आता आत्मपरिक्षण झालेच पाहीजे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 10:51 PM2019-01-28T22:51:12+5:302019-01-28T22:54:36+5:30
धुळे पोलिसांनी गांभिर्याने घेण्याची गरज
- देवेंद्र पाठक
प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधून दरवर्षाप्रमाणे यंदाही राज्याच्या गृह विभागाकडून पोलीस पदक जाहीर करण्यात आले़ यात धुळे पोलिसांना एखादेतरी ‘पोलीस पदक’ मिळेल अशी आशा होती़ मात्र, ती धुसर ठरली़ जिल्ह्यातील एकाही अधिकारी वा कर्मचाºयाला पोलीस पदक मिळालेले नाही. यावरुन धुळे पोलिसांना आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता आहे़
वर्षभरात क्राईमशी संबंधित अनेक घटना लक्षवेधक ठरल्या होत्या़ साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे घडलेल्या सामुहिक हत्याकांडाने राज्याचे नाहीतर संपुर्ण देशाचेच लक्ष वेधून घेतले होते़ पाच जणांची हत्या झाल्यानंतर संपुर्ण गावातील नागरीकांनी घटनास्थळावरुन पळ काढला होता़ भिक्षा मागून पोट भरणाºया पाच जणांची अतिशय सामुहिकपणे निर्घुण हत्या केल्याच्या घटनेमुळे साक्री तालुका चर्चेत आला. याशिवाय देवपुरातील सरस्वती कॉलनीत राहणारे रावसाहेब पाटील आणि त्यांचा मुलगा वैभव पाटील यांच्या दुहेरी हत्याकांडाने शहरातील देवपूर परिसर चांगलाच हादरला होता़ या प्रकरणी माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार याना घटनेच्या दिवशीच ताब्यात घेण्यात आले होते़ त्याच्यावर संशय बळावल्याने त्यांना नंतर अटक करण्यात आली़ घटनेतील संशयितांना टप्प्या-टप्प्याने पोलिसांनी जेरबंदही केले़ या प्रकरणातील जवळपास सर्वच जण सध्या तुरुंगात आहेत़ या दोन्ही घटनेत पोलिसांची कामगिरी प्रशंसनीय ठरली होती. पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्षभरात २३ लाचखोर गजाआड करत कामगिरी केली़ शहरात आणि ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, कोणालाही त्रास होणार नाही, यासाठी २६ ते २७ गाव गुंडांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. हद्दपार करुनही सर्रासपणे फिरणाºया गुंडांच्या मुसक्या धुळे पोलिसांनी आवळल्या. त्या शिताफीने पकडून त्यांना पुन्हा तुरुंगाची हवा खाण्यास भाग पाडले़ जिल्ह्यात पुन्हा गांजा शेती करण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला़ एकीकडे ही लक्षणीय कामगिरी असतांनाच दुसरीकडे जिल्ह्याचा काईमचा आलेख हा वाढताच आहे.
जिल्ह्यातील बनावट दारुचा गोरख धंदा, धुळे, साक्री शहरातील वाढते चैनस्नॅचिंगचे प्रमाण, बसस्थानकासह परिसरात वाढणाºया चोºया, घरफोड्या, शहरासह ग्रामीण भागात भरदिवसा झालेल्या रस्ता लुटीच्या घटनेचा प्रमाण वाढतेच आहे. यावर आळा बसविण्यात जिल्हा पोलीस अपयशी ठरले आहे. वर्षभराचा या घटनांचा क्राईम आलेख हा वाढतांना दिसत आहे. कदाचित यामुळे जिल्हा पोलिसांना एकही पदक मिळाले नसावे, असेच म्हणावे लागेल. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांसह सर्वच जबाबदार पोलीस अधिकाºयांनी याकडेही गांभीर्याने लक्ष देऊन अशा घटनांवर आळा बसवून जिल्ह्याचा क्राईमच्या घटनेचा वाढता आलेख खाली आणून आपल्या कामगिरीचा आलेख वाढवावा, जेणेकरुन पुढच्या वेळेस धुळे पोलिसांना पदक मिळविण्यात यश मिळेल आणि धुळेकरांनाही त्याचा अभिमान वाटेल.