आपत्तीच्यावेळी तत्परतेने मदत, हेच आमचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 10:48 PM2019-02-23T22:48:31+5:302019-02-23T22:50:05+5:30

अत्याधुनिक साधनांचा योग्यरीत्या वापर

Our aim is to help promptly during the mishap | आपत्तीच्यावेळी तत्परतेने मदत, हेच आमचे उद्दिष्ट

आपत्तीच्यावेळी तत्परतेने मदत, हेच आमचे उद्दिष्ट

Next

चर्चेतील व्यक्तिशी थेट संवाद
देवेंद्र पाठक । 
लोकमत न्यूज नेटवर्क
राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ धुळे येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी तैनात आहे़ धुळे आणि नागपूर या दोनच ठिकाणी हा दल तैनात आहे़ घटनास्थळी तातडीने निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सहायक समादेशक सदाशिव पाटील  यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे़ यानिमित्त त्यांच्याशी  ‘लोकमत’ने संवाद साधला़
प्रश्न : राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे कार्यक्षेत्र किती आहे? 
उत्तर : राज्यात कुठेही आपत्ती कोसळल्यास त्या ठिकाणी या दलातील जवान पोहचून उद्भवलेला प्रसंग यशस्वीपणे हाताळतात़ परिणामी संपूर्ण महाराष्ट्र तसे कार्यक्षेत्र आहे़ वेळ पडल्यास आणि आदेश आल्यास राज्याबाहेर देखील जाण्याची वेळ येऊ शकते़ 
प्रश्न : आपल्याकडे अत्याधुनिक अशी साधनसामुग्री आहे का? 
उत्तर : आमच्या विभागात वाहनांसह अनुषंगिक सर्व अत्याधुनिक साधनसामुग्री आहेत़ अंतर बघून अवघ्या काही मिनीटांत आमचे पथक घटनास्थळी पोहचते़ उद्भवलेला प्रसंग पाहून यंत्रणेतील साधनांचा उपयोग केला जात असतो़ गरजेच्या आणि आवश्यक असणारे साहित्य आमच्याकडे आहेत़
प्रश्न : कोणाच्या अधिकाराने आपण तातडीने अंमलबजावणी करतात? 
उत्तर : कोणीही आम्हाला कोणताही आदेश देवू शकत नाही़ प्रत्येक जिल्हा स्तरावर आपत्ती निवारण विभाग असतो़ उद्भवलेले संकट आणि मदतीची गरज लक्षात घेऊन या विभागामार्फत आमच्या राज्य आपत्ती प्राधीकरण मुंबई येथील संचालकांना फोनद्वारे अथवा ई-मेलद्वारे सुचित केले जाते़ त्यांच्याकडून तातडीने आदेश आल्यानंतर लागलीच यंत्रणा सज्ज होते़ २४ तास ही सर्व यंत्रणा कार्यरत आहे़
प्रश्न : आत्तापर्यंत शोध आणि बचावकार्य आपल्या विभागामार्फत किती राबविण्यात आले आहेत? 
उत्तर : १५ जुलै २०१६ रोजी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना झाली़ आत्ता पर्यंत विभागामार्फत २९ शोध आणि बचाव कार्य यशस्वीपणे पूर्ण केले आहे़ 
डीप ड्राईव्ह कीटची गरज
आमच्या विभागात जवळपास सर्व प्रकारची यंत्र सामुग्री अत्याधुनिक प्रकारची आहे़ दररोज जवानांकडून सराव करुन घेतला जात असतो़ त्यात खंड पाडला जात नाही़ असे असलेतरी ‘डीप ड्राईव्ह’ या कीटची आवश्यकता आहे़ यासाठी सातत्याने पाठपुरावा शासन दरबारी सुरु आहे़ 
आठवणीतील घटना़़़ 
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगाखेड येथे मका फॅक्टरी आहे़ यात एक जण अडकल्याने तणाव निर्माण झाला़ फॅक्टरीची टाकी तोडण्यासाठी रेल्वेतून कटर मागविण्यात आले़ यशस्वीपणे काम करुन तणाव शांत केला होता़ 
जुलै १८ मध्ये नागपूर येथे अतिवृष्टी झाली होती़ त्यात मदत करण्यासाठी जवान जात असताना मुर्तीजापूर जवळ अपघात झाला होता़ तेथे प्रसंग पाहून मदत करत एकाचा जीव वाचविला होता़ 
राज्य आपत्ती प्रतिसाद दल असल्याने केवळ आदेशाचे पालन करणे  आणि समस्येचे निवारण करणे, ही आमची जबाबदारी़   - सदाशिव पाटील

Web Title: Our aim is to help promptly during the mishap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे