आजी-माजी दिग्गज आघाडीकडून प्रचारास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 03:32 PM2018-11-27T15:32:15+5:302018-11-27T15:36:04+5:30

चंद्रकांत सोनार  लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : २०१४ च्या महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वाधिक उमेदवार विजयी झाल्याने राष्ट्रवादी पक्षाला ...

Promotion by grand-aged grand alliance | आजी-माजी दिग्गज आघाडीकडून प्रचारास

आजी-माजी दिग्गज आघाडीकडून प्रचारास

googlenewsNext

चंद्रकांत सोनार 
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : २०१४ च्या महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वाधिक उमेदवार विजयी झाल्याने राष्ट्रवादी पक्षाला एकहाती सत्ता मिळविता आली होती़ राष्ट्रवादी पक्षाने सलग १५ वर्ष महापालिकेवर सत्ता कायम ठेवली़ यंदाची निवडणूक अन्य राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने महापालिकेवर सत्ता कायम ठेवण्यासाठी पहिल्यांदाच काँग्रेस पक्षांशी या निवडणुकीसाठी आघाडी केली आहे. महापालिकेवर राष्ट्रवादी पक्षाची सत्ता असल्याने बºयाच प्रभागांमध्ये  या पक्षाचे संघटन आणि त्यामुळे वर्चस्व दिसून येते. परंतु तरीही या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षाकडे मुस्लिम बहुल असलेल्या प्रभागांसह इतर प्रभागात उमेदवार दिले आहे़त. राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्षासह महापौर, उपमहापौर, सभागृह नेते यांच्यासह विद्यमान, आजी- माजी नगसेवकांनी पदे भूषवून  झाल्यानंतर आता भाजपाचा झेंडा हाती घेतला़ त्यामुळे राष्ट्रवादीला यंदाच्या निवडणुकीत भाजपला सत्ता स्थापनेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मित्र पक्ष कॉँग्रेसची साथ घेऊन ही निवडणूक लढवत आहे. दरम्यान मुस्लिम, अल्पसंख्याकासह इतर प्रभागातही काँग्रेस पक्षाने उमेदवार रिंगणात उतरविले आहे़ शहराची हद्दवाढ झाल्याने धुळे तालुक्यातील दहा गावांचा समावेश महापालिका हद्दीत करण्यात आला आहे़ त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने हद्दवाढीतील गावांसाठी चार उमेदवार दिले आहे़ धुळे तालुक्यात काँग्रेस पक्षाचे माजीमंत्री रोहिदास पाटील, विद्यमान आमदार कुणाल पाटील यांचे वर्चस्व असल्याने राष्ट्रवादी पक्षाने हद्दवाढीतील प्रभागासाठी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार दिले आहे़ त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत राष्टÑवादी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी प्रथमच एकत्र प्रचार करीत आहे. प्रचारार्थ दोन्ही पक्षाचे माजीमंत्री रोहिदास पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, आदी दिग्गंज नेते सहभागी होत आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेस - राष्टÑवादी आघाडी समोर भाजप,आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम आणि शिवसेनेने आव्हान उभे केले आहे.   त्यामुळे  भाजप विरोधात लोकसंग्राम, राष्ट्रवादी-काँग्रेस पक्ष आणि शिवसेना  अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे़ २०१४ च्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत मोदी लाटेचा परिणाम जाणवला नव्हता. जनतेने महापालिकेत दुसºयांदा राष्टÑवादीकडे एकहाती सत्ता दिली होती. यंदा भाजपने धुळे महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी प्रभारी म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्याकडे नाशिक आणि जळगाव महापालिका निवडणुकीचा अनुभव आहे. त्यानुसार जळगाव पॅटर्न धुळ्यात राबविण्यासाठी मंत्री महाजन यांना  केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे आणि रोहयो मंत्री जयकुमार रावल यांची साथ लाभणार आहे. भाजपच्या तीन मंत्र्यांसमोर आव्हान उभे करण्यासाठी राष्टÑवादी व काँग्रेसचे नेते एकदिलाने कामाला लागलेले दिसत आहे. कारण या निवडणुकीत एक प्रभाग एक चिन्ह हा फॉर्मुला आघाडीतर्फे राबविला जात आहे. त्यामुळे काही प्रभागात काँग्रेसचे उमेदवार हे राष्टÑवादीच्या तर काही प्रभागात राष्टÑवादीचे उमदेवार काँग्रेसच्या चिन्हावर उभे करण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते देखील एकदिलाने काम करतांना सध्या दिसत आहे. परंतु शेवटपर्यंत हा उत्साह त्यांच्यात रहावा यासाठी दोन्ही पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी आपल्यातील एकता टिकवून ठेवणे आवश्यक आहे. राष्टÑवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीसुद्धा दोन्ही पक्षाच्या नेत्यांना एकीचा मंत्र दिला होता. त्या मंत्राचा वापर आता हे नेते किती तंतोतंत करतात यावरच आघाडीचे यश अवलंबून आहे. 

Web Title: Promotion by grand-aged grand alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे