प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर चिंतेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 12:03 AM2018-09-17T00:03:06+5:302018-09-17T00:04:29+5:30

स्टेट ग्रंथीचा कॅन्सर हा पुरुषामध्ये सर्वांत जास्त प्रमाणात होणारा कॅन्सर आहे.

The subject of cancer related to prostate gland | प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर चिंतेचा विषय

प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर चिंतेचा विषय

googlenewsNext

- डॉ. आशिष पोखरकर

स्टेट ग्रंथीचा कॅन्सर हा पुरुषामध्ये सर्वांत जास्त प्रमाणात होणारा कॅन्सर आहे. वयाच्या पन्नाशीनंतर साधारणपणे होणाऱ्या या कॅन्सरबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकतेचा अभाव आहे. या लेखामध्ये आपण प्रोस्टेट कॅन्सर त्याची कारणे, लक्षणे व उपचार यांचा थोडक्यात परामर्श घेऊया.

प्रोस्टेट ग्रंथी ही मूत्राशयाच्या खालच्या भागात स्थित असून, तिचे मुख्य कार्य हे वीर्यनिर्मितीचे असते. वाढत्या वयानुसार प्रोस्टेट ग्रंथीच्या आकारमानात वाढ होत जाते. ज्याला आपण बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लासिया म्हणतो. प्रोस्टेट कॅन्सरमध्ये प्रोस्टेट ग्रंथीच्या पेशीमधील (डीएनए) गुणसूत्रांमध्ये बिघाड होऊन पेशीची अनियंत्रित वाढ होते. या वाढीतून निर्माण होणाºया गाठीला आपण प्रोस्टेट कॅन्सर म्हणतो. या पेशी रक्तातून शरीराच्या अन्य भागात पसरतात. उदा. मणक्याची हाडे, यकृत.
प्रोस्टेट कॅन्सरचे निदान व उपचार
१) डिजिटल रिटल एक्झामिनेशन : ही एक सामान्य तपासणी असून यामध्ये डॉक्टर गुदद्वारामध्ये बोटाने प्रोस्टेटची तपासणी करतात. यात प्रोस्टेटचा आकार, अनियमितता याची तपासणी केली जाते.
२) प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन : हे प्रोस्टेट ग्रंथीमध्ये तयार होणारे प्रोटीन असून, प्रोस्टेट कॅन्सरमध्ये याचे प्रमाण वाढते.
३) प्रोस्टेट बायोस्पी : यामध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा छोटा तुकडा काढून तपासणीसाठी पॅथोलॉजिस्टकडे पाठवतात. या तपासणीद्वारे प्रोस्टेट कॅन्सरचे १००% निदान होते.
४) सिटी स्कॅन, एमआरआय, बोन स्कॅन या तपासण्या आवश्यकतेनुसार डॉक्टर करतात.
प्रोस्टेट कॅन्सरवरील उपचार
१) प्राथमिक अवस्थेतील प्रोस्टेट कॅन्सर हा पूर्णपणे बरा होतो. यामध्ये शस्त्रक्रिया करून प्रोस्टेट ग्रंथी पूर्णपणे काढली जाते. हे शस्त्रक्रिया मुख्यत: दुर्बिणीद्वारे व आजकाल रोबोटिक सर्जरीद्वारे केली जाते.
२) रेडिएशन : यामध्ये क्ष-किरणांद्वारे प्रोस्टेट ग्रंथीवर उपचार केले जातात व कॅन्सर पेशी नष्ट केल्या जातात.
३) हार्मोन थेरेपी : या उपचार पद्धतीमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनचे प्रमाण शरीरामध्ये पूर्णपणे कमी केले जाते व कॅन्सरवर नियंत्रण आणले जाते, ही थेरेपी मुख्यत्वे चौथ्या स्टेजमधल्या कॅन्सर पेशंटसाठी दिली जाते.
४) केमोथेरेपी : शरीरामध्ये पसरलेल्या कॅन्सरसाठी केमोथेरेपीचे उपचार केले जातात.
(लेखक कन्सल्टंट कॅन्सर सर्जन आहेत.)

प्रोस्टेटची लक्षणे
ही लक्षणे वेगवेगळ्या पुरुषांत वेगवेगळी असू शकतात. सर्वसामान्यपणे पुरुषांमध्ये आढळणारी लक्षणे खालीलप्रमाणे
च्वारंवार लघवीला जावे लागणे
च्लघवीची धार खूप बारीक असणे
च्लघवी मध्येच थांबणे
च्लघवीला जोर लावावा लागणे
च्लघवीतून रक्त जाणे.
च्पाठ, खुब्यामध्ये दुखणे
च्काही पुरुषांमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नाहीत.

प्रोस्टेट कॅन्सरची कारणे
प्रोस्टेट कॅन्सर होण्याची कारणे ही अजूनही पूर्णपणे स्पष्ट नाहीत. परंतु खालील कारणे प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता वाढवतात
वृद्धावस्था : वयोमानानुसार प्रोस्टेट कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढते.
आनुवांशिकता : कुटुंबामध्ये कोणाला प्रोस्टेट कॅन्सर अथवा स्तनांचा कॅन्सर झाला असल्यास प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
स्थूलत्व : पुरुषांमध्ये असणारा स्थूलपणा हासुद्धा काही प्रमाणात प्रोस्टेट कॅन्सरला कारणीभूत आहे.
प्रोस्टेट कॅन्सरपासून बचाव
स्वस्थ आहार : जास्त प्रमाणात फळे व पालेभाज्या खाणे. विटामिन व खनिजयुक्त आहार आपणास पूर्णपणे कॅन्सरपासून वाचवू शकतो का, हे अजूनही पूर्णपणे सिद्ध झाले नसले तरी योग्य आहार आपली शारीरिक स्थिती नक्कीच सुधारून कॅन्सरसारख्या आजारापासून वाचवते.
योग्य व्यायाम : संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, व्यायाम करणाºया पुरुषांमध्ये पीएसएचे प्रमाण कमी राहते. नियंत्रित योग्य वजन आपणास प्रोस्टेटच नव्हे, तर अनेक प्रकारच्या कॅन्सरपासून वाचवते.

Web Title: The subject of cancer related to prostate gland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.