गुन्ह्यांचा छडा लावणे पोलिसांपुढे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:18 PM2018-12-18T23:18:21+5:302018-12-18T23:19:16+5:30

धुळे पोलीस दल : वचक निर्माण करण्याची गरज

Challenges to punish crime! | गुन्ह्यांचा छडा लावणे पोलिसांपुढे आव्हान!

गुन्ह्यांचा छडा लावणे पोलिसांपुढे आव्हान!

googlenewsNext

- देवेंद्र पाठक 
धुळे जिल्हा पोलीस दलासाठी सध्या कठीण काळ सुरू आहे. जिल्ह्यात गुन्ह्यांचा आलेख वाढतच असल्याने पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवर तपासाची जबाबदारी देखील वाढत आहे. गुन्ह्यांचा हा वाढता आलेख कमी करण्यासोबतच घडलेल्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचेही आव्हान पोलिसांसमोर आहे. हे आव्हान येणाºया काळात कशा रितीने पेलले जाईल, याची उत्सुकता आहे़ 
स्थानिक पोलिसांनी आपआपल्या भागात गस्त घालण्याच्या प्रमाणात वाढ करण्याची आवश्यकता आहे़ त्याचे प्रमाण रात्रीच्या वेळेस सर्वाधिक असायला हवे़ चोरी अथवा घरफोडीच्या घटनेतील संबंधित संशयितांवर पोलिसांचा कटाक्ष हवा़ त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा चोºया अथवा घरफोड्या होत असतील तर त्यांच्यावर कायम स्वरुपी वचक निर्माण करायला हवा़ पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांनी या बाबतीतील जिल्हास्तरीय आढावा घेवून संबंधित पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाºयांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे़ नागरीकांना सुध्दा सुरक्षिततेसाठी प्रबोधन कशा पध्दतीने होईल, यासाठी पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे़ नागरीकांनी देखील स्वत:सह मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करायला हव्यात़ पोलीस अधीक्षक यांनी वेळोवेळी पोलीस ठाण्यांचा अंतर्गत आढावा घेण्याची वेळ आली आहे़ यातून बºयाच बाबी प्रकर्षाने समोर येतील़ किती तक्रारी आल्या, किती तक्रारींचा निपटारा झाला, याच्या आकडेवारीच्या पडताळणीची आवश्यकता निर्माण झाली आहे़ पोलिसांनी आपला धाक कायम ठेवल्यास गुन्हेगारीच्या प्रमाणात निश्चित घट होईल़ त्यासाठी ‘खाकीचा धाक’ कायम राहायला हवा़ प्रत्येक शहरात कमी-अधिक प्रमाणात गुंड वावरत असतात़ त्यांच्यावर वेळीच पोलीस प्रशासनाने लगाम लावल्यास त्यांचा उद्मात वाढणार नाही़ याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष दिल्यास वाढणारी त्यांची मुजोरी वेळीच ठेचण्यासाठी मोठी मदत मिळू शकते़ 
जिल्ह्याचा क्राईम रेषो कमी न होता वाढत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे़ ते कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्यासह त्यांच्यासमवेत सर्वच अधिकाºयांना गांभिर्याने प्रयत्न करावे लागतील़ शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात कितीतरी गुन्हे आहेत, त्यांची उकल अद्याप झालेली नाही़ ती झाली पाहीजे़ यासाठी कोण आणि किती प्रयत्न करतात, वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले जाते का, हे देखील बघणे गरजेचे ठरणार आहे़ सध्या धुळ्यात चोरीच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याचा कोणताही प्र्रकारे तपास अद्याप लागलेला नाही. या घटना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना कसून प्रयत्न करावे लागणार आहेत. 
क्राईमच्या घटना घडत असताना त्यांचा निपटारा कधी आणि केव्हा झाला, याची विचारणा आता नाशिक पातळीवरुन होऊ लागली आहे़ त्यामुळे दर महिन्याला होणाºया क्राईमच्या मासिक बैठकीत यावर आढावा होत असलातरी त्याचे फलीत अपेक्षित प्रमाणात होताना दिसत नाही़ शहरातील अवैध धंदे, गुंडगिरी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहीजे़ पोलीस अधीक्षकांना मात्र इतरांनी, सर्वसामान्य जनतेने सहकार्य करायला हवे़ असे केल्यास गुंडगिरीमुक्त शहर निश्चित होणार, एवढेच!

Web Title: Challenges to punish crime!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.