का होते ओठांची थरथर, लवलव?... प्रेम, बिम सगळं झूट, 'हे' आहे खरं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 12:24 PM2018-03-23T12:24:58+5:302018-03-23T12:24:58+5:30

‘तिच्या नाजूक ओठांची थरथर, हे वाक्य किती जणांनी वाचले आहे ...

if you think that being awake in night because of love??.. | का होते ओठांची थरथर, लवलव?... प्रेम, बिम सगळं झूट, 'हे' आहे खरं कारण!

का होते ओठांची थरथर, लवलव?... प्रेम, बिम सगळं झूट, 'हे' आहे खरं कारण!

googlenewsNext

- डॉ. नितीन पाटणकर (मधुमेहतज्ज्ञ)

एका व्याख्यानमालेत माझे भाषण होते. विषय होता ‘पोटॅशिअम - महत्त्वाचा क्षार.’ आयोजकांचा माझ्याबद्दल काय समज होता कोण जाणे, पण त्यांनी ‘आधीपासून नाव नोंदवा’ असा मेसेज केला होता अनेकांना. आधल्यादिवशी मंडळाच्या सेक्रेटरीचा फोन आला. तो सांगत होता की, ‘डॉक्टर फक्त नऊ लोकांनी कन्फर्म केलंय. काय करू या?’ मी म्हटले, ‘आज एक रिमाइंडर मेसेज पाठवा आणि त्यात लिहा की, कमी नोंदणी झाल्याने कार्यक्रमात बदल करण्यात येत आहे. आता विषय आहे ‘लवलवते ओठ’.’ कुणाचा विश्वास बसणार नाही; पण रात्रभरात १५० लोकांनी कन्फर्म केलेच; वर हॉलमध्ये शिरायला जागा नव्हती. बहुतेकांना वाटले असणार की, काहीतरी रसरशीत ऐकायला मिळणार. तिथे आलेल्या लोकांच्या वयावरून कळत होते की, ‘ना.सी. फडके, चंद्रकांत काकोडकर, हेरॉल्ड रॉबिन्स’ अशा विविध लेखकांचे वाचक हजर होते. मी त्यांच्यासमोर भाषण ठोकलेच.

‘तिच्या नाजूक ओठांची थरथर, हे वाक्य किती जणांनी वाचले आहे आणि त्यातून काय अर्थ काढायचा आणि पुढे काय करायचे, हे किती जणांना जाणून घ्यायचे आहे?’ हा प्रश्न विचारताच हॉलमधील यच्चयावत स्त्रीपुरुषांचे हात वर गेले. ‘हे चालतं वाटतं अध्यक्षांना आणि आमच्या पिंकीने सालसा ठेवू या का विचारलं तर नाही म्हणून नाराज केलं.’, अशी मोठ्ठ्याने केलेली कुजबूज ऐकू आली. मी पुढे सांगायला चालू केले, ‘ओठ लवलवण्याचे मुख्य कारण हे कॅफिनयुक्त पदार्थ जास्त घेणे, हे असते. यात कॉफी आणि अनेक शीतपेयांचा समावेश होतो. अ‍ॅन्क्साइटी हे दुसरे मुख्य कारण. स्ट्रेस आणि थकवा हेही या ओठांची लवलव होण्यासाठी जबाबदार असतात. बरे ओठांची लवलव ही वरच्या ओठाची, खालच्या ओठाची अशी स्वतंत्र असते, कारण यांना होणारा नर्व्ह सप्लाय हा वेगवेगळा असतो.
तेव्हा ओठांची लवलव दिसली तर तो क्षण हा प्रेम व्यक्त करण्याचा नसून प्रश्न विचारण्याचा असतो. 

छातीत धडधड, हातापायांना कंप, रात्ररात्र झोप न येणे ही पण लक्षणे सोबत असतील आणि ही सर्व प्रेमाची निशाणी वगैरे असेल तरी पुढे विचारायला हवे की, लघवीला जास्त होते का? जुलाब होत आहेत का? हे विचारून झाले आणि होणारी प्रेयसी किंवा प्रियकर चिडला तर अपराधीपणा वाटून न घेता हे कॉफी जास्त झाल्याचे लक्षण समजून चालावे. याबरोबरीने पोटॅशिअम कमी होणे, थायरॉइड किंवा इतर हॉर्मोन कमी पडणे, पार्किन्सन्स डिसीज इत्यादी कारणांमुळे ओठांची लवलव होऊ शकते.
हे सर्व तपासून पाहायला सांगितल्यानंतरही टिकले तर ते खरे प्रेम!’

Web Title: if you think that being awake in night because of love??..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.