उंटअळयांसमोरही प्रशासन हतबल़़़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 05:17 PM2018-10-22T17:17:15+5:302018-10-22T17:18:52+5:30

- निखिल कुलकर्णी काही दिवसांपूर्वी महापालिकेने एका फळवाल्याकडून प्लॅस्टिक पिशव्या जप्तीची कारवाई केली होती़ पण त्या फळवाल्यासमोर महापालिका प्रशासन ...

The administration was in front of the camels too | उंटअळयांसमोरही प्रशासन हतबल़़़़

उंटअळयांसमोरही प्रशासन हतबल़़़़

Next

- निखिल कुलकर्णी
काही दिवसांपूर्वी महापालिकेने एका फळवाल्याकडून प्लॅस्टिक पिशव्या जप्तीची कारवाई केली होती़ पण त्या फळवाल्यासमोर महापालिका प्रशासन हतबल झाल्याचे दिसून आले होते़ आतापर्यंत महापालिकेच्या हतबलतेचे अनेक नमुने समोर आले असतांना आता उंटअळयांच्या बाबतीतही महापालिकेची हतबलता दिसून येत आहे़ शहरात गेल्या काही दिवसांपासून उंटअळयांनी कडूनिंबाच्या झाडांवर थेट हल्ला चढविला आहे़ पण महापालिकेसाठी हा प्रश्न देखील डोंगराएवढा झाला असून उंटअळयांसमोरही प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे़ एरंडीवरच्या उंटअळयांनी कडूनिंबाच्या झाडांची पाने खायला सुरूवात केल्याचे समोर आल्यानंतर एका नगरसेवकाने आपल्या प्रभागातील झाडे अग्निशमन दलाच्या बंबांनी धुवून काढत या प्रश्नाला वाचा फोडली़ त्यानंतर महापालिकेकडे उंटअळयांबाबतच्या तक्रारी येण्यास सुरूवात झाली़ पण उंटअळयांचा प्रादुर्भाव लक्षात येऊन आता आठवडा उलटला असला तरी कुठल्याच उपाययोजना महापालिकेने केलेल्या नाही़ उंटअळया कडूनिंबाच्या झाडांची पाने खात असल्यामुळे बहरलेली महाकाय झाडे काही दिवसांतच अगदी निष्पर्ण होत आहेत़  उंटअळयांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी महाविद्यालयाने सुचविलेल्या रसायनांची फवारणी करणे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने संयुक्तीक नाही़ त्यामुळे फवारणी झालेली नाही़ एवढेच काय तर कृषी महाविद्यालयाच्या आवारातील झाडांवर देखील उंटअळयांचा प्रादुर्भाव झाला आहे़ पण उंटअळयांवर अजूनही प्रतिबंधात्मक उपाययोजना सापडू शकलेल्या नाही़ केवळ शहरातच नव्हे तर जिल्हाभरात उंटअळयांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे़ पण मनपासह जिल्हा प्रशासनही हतबल आहे़ प्रशासनाच्या याच हतबलतेचा फायदा घेत सर्रास वृक्षतोड केली जात आहे़ कडूनिंबाच्या झाडांवर अळयांचा प्रादुर्भाव असतांना दुसरी झाडे देखील तोडली जात आहेत़  महापालिकेने गेल्या वर्षी वृक्ष प्राधिकरण समितीच्या सभेत वृक्षगणना करण्याचा ठराव केला होता़ पण ठरावाची अंमलबजावणी होऊ शकली नाही़ त्यामुळे शहरासह जिल्ह्यात कडूलिंबांच्या झाडांची संख्या किती? याबाबत अनभिज्ञ असलेले प्रशासन ही झाडे वाचविण्यातही अपयशी ठरतांना दिसत आहे़ उंटअळयांच्या प्रादुर्भावामुळे वृक्ष केवळ निष्पर्ण होत असून त्याचा मानवी आरोग्याला धोका नाही, काही दिवसांत ही समस्या आपोआप सुटेल असे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने दिले आहे़ तर आम्ही वृक्षतोडीची परवानगी दिलेली नसल्याचे सांगत महापालिकेने आपली हतबलता दर्शविली आहे़ पण प्रत्यक्षात उंटअळयांमुळे कडूलिंबांची झाडे सर्वप्रथम निष्पर्ण होत असून त्यानंतर झाडांच्या साले या अळया खात असून त्यामुळे झाडांचा केवळ सांगाडाच उरत आहे़ आधीच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असतांना वृक्षवल्लीवर झालेला हा आघात वेळीच रोखण्यासाठी तातडीने पावले उचलली जाणे आवश्यक असतांना प्रशासन मात्र वेळ मारून नेत असल्याचे दिसून येत आहे़ निष्पर्ण झालेल्या कडूनिंबांच्या झाडांना वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी फुटेल असा विश्वास काही अधिकाºयांनी व्यक्त केला़ परंतु जर तसे झाले नाही व कडूनिंबाची झाडे पूर्णपणे करपली तर या हानीला जबाबदार कोण राहील? एकिकडे शासनाकडून वृक्षलागवडीवर कोट्यवधी रूपये खर्च करत असतांना दुसरीकडे बहरलेली झाडे प्रशासन वाचवू शकत नसेल तर हे योग्य नाही़ पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत असून यापुढे असे प्रकार वाढीस लागणार आहेत़ त्यामुळे आतापासूनच अशा समस्या वेळीच रोखण्यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे़ 

Web Title: The administration was in front of the camels too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.