तरुणाईला भुरळ घालणारी रंगीबेरंगी मॉकटेल्स, कॉकटेलला उत्तम पर्याय म्हणून मॉकटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 01:47 AM2017-08-20T01:47:30+5:302017-08-20T01:48:36+5:30

आजकाल हॉटेलात जाताना फक्त खाणे हा ट्रेंड केव्हाच मागे पडलाय. खाण्याबरोबर काहीतरी मस्त प्यायला मिळावे, अशीही इच्छा असते आणि तसे एकसोएक ड्रिंक्स आता सर्रास मिळायला लागले आहेत.

Mockingtail as a great choice for the young fancy colorful Mocklets, Cocktail | तरुणाईला भुरळ घालणारी रंगीबेरंगी मॉकटेल्स, कॉकटेलला उत्तम पर्याय म्हणून मॉकटेल

तरुणाईला भुरळ घालणारी रंगीबेरंगी मॉकटेल्स, कॉकटेलला उत्तम पर्याय म्हणून मॉकटेल

googlenewsNext

- भक्ती सोमण

आजकाल हॉटेलात जाताना फक्त खाणे हा ट्रेंड केव्हाच मागे पडलाय. खाण्याबरोबर काहीतरी मस्त प्यायला मिळावे, अशीही इच्छा असते आणि तसे एकसोएक ड्रिंक्स आता सर्रास मिळायला लागले आहेत. त्यासाठीच लाऊंज, पब असे काय-काय सुरू झालेय. तिथे हार्ड ड्रिंक्ससोबत कॉकटेल, मॉकटेल्स मिळतात. २-३ हार्ड ड्रिंक्स एकत्र केली की ‘कॉकटेल’ होते. तर फळांचा ज्यूस, सोडा, लिंबू असे प्रकार एकत्र करून करतात, त्याला ‘मॉकटेल’ म्हणतात.
मॉकटेल्समध्ये प्रामुख्याने विविध फळांचे रस, लिंबू, पुदिन्याची पाने लागतात. यात आवडत असेल, तर सोडाही घालता येतो. म्हणजे पाइनअ‍ॅपल ज्यूस आणि आॅरेंज ज्यूस थोडे-थोडे एकत्र करायचे. त्यात लिंबू आणि बर्फ घालून ते आइस शेकरने शेक करून मोठ्या ग्लासमध्ये ओतायचे. वरून आवडत असल्यास सोडा घालायचा की, झाले हे आॅरेंज मॉकटेल तयार. असे असंख्य प्रकार मॉकटेलचे करता येऊ शकतात.
कॉकटेलला उत्तम पर्याय म्हणून मॉकटेलकडे पाहिले जाते. आजकाल उच्चशिक्षित तरुणाई मोठमोठ्या अधिकाºयांसोबत मीटिंग्ज करते. त्या वेळी या पार्टीत कॉकटेल आणि मॉकटेलचाही समावेश असतो. आपल्यासमवेत असलेल्या अधिकारी कॉकटेल पिणारा असेल आणि त्याने रेड-ब्राउन रंगाचे कॉकटेल घेतले असेल, तर तुम्हाला तो पर्याय मॉकटेलमधून मिळतो. तुम्हीही रेड-ब्राउन रंगाशी साधर्म्य साधणारे ब्लडी मेरीसारखे ड्रिंक पिऊ शकता. सध्या ब्लडी मॅरी, पिनाकोलाडा, ग्रास हुपर, मोहितो, मॅनहेटन, मार्टिनी, कुकुंबर कूलर अशी काही मॉकटेल्स लोकप्रिय आहेत. त्यांच्या रंगसंगतीमुळे आज मॉकटेल्स तरुणाईला जास्त जवळची वाटत आहेत.

घरीही ट्राय कराच!
हॉटेलमध्येच जाऊन मॉकटेल प्यायला पाहिजे असे नाही, तर ते घरीही करता येऊ शकतात. याविषयी शेफ प्रसाद कुलकर्णी म्हणाला की, ब्लडी मेरीमध्ये टॉमेटो ज्यूस, रेडपेपर सॉस, वूस्टरशायर सॉस, लिंबू, मीठ, मिरेपूड हे लागते. शेकरमध्ये हे सगळे मिक्स करायचे आणि रोलीपोली या खास त्याच्यासाठी असलेल्या ग्लासमधून सर्व करायचे. पिनाकोलाडा करताना मिक्सरमधे बर्फ, पाइनअ‍ॅपल ज्यूस, पाइनअ‍ॅपलचे तुकडे, क्रीम, नारळाचे दूध, साखर किंवा शुगर सीरप हे सगळे एकत्र करायचे की झाले तयार. असे अनेक प्रकार करता येऊ शकतात.

Web Title: Mockingtail as a great choice for the young fancy colorful Mocklets, Cocktail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.