बदली आदेश न पाळणाऱ्या इतर कर्मचाºयांचा नंबर केव्हा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 12:36 PM2018-07-01T12:36:56+5:302018-07-01T12:39:29+5:30
-हितेंद्र काळुंखे
जिल्हा परिषदेमध्ये काही मर्जीतील कर्मचारी आणि अधिकाºयांकडून बदली आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. जवळपास वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा काही कर्मचारी हे आपल्या खुर्चीला चिकटून आहेत. बदलीच्या ठिकाणी जाण्यास तयार नसून त्यांच्यावर वरिष्ठांची खास मर्जी असल्यानेच या कर्मचाºयांना फावले आहे. असे असताना या प्रकाराकडे लक्ष देण्यास संबंधित कोणीही तयार नाहीत.
कामे रखडली आहेत.. या कामांची ‘त्यांना’ च माहिती आहे. आधीच कर्मचारी कमी आहेत... अशी अनेक कारणे देत या ‘खास’ कर्मचाºयांना विभागाचे अधिकारीच सोडत नाहीत. बदली झाल्यावरही अधिकारी कार्यमुक्त करत नसलीत तर मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या आदेशाला अर्थच उरत नाही.
अशाच एका ‘खास’ कर्मचाºयाचा एक किस्सा दोनच दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत चांगलचा गाजला. बांधकाम विभागातील वरिष्ठ सहाय्यक सी. एस.पाटील यांची सुमारे ४ महिन्यांपूर्वी कृषी विभागात बदली झाली असतानाही पाटील यांना या विभागातून कामांच्या अडचणीचे कारण दाखवत कार्यमुक्त केले नव्हते. जि.प. अध्यक्ष व सदस्यांनी तक्रारी केल्यानंतर हे प्रकरण वृत्तपत्रांमध्येही झळकले. यानंतर मात्र लगेचच या कर्मचाºयास कार्यमुक्त करण्यात आले.
या आधी या कर्मचाºयास कार्यमुक्त करण्यास अडचण होती.. या कर्मचाºयास पर्याय नव्हता... मात्र ‘ओरड’ झाल्यावर तातडीने कार्यवाही झाली. ओरडच झाली नसती तर हा कर्मचारी आणखी बरेच दिवस याच ठिकाणी राहिला असता. असेच काही कर्मचारी हे अधिकाºयांच्या अशिर्वादाने बदली झाल्यावरही अनेक महिन्यापासून आहे, त्याच ठिकाणी आहेत. ते बदलीच्या ठिकाणी जाण्यास नाखुष आहेत. यामुळे अजूनही काही कर्मचारी सी. एस. पाटील यांच्याप्रमाणे आहेत तेथेच ठाण मांडून आहेत. अशा सर्व कर्मचाºयांची बदलीच्या जागी पाठविणे गरजेचे आहे. यासाठी स्वत: मुख्याधिकारी यांनी बदली आदेशाचा आढावा घेणे गरजेचे आहे. अन्यथा बदली आदेशच काढू नयेत, असेही अन्य सर्वसामान्य कर्मचाºयांकडून बोलले जात आहे.