गुडघा प्रत्यारोपण आता अधिक सोपे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 11:56 PM2018-09-16T23:56:18+5:302018-09-16T23:57:06+5:30
संधिवातग्रस्त गुडघ्याचा केवळ खराब कप्पा बदलून रुग्णांना अधिक नैसर्गिकरीत्या हालचाल करणे शक्य करणारी युनिकोंडायलर अर्थात पार्शल नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया आहे.
- डॉ. पवन कोहली
संधिवातग्रस्त गुडघ्याचा केवळ खराब कप्पा बदलून रुग्णांना अधिक नैसर्गिकरीत्या हालचाल करणे शक्य करणारी युनिकोंडायलर अर्थात पार्शल नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया आहे.
वयोमानापरत्वे संधीवातामुळे गुडघेदुखी जडलेल्या प्रत्येक व्यक्तीस संपूर्ण गुडघा बदलाची (टोटल नी रिप्लेसमेंट) गरज नसते. बहुसंख्य रुग्णांच्या गुडघ्यातील केवळ एकच कप्पा खराब झालेला असतो आणि तो युनिकोंडायलर शस्त्रक्रियेने बदलता येतो. गुडघ्याच्या आजूबाजूचे स्नायू व लिगामेंटसना धक्का न लावता ही शस्त्रक्रिया करता येते. भारतीय जीवनशैलीत मांडी घालून बसण्यासारख्या हालचालींना महत्त्व असून युनिकोंडायलर शस्त्रक्रियेमुळे रुग्णांना अधिक नैसर्गिक हालचाली करता येतात. अगदी व्यायाम करणे, सायकल चालवणे, ट्रेकिंग, पोहणे अशा हालचालीही व्यक्ती करू शकते. शस्त्रक्रियेनंतर एक दिवसाने रुग्ण घरीही जाऊ शकतो. एका दिवसात पार्शल आणि टोटल नी रिप्लेसमेंटची तुलना करता पार्शल नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेसाठी जवळपास २५ ते ३० टक्क्यांनी कमी खर्च येतो. महत्त्वाचे म्हणजे, युनिकोंडायलर शस्त्रक्रियेतील गुडघ्याचा बदललेला सांधा जवळपास २० वर्षे टिकू शकतो.
(लेखक गुडघारोपण तज्ज्ञ)