भाष्य - सम आर मोअर इक्वल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:19 AM2017-08-10T00:19:52+5:302017-08-10T00:20:15+5:30

जगविख्यात लेखक जॉर्ज आॅरवेल यांच्या अत्यंत गाजलेल्या ‘अ‍ॅनिमल फार्म’ या कादंबरीतील एक वाक्य अजरामर झाले आहे. आॅल अ‍ॅनिमल्स आर इक्वल, बट सम अ‍ॅनिमल्स आर मोअर इक्वल दॅन अदर्स, हे ते वाक्य! सर्व जण समान असल्याचा दावा करणारे सत्ताधारी, मूठभर प्रभावशाली लोकांना विशेषाधिकार प्रदान करतात, हा सार्वत्रिक व सर्वकालीन अनुभव आहे.

Speech - Some Rear Equals! | भाष्य - सम आर मोअर इक्वल!

भाष्य - सम आर मोअर इक्वल!

Next

जगविख्यात लेखक जॉर्ज आॅरवेल यांच्या अत्यंत गाजलेल्या ‘अ‍ॅनिमल फार्म’ या कादंबरीतील एक वाक्य अजरामर झाले आहे. आॅल अ‍ॅनिमल्स आर इक्वल, बट सम अ‍ॅनिमल्स आर मोअर इक्वल दॅन अदर्स, हे ते वाक्य! सर्व जण समान असल्याचा दावा करणारे सत्ताधारी, मूठभर प्रभावशाली लोकांना विशेषाधिकार प्रदान करतात, हा सार्वत्रिक व सर्वकालीन अनुभव आहे. सत्ताधाऱ्यांच्या याच प्रवृत्तीवर आॅरवेल यांनी त्या वाक्यातून नेमके बोट ठेवले होते. सध्या देशभर गाजत असलेल्या, चंदीगड येथील वर्णिका कुंडू विनयभंग प्रकरणाच्या निमित्ताने आॅरवेल यांच्या त्या वाक्याची यथार्थता अधोरेखित झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे हरियाणा प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास आणि त्याचा मित्र आशिष कुमार या दोघांवर अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप असूनही, अवघ्या काही तासात ते जामिनावर बाहेर आले. विकास आणि आशिषवरील आरोपांमध्ये अपहरणाच्या प्रयत्नाचा आरोपही होता. एवढेच नव्हे तर वर्णिकाच्या गाडीचा पाठलाग करताना, त्यांनी अत्यंत धोकादायकरीत्या तिची गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये वर्णिकाच्या जीवावरही बेतू शकले असते. त्या आधारावर त्या दोघांच्या विरोधात जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा आरोपही ठेवल्या जाऊ शकला असता; मात्र केवळ विकासचे वडील सत्ताधारी पक्षाचे मोठे नेते असल्यानेच, प्रारंभी त्या दोघांना सहजासहजी जामीन मंजूर होईल, अशा प्रकारच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता दबाव वाढल्यानंतर अखेर बुधवारी या दोघांनाही अपहरणाच्या गुन्ह्यत अटक करणे पोलिसांना भाग पडले. वास्तविक वर्णिकाने केलेल्या दूरध्वनी कॉलला प्रतिसाद देत पोहोचलेल्या पोलिसांनी विकास व आशिषला रंगेहात पकडले, तेव्हा ते दोघेही वर्णिकाच्या गाडीचा दरवाजा उघडून तिला बाहेर खेचण्याच्या प्रयत्नात होते. हा स्पष्टपणे अपहरणाचा प्रयत्न होता. तरीही पोलिसांनी अपहरणाच्या प्रयत्नासाठीच्या कलमान्वये गुन्हा दाखल न करता केवळ पाठलाग आणि दारूच्या अमलाखाली गाडी चालविण्यासाठीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. मध्यरात्रीच्या सुमारास दारूच्या अमलाखाली असलेले दोन इसम एकट्या तरुणीच्या गाडीचा तब्बल सात किलोमीटर पाठलाग करतात, अत्यंत धोकादायकरीत्या तिची गाडी थांबविण्याचा प्रयत्न करतात, पुढे गाडी थांबवून तिला बाहेर खेचण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांचा उद्देश स्पष्ट असतो. असे असतानाही सुरुवातीला विकास व आशिषच्या विरोधात सौम्य स्वरूपाच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यामागचे एकमेव कारण म्हणजे, सर्व जण समान असले तरी काही अधिक समान असतात! आणि काही अधिक समान असतात म्हणूनच तर आयएएस अधिकाºयाच्या मुलीसाठी पोलीस लगेच धावून गेले ना?
 

Web Title: Speech - Some Rear Equals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.