पोलिसांचा वचक पुनर्प्र्रस्थापित व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 06:47 PM2018-11-11T18:47:29+5:302018-11-11T18:47:38+5:30

देवेंद्र पाठक 

Reinstate the police panic | पोलिसांचा वचक पुनर्प्र्रस्थापित व्हावा

पोलिसांचा वचक पुनर्प्र्रस्थापित व्हावा

googlenewsNext

गेल्या आठवड्यात घडलेल्या घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी आणखीन वाढली असल्याचे पुन्हा एकदा प्रतिबिंबीत होऊ लागले आहे़ त्यामागे कारणे देखील तशीच आहे़ अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांना येणारी मोबाईलद्वारे धमकी, एटीएम मशिनची तोडफोड न करता मशिनच उचलून घेऊन जाणे, मुंबई-आग्रा राष्टÑीय महामार्गालगत असलेल्या सुळे फाट्यानजिक अज्ञात दरोडेखोरांनी बंदूक व धारदार शस्त्राचा धाक दाखवून केलेली ३७ हजार रूपयांची लूट, शिरपूर-शहादा मार्गावरील वाघाडी गावाजवळ होत असलेली कासवाची तस्करी, काही हॉटेलात तरुण-तरुणींकडून होणारी अश्लिलता, घरफोडींसह बरजबरीने पैसे लुटून घेण्याचा प्रकार अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेची सद्यस्थिती कशी, हे प्रकर्षाने जाणवते़ कोणत्याही प्रकारचा वचक नसल्याचे हे द्योतक आहे़ अशा घटना घडतातच कशा, यावरुन गुंडावरचा पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे स्पष्ट होत आहे़ पोलिसांच्याच वरिष्ठ अधिकाºयाला मोबाईलद्वारे धमकी येते, त्याचा रितसर गुन्हा दाखल होतो, चौकशी होत असलीतरी धमकी देणारा अद्याप सापडत नसेल तर ‘सायबर क्राईम’ नावाचा पोलिसांचा विभाग नेमका करतो काय? पोलिसांना का नाही सापडत धमकी देणारा? या प्रकरणाचा तपास नेमका कोणत्या दिशेने सुरु आहे? पोलीस अधिकाºयांना धमकी देणारे सापडत नसतील तर सामान्य जनतेचे काय? असे विविध प्रश्न निर्माण होऊ लागले आहे़ त्याचे उत्तर समाधानकारक मिळेल का? हा प्रश्नच आहे़ बंदुकीसह धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लूट करण्याचा घटना घडत असल्याने बंदुका येतात कुठून? याकडे देखील गांभिर्याने पाहण्याची वेळ आली आहे़ अशी स्थिती असताना दुसरीकडे मात्र महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली आहे़ महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय आत्तापासून योजिले जाणे गरजेचे आहे़ घडणाºया घटना आणि घडामोडीचा दररोज अहवाल संकलित करण्यात यावा़ पर्यायाने निवडणुकीच्या रणधुमाळीत कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही, त्यासाठी आत्तापासून प्रयत्न करायला हवेत़ शहरातील संवेदनशिल आणि अतिसंवदेनशिल भागाकडे पोलिसांचे लक्ष असते, हे सर्वश्रृत आहे़ पण, त्याचवेळेस पोलिसांनी महाविद्यालयाकडेही तितक्याच गांभिर्याने पाहण्याची आवश्यकता आहे़ तरुणीच्या छेडखानीचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे़ काही हॉटेलांमध्ये दिवसा तरुण-तरुणींचे भेटीचे प्रमाण वाढत आहेत़ पोलिसांच्या पथकाने धाडी टाकत ते रोखण्याचा प्रयत्न केला आहे़ पण, ही कारवाई तात्पुरता राहता कामा नये़ अचानक धाड टाकून पुन्हा त्याच ठिकाणी अथवा काही अन्य ठिकाणी तपासणी करण्याची मोहीम राबविण्याची गरज आहे़ एकंदरीत पहाता पोलिसांनी आपला धाक कायम ठेवायला हवा़ सायबर क्राईमने देखील आपली जबाबदारी चोखपणे बजावली तर वरिष्ठ अधिकाºयांना धमकी देणारा जेरबंद होऊ शकतो़ या लहान वाटणाºया घटनांकडे दुर्लक्ष केल्यास गुंडांचे अधिक फावणार असून त्यांना रोखणे पोलिसांना कठीण होईल, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच पोेलीस प्रशासनाने गुन्हेगारांच्या नांग्या ठेचून आपले वचक पुनर्प्रस्थापित करावा, अशी अपेक्षा जनमानसातून व्यक्त होताना दिसत आहे. 

Web Title: Reinstate the police panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.