शांतता समित्या केवळ उरल्या कागदोपत्री़़़!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 06:10 PM2018-07-14T18:10:03+5:302018-07-14T18:10:11+5:30
- देवेंद्र पाठक
पोलिसांचा कामातील कठोरपणा आणि तितकाच मृदु स्वभाव अंगिकारल्यास पोलिसांची वचक, त्यांचा धाक निर्माण होऊ शकतो़ त्यासाठी पोलिसांनी पुढे यायला हवे़ असे झाल्यास त्यांना नागरिकांचीही मोठी साथ मिळू शकते़ अनेक लहान मोठ्या स्वरुपातील प्रकरणे असतात, त्यात सर्वसामान्य नागरिकांनी स्वत:हून मदत केल्यास अनेक समस्या, पोलिसांच्या तपासातील अडचणींना मोकळी वाट मिळू शकते़ तपास कामातील महत्वाचा दुवा हा सर्वसामान्य नागरिक आहे, हे वेळीच ओळखायला हवे़ शांतता समिती ही शहरासह जिल्ह्यातील तालुकानिहाय स्थापन करण्यात आलेल्या आहेत़ सण-उत्सवा व्यतिरिक्ति त्यांचा कधी सर्वसामान्य नागकांशी वा प्रशासनाशी संवाद होतो का? हे देखील पाहणे गरजेचे ठरणार आहे़ या समित्या आता केवळ कागदावरच उरल्या आहेत़ या समित्या प्रभावी राहिल्या असत्या तर शहरासह जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार शक्यतोअर घडला नसता, अशी म्हणण्याची वेळ आली आहे़ शांतता समितीचे काम अव्याहतपणे सुरु राहिल्यास त्याचा खूप मोठा परिणाम जाणवेल, असा अंदाज आहे़
धुळे शहरासह जिल्ह्यातील काही भाग आता अधिकच संवेदनशील होऊ पहात आहे़ सण-उत्सवाच्या काळात होणाºया शांतता समितीच्या बैठका आता त्या व्यतिरिक्त सुध्दा घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे़ शांतता प्रस्थापित करण्यासाठी नियुक्त केलेल्या या समित्या आता केवळ नावालाच उरल्या असल्याचे चित्र प्रकर्षाने जाणवत आहे़ गेल्या आठवड्यापासून विविध गुन्हेगारीच्या घटनांनी आपले अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली आहे़ त्याचा कमी-अधिक प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांना फटका बसणे स्वाभाविक आहे़ कोणताही अनुचित प्रकार घडला की धुळे शहर तणावपुर्ण होणार, पोलिसांचा बंदोबस्त लागणार आणि विशेष म्हणजे बाहेरुन बंदोबस्त मागविला जाणार हे नेहमीचे ठरलेले आहे़ हा बंदोबस्ताचा भाग असलातरी ही वेळ का येते? याकडेही गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे़ पण, नेमके त्याचकडे दुर्लक्ष केले जाते़ केवळ एखाद्या विशिष्ठ दिवशी बैठका घेवून प्रबोधन करण्यापेक्षा वेळोवेळी अशा प्रकारचा संवाद झाल्यास कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडण्याआधी सर्वच जण गांभिर्याने घेतील आणि ते स्वाभाविक देखील आहे़ पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी सर्व घटकांशी संवाद झाला पाहीजे़ संवादात अपुर्णत: असल्याचे चित्र बहुतेकवेळा प्रकर्षाने जाणवत असल्याचे स्पष्ट आहे़ संवादातून अनेक प्रश्न मार्गी लागत असतात, हे समजून घेण्याची गरज आहे़
नागरिकांना कोणापासून काही त्रास असल्यास नागरिक तक्रार देण्यास धजावतात़ काही विपरीत घटना नको, पोलिसांची चौकशी नको, असे त्यांच्या मनात असते़ परिणामी गुंडांचे हेच फावते़ त्यामुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज आहे़ शांतता समिती तर काही ठिकाणी असून नसल्यासारखीच आहे़ समितीची सण - उत्सवाच्या काळात बैठक होत असते, त्या ठिकाणी जावून संवाद करायचा आणि वेळ आल्यास शांतता प्रस्तापित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करायचे नाहीत, असे काहींचे सुरु असते़ त्यांनीच जर शांतता निर्माण करण्यासाठी आपल्या स्तरावर प्रामाणिक प्रयत्न केल्सास कोणतेही गुन्हे घडणार नाही, हे मात्र निश्चित!