भाष्य - इसिसचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:22 AM2017-08-12T00:22:53+5:302017-08-12T00:23:09+5:30

इराकमध्ये इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरियाचा (इसिस) बालेकिल्ला समजल्या जाणाºया मोसुल शहरावर इराकी सेनेने कब्जा केल्यानंतर दहशतवादी शक्तींना मोठा हादरा बसला असला तरी याचा अर्थ इराकने अथवा जगाने दहशतवाद किंवा इसिसविरोधात निर्णायक विजय प्राप्त केला असा समज करून घेणे चुकीचे ठरेल.

Annotation - The risk of Isis | भाष्य - इसिसचा धोका

भाष्य - इसिसचा धोका

Next

इराकमध्ये इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरियाचा (इसिस) बालेकिल्ला समजल्या जाणाºया मोसुल शहरावर इराकी सेनेने कब्जा केल्यानंतर दहशतवादी शक्तींना मोठा हादरा बसला असला तरी याचा अर्थ इराकने अथवा जगाने दहशतवाद किंवा इसिसविरोधात निर्णायक विजय प्राप्त केला असा समज करून घेणे चुकीचे ठरेल. कारण अलकायदा अथवा इसिससारख्या दहशतवादी संघटनांची ताकद ही त्यांचे किती क्षेत्रात प्राबल्य आहे यावरून ठरत नसते. तर त्यांच्या कट्टरवादी विचारसरणीला बळी गेलेले लोक हेच त्यांचे खरे स्रोत असतात आणि असे लोक आज जगभरात पसरले आहेत. त्यामुळे या दहशतवादी संघटनांना नेस्तनाबूत करायचे असल्यास लोकांच्या मनोमस्तिष्कात पेरल्या जाणाºया विषाचा प्रभाव संपवावा लागणार आहे. एका आंतरराष्टÑीय शोध संस्थेच्या नव्या अध्ययनानुसार संपूर्ण जगाला हवामान बदलानंतर सर्वाधिक धोका इसिसचा वाटतो आहे. संस्थेतर्फे ३८ देशांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले होते आणि या सर्व देशांनी हवामान बदल आणि इसिसचा आपल्या राष्टÑीय सुरक्षेला धोका असल्याचे सांगितले आहे. यूरोप, मध्यपूर्व, आशिया आणि अमेरिकेतील लोकांनी इसिसचे सर्वात मोठे संकट असल्याचे मत व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेच्या काही देशांना हवामान बदलाचे आव्हान अस्वस्थ करीत आहे. भारतातील लोकांना या दोहोंचाही धोका वाटतो आहे. विशेष म्हणजे या अध्ययनात भारतासह काही देशांनी चीनच्या वाढत्या प्रभावावरही चिंता व्यक्त केली आहे. दक्षिण कोरियात ८३ टक्के आणि व्हिएतनाममध्ये ८० टक्के लोकांनी चीन अधिक धोकादायक असल्याचे मत मांडले आहे. वाढते सायबर हल्ले हा सुद्धा जगासाठी चिंतेचा विषय असला तरी अलीकडच्या काही वर्षात दहशतवादी हल्ल्यांमध्ये सातत्याने झालेली वाढ हे एक वास्तव आहे. जागतिक दहशतवाद इंडेक्सनुसार २०१४ मध्ये जगभरात १३,४६७ दहशतवादी हल्ले झाले आणि हे प्रमाण यापूर्वीच्या वर्षांपेक्षा ३५ टक्के जास्त आहे. अमेरिकेसारख्या महाशक्तीस धमकी देण्याची मजल मारणारी इसिस सद्यस्थितीत जगभरातील सर्वाधिक विध्वंसक दहशतवादी गट म्हणून ओळखली जाते. विविध देशांमधील तरुण पिढीला चिथविण्याकरिता इसिसतर्फे वेगवेगळ्या क्लृप्त्या अवलंबिल्या जातात आणि तरुण गळी लागले की त्यांच्याकडून हवे ते काम करून घ्यायचे अशी तिची मोडस आॅपरेंडी आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून भारतावरही या संघटनेने वक्रदृष्टी टाकली असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमाने येथील तरुणांच्या मनात विष पेरण्याचे काम इसिस मोठ्या खुबीने करीत आहे. त्यामुळे तिला वेळीच थोपवून धरण्याचे मोठे आव्हान देशापुढे आहे.

 

Web Title: Annotation - The risk of Isis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.