‘सीएम’च्या इशाºयाने अपेक्षा उंचावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 10:19 PM2018-12-16T22:19:04+5:302018-12-16T22:22:08+5:30

प्रत्येक नगरसेवकाला प्रभागाचा विकास हा एकमेव अजेंडा

The CM's expectation has raised expectations | ‘सीएम’च्या इशाºयाने अपेक्षा उंचावल्या

dhule

googlenewsNext

राजेंद्र शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महानगरपालिका निवडणूक निकालाआधी आणि निकालानंतरही गाजत आहे. मतदानासाठी वापरण्यात आलेले मतदान यंत्र आणि पैशांचे वाटप यावरुन विरोधकांनी आरोप केले आहेत. यात किती सत्य आणि किती झूठ यावर चर्चा सुरुच राहणार. पण एकमात्र खरे की भाजपने ३ वरुन सरळ ५० जागांवर विजय मिळवित महापालिकेत एकहाती सत्ता खेचून आणली आहे. याचे श्रेय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव पॅटर्नला आणि जिल्ह्यातील केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, राज्याचे रोहयो मंत्री जयकुमार रावल आणि भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनाच जाते. त्यांच्या नियोजनबद्ध प्रचार आणि दुसºया पक्षातील लोकांना प्रवेश देऊन त्यातून योग्य उमेदवारांची निवड या सर्व गोष्टींना याचे श्रेय जाते. निवडणुकीच्या प्रचार सभेत भयमुक्त धुळे आणि महापालिकेतील टक्केवारीची संस्कृती बंद करण्याचे आश्वासन दिले होते. तर निवडणुकीनंतर मुंबईत पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या भेटी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत अनेक नगरसेवक अनेकदा निवडून आले, परंतु त्यांनी शहराचा कधीच विचार केला नाही, त्यामुळे शहर विकासात बरेच मागे राहिले़ परंतु आता विकासाची संधी सर्व सदस्यांना भाजपच्या माध्यमातून मिळाली आहे़ पण यापूर्वी चालले तसे पुढे चालणार नाही, तर प्रत्येक नगरसेवकाला प्रभागाचा विकास हा एकमेव अजेंडा ठेवावा लागेल़ शहर विकासात निधी कमी पडू देणार नाही़ पण निधी जर वाया गेला व तक्रारी आल्या तर प्रसंगी महापालिका बरखास्त करायलाही मागे-पुढे पाहणार नाही, असा तंबी वजा इशारा दिला. ही धुळेकरांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे.  परंतु मुख्यमंत्र्यांनी शद्बातून व्यक्त केलेल्या विचारांचे  प्रत्यक्ष कृतीत रुपांतर होणेही गरजेचे आहे. कारण वर्षानुवर्षे पदे भोगणाºया  मंडळींना  महापालिका प्रशासनात काम करतांना येणाºया अडचणी आणि खाचखळगे माहिती असतात. ते त्यातून बरोबर आपला मार्ग काढतात, हे कोणीही सांगेल. त्यामुळे अशांवर या तंबीचा किती प्रभाव पडणार, हे सांगणे जरा कठीणच आहे.  तसेच महापालिकेतील टक्केवारी संस्कृती ही इतकी रुजली आहे की त्याचा समुळ नाश करण्यासाठी सर्वांचे तेवढेच प्रामाणिक प्रयत्नसुद्धा लागतील.
कारण नगरसेवक मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतांनाच दुसरीकडे मात्र महापौर पदाच्या शर्यतीवर पक्षात लॉबींग चालू झालेले दिसून आले. चर्चेत अनेकांची नावे स्पर्धेत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. याशिवाय महापौर पदासोबतच स्विकृत सदस्यांच्या नावावरही आता चर्चा सुरु झाली आहे. स्विकृत सदस्यपदी कोणाची वर्णी लागते हा एक उत्सुकतेचा विषय होणार आहे. यात ज्यांनी राष्ट्रवादीतून भाजपत प्रवेश केल्यानंतर निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्या काही पदाधिकाºयांची अपेक्षा आहेच. परंतु सोबतच निवडणुकीत पक्षाच्या काही निष्ठावंतांनी माघार घेतली होती. त्यापैकीही कोणाला संधी देण्यात येईल, याचाही विचार आता पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला करावा लागणार आहे. तसेच महापौरसह अन्य पदावरील सदस्य निवड करतांनाही नेतृत्वाचा कस लागणार आहे. कारण आता निवडून आल्यानंतर निश्चितच अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या असणार आहे. त्यामुळे त्यातून काही दगाफटका होण्याची  आणि आपलाच डाव आपल्यावर उलटण्याची भीतीही आहेच. परंतु यावर महानगर जिल्हाप्रमुख अनूप अग्रवाल यांनी भाजपमध्ये लॉबींग चालत नाही, श्रेष्ठी ठरवेल तोच महापौर होईल. तसेच स्विकृत सदस्यांची निवड होईल, असे सांगून यावर ब्रेक लावण्याचा प्रयत्नही केला आहे. परंतु  एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर आता शहराचा विकास करण्यासाठी सर्वच सदस्यांना एकसुत्रात बांधून काम करावे लागेल. याशिवाय महापालिका टक्केवारी मुक्त करण्यासाठी विकास कामे देतांना आणि ती पूर्ण करुन घेतांना मध्ये येणाºया सर्वच दुव्यांचे पंख छाटले पाहिजे. त्यासाठी योग्य पदावर योग्य व्यक्तीच्या निवडीसोबतच महापालिकेतील टक्केवारीची पूर्ण लॉबीच नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. हे सर्व करण्यासाठी आता स्थानिक नेतृत्वाचा कस लागणार आहे. ज्या पद्धतीने त्यांनी महापालिकेची सत्ता खेचून आणली आहे. त्याचपध्दतीने तिचा उपयोग शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी केला तरच ही सत्ता अबाधित राहू शकणार आहे. पाच वर्षात हे भाजपने करुन दाखविले तर पुढच्या निवडणुकीत त्यांना दुसºया पक्षाच्या पदाधिकाºयांना तोडून आपल्या पक्षात आणण्याचे काम करावे लागणार नाही, हे ही तेवढेच खरे आहे. एकूणच मुख्यमंत्र्यांनी मुंबई भेटीत नगरसेवकांना दिलेल्या तंबीवजा इशाºयापासून महापालिकेतील बदलाच्या प्रक्रियेची सुरुवात चांगली झाली आहे. याचा शेवटसुद्धा तेवढाच आनंददायी राहो, अशी प्रार्थनाच धुळेकर करु शकतात. अन्यथा ‘येरे माझ्या मागल्या’सारखीच गत धुळेकरांची झाल्याशिवाय राहणार नाही.

Web Title: The CM's expectation has raised expectations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे