामस्थांनी आदींनी परिश्रम घेतले़