फिडेल एडवर्ड्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:32 AM2018-05-30T00:32:00+5:302018-05-30T00:32:00+5:30
फिडेल एडवर्ड्स याचा जन्म ६ फेब्रुवारी १९८२ रोजी बार्बाडोसमधील सेंट पीटर येथे झाला. तो वेस्ट इंडिज संघाकडून खेळला. तो राइट आर्म जलद तसेच तो पेस गोलंदाज होता
फिडेल एडवर्ड्स याचा जन्म ६ फेब्रुवारी १९८२ रोजी बार्बाडोसमधील सेंट पीटर येथे झाला. तो वेस्ट इंडिज संघाकडून खेळला. तो राइट आर्म जलद तसेच तो पेस गोलंदाज होता. तो नेट्समध्ये सराव करताना ब्रायन लाराला दिसला आणि त्याने त्याला श्रीलंकेविरुद्ध खेळण्यास बोलवले, तेव्हा त्याने बार्बाडोससाठी एकच सामना खेळलेला होता. त्याने सुरुवात अत्यंत आत्मविश्वासाने केली; परंतु त्याला सतत दुखापतींनी सतावले होते.
फिडेल एडवर्ड्सने त्याचा पहिला कसोटी सामना २७ जून २००३ रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळला. त्या सामन्यात त्याने नाबाद पाच धावा केल्या आणि पहिल्या इनिंगमध्ये त्याने ३६ धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने ५४ धावा देऊन एक विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या टूरवर असताना त्याला दुखापतीने हैराण केले आणि याचा परिणाम त्याच्या गोलंदाजीवर झाला.
२०१०-११ मध्ये वेस्ट इंडिजच्या क्रिकेट सीझनमध्ये तो परत संघामध्ये आला आणि त्याने सहा सामन्यांमध्ये बार्बाडोससाठी २३.७७ च्या सरासरीने २२ विकेट्स घेतल्या. या सामन्यामध्ये त्याने स्वत:चा फिटनेस सिद्ध करून दाखवला. मे २०११ मध्ये वेस्ट इंडिज संघामध्ये परत आला. जवळजवळ दोन वर्षे तो कसोटी खेळापासून बाजूला पडला होता. पुढे भारतीय संघाविरुद्ध खेळण्यासाठी त्याला पहिल्या कसोटी सामन्यामध्ये घेण्यात आले. त्या सामन्यामध्ये त्याने चार विकेट्स घेतल्या. एडवर्ड्सने शेवटचा एकदिवसीय सामना २००९ मध्ये खेळला. कारण, वेस्ट इंडिज संघाने त्याला
जास्त
दुखापतीमुळे जायबंदी होऊ नये, म्हणून दूर ठेवले होते.
फिडेल स्वत:च्या गोलंदाजीच्या पद्धतीबद्दल म्हणाला होता की, मी कुणाची कॉपी करत नाही. माझी गोलंदाजी इतरांना कठीण वाटत असेल; परंतु ती सायकल चालवण्याइतकी सोपी आहे.
२००३ मध्ये त्याने १५७.७ किमी प्रतितास या गतीने त्याने चेंडू टाकला होता. त्याच्या कसोटी सामन्याच्या करिअरमध्ये त्याने वेस्ट इंडिजचे अनेक कसोटी सामने वाचवले होते. फिडेल एडवडर््सने शेवटचा कसोटी सामना बांगलादेशविरुद्ध खेळला. त्याने ५५ कसोटी सामन्यांमध्ये ३९४ धावा केल्या आणि ३७.८७ च्या सरासरीने १६५ विकेट्स घेतल्या. त्याने एका इनिंगमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स १२ वेळा घेतल्या, तर एका इनिंगमध्ये त्याने ८७ धावा देऊन सात विकेट्स घेतल्या. फिडेलने ५० एकदिवसीय सामन्यांमध्ये ३०.१० च्या सरासरीने ६० विकेट्स घेतल्या, तर एकदिवसीय सामान्यात २२ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या. त्याने ११४ फर्स्टक्लास क्रिकेट सामन्यांमध्ये ३१.२० च्या सरासरीने ३७३ विकेट्स घेतल्या. फर्स्टक्लास क्रिकेट सामन्यामध्ये ८७ धावा देऊन सात विकेट्स घेतल्या.
फिडेल एडवर्ड्सने त्याची क्रिकेटची कारकीर्द संघर्ष करून सिद्ध केली आहे. दुखापतीने सतावले, तरी त्याने परिश्रम घेणे सोडले नव्हते.