वैश्विक अनुक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 03:19 AM2018-01-14T03:19:23+5:302018-01-14T03:19:37+5:30
या स्तंभात आपण पृथ्वीपासून दूर जात वेगवेगळ्या खगोलीय पदार्थ (ग्रह, तारे वगैरे) आणि त्यांच्या गुणधर्माविषयी चर्चा करणार आहोत. ही सर्व चर्चा अर्थातच, शास्त्रीय पातळीवर किंवा माहीत असलेल्या विज्ञानाचा आधार घेऊनच करण्यात येईल. थोडक्यात, या लेखांचा आधार हा विज्ञानाला माहीत असलेल्या तथ्यांवरच आधारित असेल.
- अरविंद परांजपे
या स्तंभात आपण पृथ्वीपासून दूर जात वेगवेगळ्या खगोलीय पदार्थ (ग्रह, तारे वगैरे) आणि त्यांच्या गुणधर्माविषयी चर्चा करणार आहोत. ही सर्व चर्चा अर्थातच, शास्त्रीय पातळीवर किंवा माहीत असलेल्या विज्ञानाचा आधार घेऊनच करण्यात येईल. थोडक्यात, या लेखांचा आधार हा विज्ञानाला माहीत असलेल्या तथ्यांवरच आधारित असेल.
अगदी सुरुवातीच्या काळात ज्या नैसर्गिक बाबींचा मानवाने अभ्यास केला, त्यात खगोलशास्त्राचा प्रथम क्रमांक लागतो, असे मानण्यात येते. खगोलशास्त्राच्या अभ्यासास सुरुवात ही काही नैसर्गिक कुतूहलामुळे सुरू झाली नव्हती, तर ती एक गरज होती. या गरजेच्या मागचे मुख्य कारण शेती होते. जी ऋतूवर अवलंबून असते. पेरणी ते कापणी ही शेतीची सर्व कामे जर ठरावीक वेळी केली, तरच ती फलदायक ठरते. ऋतूंचा संबंध हा सूर्याशी आहे, हे कळायला मानवाला फार वेळ लागला नसला, तरी तो नेमका कसा आहे, याचे आकलन होण्यास मात्र हजारो वर्षे लागली.
जगाच्या पाठीवर ज्या ठिकाणी मानवी सभ्यतेचा विकास झाला, त्या ठिकाणी या निरीक्षणातून आणि अभ्यासातून खगोलशास्त्राचा उदय झाला, असे म्हणता येईल. पुढे कालांतराने निरीक्षणे आणि त्यांचा अभ्यास फक्त ऋतूंपुरता मर्यादित न राहता, त्याला एका शास्त्रीय अभ्यासाची दिशा मिळाली.
आपल्याला अनेक ठिकाणी प्राचीन अभ्यासकांनी केलेल्या नोंदी सापडतात.
बेबिलोनमधील अभ्यासकांनी अचूक निरीक्षणे घेण्यात प्रावीण्यता मिळविली होती. हा तो काळ होता, जिथे कागदावर लिहायची कला जन्माला येण्यासाठी कित्येक शतकांचा अवधी होता. त्या काळात बेबिलोनमधील निरीक्षकांनी आपली निरीक्षणे ओल्या मातीच्या पट्ट्यावर लिहिली. मग त्या मातीच्या पट्ट्याला शिजवून पक्की केली होती, पण त्यांनी या निरीक्षणातून अर्थ काढण्याचा प्रयत्न मात्र केलेला दिसत नाही.
जशी भारतीय ऋषी-मुनींनी पृथ्वी ही शेष नागाच्या डोक्यावर आहे, अशी कल्पना केली. तशीच आपले हे विश्व कसे असेल किंवा आहे, याबद्दल लोकांनी वेगवेगळ्या परिकल्पना मांडल्या होत्या. या कल्पना जरी आपल्याला अतिरंजित वाटत असल्या, तरी अशी शक्यता नाकारता येणार नाही की, या विद्वानांचे मत काही वेगळे असावे, पण सर्वसामान्याना कळावे, म्हणून त्यांनी अशा प्रकारे समजाविण्याचा प्रयत्न केला असावा. मात्र, काळाच्या ओघात मूळ कल्पना बाजूला राहिली आणि फक्त परिकल्पनांनाच प्रसिद्धी मिळाली किंवा त्या प्रचलित झाल्या.
निरीक्षणांतून त्या निरीक्षणांचा अर्थ काढण्याचा प्रयत्न केला ग्रीक लोकांनी. त्यांनी निरीक्षणांचा अभ्यास करून, विश्वरचनेबद्दल शास्त्रीय पातळीवर भाष्य केले. त्यांनी असा विचार मांडला की, आकाश म्हणजे एक प्रचंड मोठा गोल आहे. या गोलावर आतून तारे चिकटवले आहेत. पृथ्वी ही या गोलाच्या केंद्रस्थानी आहे. या परिकल्पनेचे पडसाद खूप काळ टिकले. कारण या कल्पनेत पृथ्वीला एक अद्वितीय असे स्थान मिळाले. जर हा गोल म्हणजे आपले विश्व तर पृथ्वी ही साºया विश्वाचे केंद्रस्थान आहे. या परिकल्पनेला छेद देऊन निरीक्षणांच्या आधारे विश्वाच्या स्वरूपाची संकल्पना जनसामान्यात रुजू होण्यास बरेच कष्ट पडले होते. त्याचे झाले असे की, आकाशाचा गोलावर आपल्याला साधारणपणे एका वेळी ३००० तारे दिसतात. उरलेले ३००० तारे क्षितिजाखाली असतात. हे सर्व तारे एका गोलावर लावलेले असल्यामुळे ताºयांची एकमेकांपासूनची स्थिती बदलत नाही. ७ ताºयांच्या सप्तर्षींची आकृती वर्षानुवर्षे तशीच आहे. फक्त रात्रभरात त्यांची दिशा मात्र बदलते.
पण या सुमारे ६००० ताºयांमध्ये ५ तारे असे आहेत की, ते जरा उनाड आहेत, असे दिसून येत होते. ते या गोलावर आपल्या मर्जीप्रमाणे हवे तसे भटकत असतात. या ५ ताºयांना ग्रीक लोकांनी आपल्या भाषेत नाव दिले प्लॅनेट. यांना आपण ‘ग्रह’ म्हणून ओळखतो.
पण आता प्रश्न असा उपस्थित होतो की, ताºयांच्या या गोलावर ५ ताºयांची भटकंती दाखवायची कशी? शिवाय यांच्या जोडीला सूर्य आणि चंद्रही होते.
यात एक गोष्ट मात्र होती. या पाच ग्रहांची नभपटालावरील गती वेगवेगळी होती त्यांचा नभपटलावरचा प्रवास हा ताºयांच्या सापेक्षात पश्चिमेकडून पूर्वेकडे होत असतो, तसेच यांचा प्रवास नभपटलावरच्या सूर्याच्या किंवा चंद्र्राच्या प्रवास मार्गापासून खूप दूरही नसतो. म्हणजे ग्रह हे मिथुन किंवा वृश्चिक तारका समूहांच्या दिशेने दिसतील, पण ते कधीच सप्तर्षीच्या दिशेने दिसणार नाहीत.
या निरीक्षणांच्या आधारे मग ग्रीक लोकांनी एक शक्कल शोधून काढली. त्यांनी ताºयांच्या गोल आणि पृथ्वी यांच्यामध्ये ७ स्फटिकांची गोलाची कल्पना केली. सूर्य, चंद्र्र आणि ५ ग्रहांचा प्रत्येकी एक गोल. प्रत्येक गोलांच्या फिरण्याचा कालावधी वेगवेगळा. हे ७ गोल इतके अप्रतिम पारदर्शक असे गोल आहेत की, त्या गोलांची आपल्याला जाणीव होत नाही, तर अशा प्रकारे ते सूर्य, चंद्र्र आणि इतर ग्रहांची ताºयांच्या संदर्भात गती दाखवू शकत होते.
पण कोड एवढे सोपे नव्हते. हे ग्रह ताºयांच्या या गोलांच्या नभपटलावर आपली दिशासुद्धा बदलत होते. याची चर्चा आपण पुढील भागात करू या.
पण जाता-जाता - खगोलशास्त्र हे एक अस शास्त्र आहे की, जिथे अभ्यासक हा फक्त निरीक्षक असतो. त्याला स्वत: प्रयोग करता येत नाहीत आणि त्याच्या माहितीचा स्रोत हा फक्त दूरवरून येणाºया ताºयाचा प्रकाश असतो आणि यावरून मानवाने उभारलेले हे शास्त्र आचंबित करणारे वाटते. लेखक नेहरू तारांगणचे संचालक आहेत.