मनपा निवडणूकीत आता गुंडगिरीचा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 11:12 PM2018-11-19T23:12:02+5:302018-11-19T23:12:02+5:30
चंद्रकांत सोनार लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्षाला एकहाती सत्ता मिळावी़, यासाठी या दोन्ही ...
चंद्रकांत सोनार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्षाला एकहाती सत्ता मिळावी़, यासाठी या दोन्ही पक्षांनी मुस्लिम, अल्पसंख्याक समाजाच्या मतांचे विभाजनाचा फायदा भाजपाला होऊ नये़ यासाठी लोकसभा, विधानसभेसह महानगर पालिकेच्या निवडणुकांसाठी मुुस्लिम आरक्षणासह राम मंदिराचा मुद्दा पुढे केला आहे़ त्यामुळे हिंदू- मुस्लिम समाजातील मते मिळविण्याचा प्रयत्न आहे़ भाजपाने सत्तेवर येण्याआधी मुुस्लिम, धनगर, मराठा समाजांना आरक्षण देण्याचे जाहीर केले होते़ मात्र सत्तेवर येवून चार वर्ष होऊन देखील राम मंदिर किंवा आरक्षण न मिळाल्याने जनतेमध्ये नाराजी आहे़ राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षांची सत्ता आल्यास राम मंदिरासह मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देणार असल्याची घोषणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुळ्यातील शेतकरी, आदिवासी मेळाव्यात बोलताना केली़ त्यामुळे लोकसभा-विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आरक्षण व राममंदिर हा मुद्दा राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षांसाठी महत्वाचा मुद्दा ठरणार आहे़ राष्ट्रवादी पक्षातून विविध पदे उपभोगून महापौरासह पक्षाच्या १० ते १५ माजी व विद्यमान नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिला. आणि मनपा निवडणूकीपूर्वी भाजपात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीतून आलेल्या पदाधिकाºयांमुळे भाजपासाठी महापालिकेवर सत्ता मिळविण्याचे काम सोपे झाले होते़ मात्रभाजपाच्या एका गटाकडून प्रवेश तर दुसºया गटाकडून विरोध होत असल्याने पक्षांतर व गुन्हेगारीचा मुद्दा राज्यभरात गाजू लागला आहे़ पक्षांतर केलेल्या उमेदवारांना भाजपाने पवित्र केल्यास धुळेकर त्यांना स्विकारणार की नाकारणार ? असा प्रश्न भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना पडला आहे़ भाजपात गुंडांना प्रवेश दिल्याच्या मुद्यावरून तीव्र विरोध दर्शवित आमदार अनिल गोटे यांनी आमदारकीचा राजीनाम्याची भूमिका घेतली आहे़ त्यामुळे भाजपमधील अंर्तगत वाद चव्हाट्यावर येवू लागला आहे़ एकीकडे भाजपाचा वादाचा मुद्दा हा राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षांसाठी निवडणुकीत संधी देणारा आहे़ त्यामुळे राष्ट्रवादीतून पक्षांतर करून गेलेल्या पदाधिकाºयांच्या मुद्यावर फारसे भाष्य न करता नेत्या-पदाधिकाºयांनी पक्षसंघटन वाढविण्याकडे भर दिला आहे़ महापालिकेची निवडणूक भाजप- राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. भाजपाने त्यासाठी मनपा निवडणुकीची सुत्रे स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा मंत्र्यांकडे न सोपविता जळगाव जिल्ह्याचे मंत्री गिरीष महाजनांकडे सोपविली आहे़ त्यामुळे भाजपातील दोन्ही गटांच्या वादातून राष्ट्रवादीने पक्षांतर केलेल्या उमेदवारांच्या प्रभागात प्रबंळ उमेदवार देण्याच तयारी केली आहे. त्यासाठी ज्या पक्षाचे वर्चस्व व उमेदवार पाहून एक प्रभाग एक चिन्ह ही संकल्पना राबविणार आहे़ भाजपाला मुस्लिम, अल्पसंख्याक, ओबीसी मतांचा फायदा होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षांनी समविचारी पक्षांना सोबत घेऊन मनपावर सत्ता स्थापनेची तयारी चालवली आहे़ भाजपला सत्ता मिळवण्यासाठी इतर पक्षातील लोकांना आमिष दाखवून त्यांना पक्षात प्रवेश दिला जातो. पोलिस अधिकाºयांवर हल्ला करणाºया गुंडालाही प्रवेश दिला. त्यामुळे भाजप आता गुंडांचा पक्ष झाला आहे़ ज्यांच्यावर देशाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे, त्यांना आपल्याच पक्षातील आणि शहरातील गुंडगिरी मोडून काढता येत नसेल तर त्यांच्या पदाचा उपयोग काय आहे, अशी टीकाही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मेळाव्यात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यावर केली तर आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या गुंडगिरी प्रवृत्तीचा विरोधास समर्थन केल्याचे दिसून आले.