महत्त्वपूर्ण दस्तावेज कपाटातच पडून...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 11:54 AM2018-06-20T11:54:23+5:302018-06-20T11:54:23+5:30
मनीष चंद्रात्रे, धुळे
जिल्हा परिषदेचे राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे जिल्हा लेखा व्यवस्थापक उदय देशपांडे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी कार्यमुक्त करून जवळपास तीन महिन्याचा कालावधी झाला आहे. त्यांच्या कार्यमुक्तीच्या आदेशानंतरही अद्याप त्यांनी त्यांचा पदभार सोडलेला नाही. परिणामी, राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण दस्तावेज त्यांच्या दालनातील कपाटात बंद आहेत. विशेष, बाब म्हणजे या कपाटाच्या चाव्याही देशपांडे यांच्याजवळच असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात जि.प. प्रशासन गंभीर दखल घेणार कधी? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.
जिल्हा परिषदेतील या धक्कादायक प्रकाराचे पडसाद गेल्या आठवडयात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उमटले होते. या सभेत जि.प.सदस्य कामराज निकम यांनी देशपांडे यांच्या कार्यमुक्तीबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. जि.प. सीईओ गंगाथरन देवराजन यांनी देशपांडे यांना कार्यमुक्त केलेले असताना त्यांनी पदभार सोडला नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यांना कार्यमुक्त केलेले असतानाही राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाशी संबंधित महत्त्वपूर्ण दस्तावेज हे त्यांच्या कपाटातच बंद असल्याचे सदस्य निकम यांनी आक्रमकपणे सांगत आरोग्य विभागावर ताशेरेही ओढले होते. त्याला उत्तर देताना जिल्हा आरोग्य अधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी देशपांडे यांना पदभार सोडण्यासाठी दोनदा स्मरणपत्र पाठवूनही त्यांनी दाद दिली नसल्याचे सभेत सांगितले होते. त्यानंतर सीईओंनी देशपांडे यांच्या दालनातील कपाटाचा पंचनामा करून कपाट तोडण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाºयांना दिले होते. मात्र, त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी रजेवर गेल्यामुळे कपाट तोडण्याची कार्यवाहीच होऊ शकलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासकीय पातळीवर अधिकाºयांची अनास्था असल्याची बाब दिसून आली आहे. वास्तविक, देशपांडे यांना कार्यमुक्त करून बरेच दिवस उलटले आहे. त्यांना कार्यमुक्त करताना त्याचवेळी प्रशासनाने त्यांच्याकडे असलेले कागदपत्रे का घेतली नाहीत? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. देशपांडे यांनी अद्याप पदभार न सोडल्यामुळे राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानाशी संबंधी अनेक कामे खोळंबली आहेत. त्यांनी पदभार सोडावा; यासाठी प्रशासनाने केवळ त्यांना स्मरणपत्र पाठविण्यातच आतापर्यंत धन्यता मानली आहे. त्यात आता जिल्हा आरोग्य अधिकारीही रजेवर गेल्याने सीईओ गंगाथरन देवराजन महत्त्वपूर्ण दस्तावेज घेण्याबाबत काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. कार्यमुक्तीनंतरही देशपांडे यांनी पदभार न सोडल्याने अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे व फाईल्स त्यांच्या कपाटात अडकू न पडल्या आहेत.