आंबेडकर जयंतीमध्ये पैठण गेटचा देखावा ठरतो औरंगाबादकरांचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:06 AM2018-04-13T00:06:12+5:302018-04-13T00:09:49+5:30

बाबासाहेबांना औरंगाबादेत येण्यासाठी सैनिकांनी मज्जाव केल्याची बाब निजामाला समजली आणि त्यांनी तात्काळ बाबासाहेबांना माना-सन्मानाने औरंगाबादेत येऊ द्या. त्यांचे शाही स्वागत करा, असे फर्मान सैनिकांना सोडले.

The attraction of Aurangabad, which attracts Paithan Gate in Ambedkar Jayanti | आंबेडकर जयंतीमध्ये पैठण गेटचा देखावा ठरतो औरंगाबादकरांचे आकर्षण

आंबेडकर जयंतीमध्ये पैठण गेटचा देखावा ठरतो औरंगाबादकरांचे आकर्षण

googlenewsNext

मन थक्क करणारा... क्षणभर का होईना विचार करायला भाग पाडणारा आंबेडकर जयंतीमध्ये पैठणगेट येथील नागसेन मित्रमंडळाचा अनोखा देखावा हा दरवर्षी औरंगाबादकरांचे आकर्षण राहिलेला आहे. 

यासंदर्भात नागसेन मित्रमंडळाचे सचिव अरुण कांबळे यांनी सांगितले की, निजाम राजवटीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मराठवाड्यात येण्यासाठी बंदी होती. त्या काळात बाबासाहेब जेव्हा पहिल्यांदा औरंगाबादेत आले तेव्हा निजाम सरकारच्या सैनिकांनी पैठणगेटचा दरवाजा बंद केला. त्यामुळे चिंतित झालेल्या कांबळे कुटुंबियांनी बाबासाहेबांना पैठणगेटलगत बौद्धवाड्यात नेले. तेथे बाबासाहेब चावडीत बसून मराठवाड्यातील दलितांची स्थिती जाणून घेत होते. बाबासाहेबांना औरंगाबादेत येण्यासाठी सैनिकांनी मज्जाव केल्याची बाब निजामाला समजली आणि त्यांनी तात्काळ बाबासाहेबांना माना-सन्मानाने औरंगाबादेत येऊ द्या. त्यांचे शाही स्वागत करा, असे फर्मान सैनिकांना सोडले. बाबासाहेबांची बौद्धवाड्याची ही भेट औरंगाबादेतील पहिली भेट होती. तो क्षण आमच्यासाठी आजही अविस्मरणीय व ऐतिहासिक आहे. त्यामुळे येथील तरुणांनी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ऐतिहासिक स्वरुपाची करायची असा विडा उचलला. त्यानुसार दरवर्षी बाबासाहेबांची जयंती भव्यदिव्य स्वरुपात साजरी केली जायची. 

मात्र, मागील आठ- नऊ वर्षांपूर्वी समतानगर येथील रहिवासी पेंटर कपिल गणकवार यांनी मित्रमंडळाच्या सदस्यांसोबत चर्चा करताना कल्पना दिली की, पैठणगेट हे ठिकाण आपल्यासाठी ऐतिहासिक आहे, तर आपण जयंतीनिमित्त आकर्षक देखावा उभारला तर ते सर्वांचे आकर्षण ठरेल. सर्वांना ती कल्पना पटली आणि ३२ फूट उंचीचे बाबासाहेबांचे तैलचित्र तेथे उभारण्यात आले. या देखाव्यास कल्पनेच्या बाहेर औरंगाबादकरांचा प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून आम्ही दरवर्षी नियमितपणे वेगवेगळी ‘थीम’ घेऊन नागसेन मित्रमंडळाच्या वतीने पैठणगेटजवळ भव्य असा आकर्षक देखावा उभा केला जातो. 

मिरवणुकीत सहभागी असलेला व्यक्ती किंवा मिरवणूक पाहण्यासाठी आलेले प्रत्येक कुटुंब देखावा पाहिल्याशिवाय जात नाही. आतापर्यंत भीमा कोरेगावचा शौर्यस्तंभ, हैदराबाद येथील हुसेनसागरातील बुद्धांची मूर्ती, संसद भवन, बोधीवृक्षाखाली ध्यानस्त बसलेले तथागत गौतम बुद्ध, शिका- संघटित व्हा आणि संघर्ष करा, असे एकापेक्षा एक सरस देखावे करण्यात आले. जयंतीनंतर मागणी करणाऱ्या बुद्धविहारांना हे देखावे दान केले जातात.

Web Title: The attraction of Aurangabad, which attracts Paithan Gate in Ambedkar Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.