जिधर ‘दम’ उधर ‘हम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:50 PM2018-10-14T22:50:41+5:302018-10-14T22:51:26+5:30
- राजेंद्र शर्मा धुळे महानगरपालिका निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकीच्या ...
- राजेंद्र शर्मा
धुळे महानगरपालिका निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनपातील सत्ताधारी राष्टÑवादी पक्षातून भाजपमध्ये प्रवेश करणाºया पदाधिकाºयांची संख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे. भाजप केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे. तसेच जिल्ह्याला दोन मंत्रीपद सुद्धा मिळाले आहे. त्यामुळे एकूणच राजकीय दृष्टीने पाहिले सध्यातरी राष्टÑवादीपेक्षा भाजपचे पारडे जडच दिसते. त्यामुळे राष्टÑवादीत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती असे पद उपभोगलेले पदाधिकारी भाजपमध्ये गेले आहेत. एकूणच भाजपमध्ये ‘इनकमिंग’ आणि राष्टÑवादीतून ‘आऊट गोर्इंग’ प्रमाण हे गेल्या दोन वर्षापासून सुरु आहे. अजूनही काही कुंपणावर बसलेले आहेत. तेही लवकरच भाजपमध्ये उडी मारतील, अशी चर्चा आहे.
पण यामुळे भाजपमध्ये सरळ दोन गट तयार झाले आहे. एक गट शहराचे आमदार अनिल गोटे यांचा आहे. जो या पक्षप्रवेशाला विरोध करीत आहे. त्यांचे म्हणणे आहे की यामुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होईल.आमदारांनी याला उघडपणे विरोधही केला आहे. त्यामुळे सुमारे महिन्याभरापासून पक्षप्रवेश थांबल्याचे दिसत होते. परंतु आता पक्षाने नियुक्त केलेले प्रभारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुंबईत माजी महापौर मोहन नवले यांचा मुलगा शितल नवले आणि नगरसेवक सुनील (नंदु ) सोनार यांच्यासह चार जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे आणि महानगर प्रमुख अनूप अग्रवाल उपस्थित होते. एकूणच आमदार गोटे यांच्या विरोधाला न जुमानता भाजपत इनकमिंगची राजकीय खेळी सुरुच आहे. आता नव्याने पक्ष प्रवेश झाल्यानंतर यावर आमदार काय भूमिका घेतात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु या इनकमिंगमुळे भाजपमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाल्याचे आजतरी दिसत आहे.
दुसरीकडे राष्टÑवादीत आऊट गोर्इंग मुळे जे शिल्लक आहेत. ते सर्व एकमेकाकडे संशयाने बघत आहे. कारण अजूनही राष्टÑवादीतून विद्यमान नगरसेवक व पदाधिकाºयांचा एक गट लवकरच कदाचित आचारसंहिता लागल्यानंतर भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यासमोर आता जे विद्यमान नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपमध्ये गेले आहेत आणि जे जातील. त्यांच्याठिकाणी नवीन त्याच ताकदीचा उमेदवार उभा करावा लागणार आहे. त्याचा शोध अर्थात पक्षातर्फे सुरुही झाला असेल. परंतु पक्षातून जाणाºया वाढती संख्या पाहून कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होणे साहजिकच आहे. यातून आता माजी आमदार कदमबांडे कशापद्धतीने मार्ग काढतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शहरातील बदलणाºया राजकीय समीकरण पाहता अशीही चर्चा आहे की, पक्षातून आधी अन्य पक्षात गेलेले काही पदाधिकारी हे परत स्वगृही परतण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात अनेकांची नावे चर्चेत आहे. गेल्या महागनगरपालिका निवडणुकीच्यावेळी राष्टÑवादीकडे अन्य पक्षातून येणाºया पदाधिकाºयांची संख्या जास्त होती.परंतु यावेळेस नेमके उलटे झाले आहे. पक्षातून जाणाºया पदाधिकाºयांची संख्या जास्त झाली आहे.
मात्र यामुळे हे स्पष्ट झाले की, राजकारणात काहीही अशक्य नसते. कोणीही नेहमी मित्र नसतो तर शत्रुही नसतो. मिळालेल्या संधी अनुसार वेळोवेळी यात सोयीनुसार बदल होत असतो. त्यामुळे महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर होईपर्यंत अशापद्धतीने राजकीय उलथापालथ होतच राहणार, असे चित्र दिसते आहे. एकूणच या ‘इनकमिंग’ आणि ‘आऊट गोर्इंग’ च्या प्रकारामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलणार आहे. याचा फटका कोणाला बसेल कोणाला तारेल हे महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.