‘साराहाह’ नावाच्या सोशल चॅटिंग अॅपचा सहारा नको, आभासी जगाची नकारात्मकता वाढेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 01:13 AM2017-08-20T01:13:52+5:302017-08-20T01:14:03+5:30
‘मी मरणार कधी?’, ‘लग्न कधी होणार?’, ‘तुमचे दुर्गुण कोणते?’ या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हल्ली नातेवाईक, मित्रपरिवार फेसबुकला विचारतात. आणि त्याचे उत्तर अगदी अख्ख्या जगाला सांगण्यासाठी ‘शेअरिंग’ करण्यावरही नेटिझन्सचा भर असतो.
- स्नेहा मोरे
‘मी मरणार कधी?’, ‘लग्न कधी होणार?’, ‘तुमचे दुर्गुण कोणते?’ या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हल्ली नातेवाईक, मित्रपरिवार फेसबुकला विचारतात. आणि त्याचे उत्तर अगदी अख्ख्या जगाला सांगण्यासाठी ‘शेअरिंग’ करण्यावरही नेटिझन्सचा भर असतो. मागच्या काही दिवसांत याची ‘साथ’च फेसबुकवर आली होती, आता मात्र याची जागा ‘साराहाह’ नावाच्या सोशल चॅटिंग अॅपने घेतली
आहे. मात्र या अॅपमुळे आभासी जगाची नकारात्मकता वाढेल, असे मत मानसोपचारतज्ज्ञांनी मांडले आहे.
पोकेमन गो, ब्ल्यू व्हेल या आॅनलाइन गेमिंगच्या धोकादायक ‘व्हायरल शेअरिंग’नंतर आता फेसबुकवर
सौदी अरेबियाहून दाखल झालेले ‘साराहाह’ हे सोशल चॅटिंग अॅप
फेसबुकवर धुमाकूळ घालत आहे. अगदी मिनिटा-मिनिटाला याविषयी फेसबुकवर चर्चा सुरू असून शेकडो कमेंट्स आणि पोस्ट्स वाढत आहेत. हे अॅप जगभरात फेसबुक आणि स्नॅपचॅटपेक्षाही जास्त लोकप्रिय असल्याचा दावा केला जात आहे. अरबी भाषेतून आलेल्या ‘साराहाह’ या शब्दाचा अर्थ ‘इमानदार’ ,प्रामाणिकअसा होतो. साराहाह हे अॅप जगभरात पसंत केले जात आहे.
साधारण एक वर्षाआधी लॉन्च
झालेल्या या अॅपला आतापर्यंत ३० कोटींपेक्षा जास्त वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.
या अॅपच्या माध्यमातून युझर्स त्यांच्या प्रोफाइलमधील व्यक्तींना मेसेज पाठवू शकतात. या अॅपमधून मेसेज प्राप्त करणाºया व्यक्तीला हे कळत नाही की मेसेज कुणी पाठवला आहे. सध्या या अॅपमध्ये मेसेजला रिप्लाय करता येत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांना
किंवा नातेवाइकांना मेसेज पाठवू
शकता.
मात्र, त्यांना तुमचे नाव कळणार नाही. म्हणजे ज्या लोकांशी तुम्ही समोरासमोर काही बोलू शकणार नाहीत त्यांच्याशी या अॅपच्या माध्यमातून बोलू शकणार आहात. पण त्यांना तुम्ही कोण आहात हे कळणार नाही.
या अॅपमुळे आपापसांतील नकारात्मक विचार वाढण्याचा धोका मानसोपचारतज्ज्ञ डॉ. क्रांती घने यांनी व्यक्त केला आहे. कोणत्याही
सोशल चॅटिंग अॅपच्या अतिवापराचे दुष्परिणाम असतातच. मात्र या अॅपमुळे वेगळ्या प्रकारची नकारात्मकता
आणि नात्यात अधिकाधिक दुरावा निर्माण होतो आहे. अशा प्रकारे एखाद्या सोशल साइट्सवर भावना व्यक्त करणे चुकीचे आहे. आपण ज्याच्याविषयी बोलतो त्या व्यक्तीला याचा मनस्ताप सहन करावा लागतोय. याउलट गेट-टुगेदर, गप्पागोष्टी करताना मित्र-मैत्रिणी, नातलग आणि आप्तेष्टांना त्यांच्याविषयी आपल्या भावना, त्यांच्या चुका किंवा
दुर्गुण त्यांच्याशी संवाद साधून सांगितले पाहिजे.
अॅपविषयी डॉ. क्रांती घने यांनी सांगितले की, या अॅपमुळे सायबर बुलिंगचे प्रमाण वाढू शकते. शिवाय, सायबर सुरक्षेच्या दृष्टीने या अॅपचा वापरही चुकीचा आहे. महत्त्वाचे म्हणजे, अॅपमुळे नात्यांतील तिढाही अधिकाधिक
वाढू शकेल. त्यामुळे अशा ‘व्हर्च्युअल’ जगातील चॅटिंग अॅप्सपेक्षा
आपला मित्रपरिवार आणि नातेवाइकांच्या सहवासात जास्तीत जास्त वेळ
घालवावा.