लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 09:16 PM2020-08-15T21:16:32+5:302020-08-15T21:18:14+5:30
पोलिसांनी महिलेचा पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अहमदाबाद - गुजरातमधीलअहमदाबाद येथे अतिशय धक्कादायक आणि लज्जास्पद घटना घडली आहे. चहा करायला नकार दिला म्हणून पतीने पत्नीला मारहाण केली. तसेच तिच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. साबरमती येथे हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी महिलेचा पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेच्या सासूने तिला चहा तयार बनवायला सांगितला. मात्र, आज चूल पेटवायची नाही असे सांगून महिलेने चहा तयार करायला नकार दिला. यावरून सासू आणि सूनेमध्ये कडाक्याचे भांडण झाले. नंंतर पतीने तिला बेदम मारहाण केली. इतक्या वरच न थांबता पतीने पत्नीच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकली. पतीने मारहाण केल्यानंतर पत्नीने घरात चहा बनवणार नाही, बाहेरून चहा घेऊन येते असे सांगितले. ती घरातून बाहेर पडल्यानंतर सासू आणि पतीने तिचा पाठलाग केला. ती पोलीस ठाण्यात जायला निघाली होती.
रस्त्यात पती आणि सासूने तिच्यावर दगड फेकला. नंतर तिला पकडून घरी आणले. घरी आणल्यानंतर पतीने मारहाण करत गुप्तांगात मिरची पावडरही टाकली. त्यामुळे तिच्या अंगाची आगआग झाल्याने वेदनेने ती विव्हळत होती. अखेर दुसऱ्या दिवशी महिलेने पोलीस ठाण्यात सासू आणि पती या दोघांविरोधात तक्रार दाखल केली. पतीने अनेकदा तिला याआधी मारहाण केली आहे. त्यावेळी ती माहेरी निघून जायची. त्यानंतर तिच्या माहेरची लोकं समजूत काढून तिला पुन्हा सासरी पाठवत असत. नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी
Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी
सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत
डॉ.पायलच्या आत्महत्येतील संशयितांना इतर महाविद्यालयात प्रवेश नको
सुरज पांचोलीने सुशांत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी केली अन् म्हणाला मैं दुआ करता हूं कि उनके परिवार को...
Video : देव तारी त्याला कोण मारी! कारने फरफटत नेऊनही महिला बचावली, रुग्णालयात उपचार सुरु
स्वातंत्र्यदिनी दिल्या जाणाऱ्या पोलीस पदके केंद्राकडून जाहीर
एक अधिकाऱ्यासह 13 पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्य पदक