लोकोत्सव गावांमध्ये न्यावा! - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 09:59 PM2018-01-12T21:59:49+5:302018-01-12T21:59:59+5:30
ग्रामीण लोककलेचा खरा आविष्कार असलेला हा ‘लोकोत्सव’ आगामी काळात राज्यातील ग्रामीण जनतेला पाहता यावा याकरिता तो गावपातळीवर न्यावा, असा सल्ला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आयोजकांना दिला.
पणजी : ग्रामीण लोककलेचा खरा आविष्कार असलेला हा ‘लोकोत्सव’ आगामी काळात राज्यातील ग्रामीण जनतेला पाहता यावा याकरिता तो गावपातळीवर न्यावा, असा सल्ला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आयोजकांना दिला.
कला अकादमीच्या दर्यासंगमावर कला व संस्कृती संचालनालयातर्फे शुक्रवारी आयोजित 19 व्या ‘लोकोत्सवात’ ते प्रमुख पाहुणो म्हणून बोलत होते. या लोकोत्सवाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री र्पीकर विलंबाने उपस्थित राहिले. दरम्यान, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे मुख्य सचिव धर्मेद्र शर्मा, कला व संस्कृती संचालनालयाचे सचिव दौलत हवालदार, सुयश अस्थाना, शैलेश सिन्हा, सुरेंद्र नायक, नाबार्ड बँकेचे उस्माणी, राजश्री मुखर्जी, गोवा छायापत्रकार संघटनेचे अध्यक्ष गणोश शेटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या महोत्सवाचे उद्घाटन झाले.
गावडे म्हणाले की, लोकोत्सवामुळे देशातील विविध राज्यांतील प्रादेशिक भाषांबरबरोच तेथील संस्कृतीचे दर्शन एकाच व्यासपीठावर घडविले जाते. 1999 ला सुरुवात झालेल्या या महोत्सवात त्यावेळी केवळ 50 कलाकार होते, आता या महोत्सवाचे स्वरूप विस्तारले असून, त्यात 5क्क् कलाकार आणि हजारांवर कर्मचारी काम करीत आहेत. गोवा हे संस्कृतीसंपन्न राज्य आहे. पाश्चात्य आणि देशी संस्कृतीचा मिलाप असणारे देशातील एकमेव, असे गोवा राज्य आहे. या राज्यातील संस्कृती सातासमुद्रापलिकडे पोहोचविण्याचा कला व संस्कृती खात्याचा प्रयत्न आहे, असे सांगत गावडे यांनी या खात्याचवतीने राबविण्यात येणा:या उपक्रमांचा उहापोह केला.
दौलत हवालदार म्हणाले की, या लोकोत्सवाच्या माध्यमातून लुप्त होत चाललेल्या कला संवर्धनाचे काम केले जात आहे. अशा कला टिकून राहण्यासाठी समाजाचे पाठबळ गरजेचे आहे. राज्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव त्यानंतर सेरेंडिपीटी अशा उत्सवानंतर ख:या अर्थाने जो रंग भरला जातो तो ‘लोकोत्सव’ होय.
प्लास्टिकमुक्त महोत्सव !
मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी राज्य प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख करीत यावर्षीचा ‘लोकोत्सव’ही कला व संस्कृती खात्याने प्लास्टिकमुक्त पार पाडण्याचा संकल्प केल्याचे गावडे यांनी सांगितले. या प्लास्टिकमुक्तीला लोकांच्याबरोबरच महोत्सवातील स्टॉलधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘पूर्वरंगा’नंतर र्पीकरांचे आगमन
लोकोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर कलाकारांनी ‘पूर्वरंग’ सादर करून वातावरण संगीतमय करून टाकले. त्यानंतर ओडिशाच्या कलाकारांनी ‘गोटीपुआ’ हे नृत्य सादर केले, त्याचवेळी मुख्यमंत्री र्पीकर यांचे आगमन झाले. त्याचदरम्यान हा ‘लोकोत्सव’ गावपातळीवर न्यावा व तीन वर्षानी पुन्हा तो पणजीत आयोजित करावा, असा सल्ला र्पीकरांनी आयोजकांना दिला.