कॉ संपत देसाई ----साहित्यभान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 01:06 AM2018-08-30T01:06:49+5:302018-08-30T01:07:35+5:30

Co Sampat Desai ---- Sahitya Bhan | कॉ संपत देसाई ----साहित्यभान

कॉ संपत देसाई ----साहित्यभान

googlenewsNext

-प्रा. रणधीर देसाई
जागतिकीकरणाच्या काळात सर्वहारा वंचितांचे संघर्ष लढे मंदावले आहेत. नवभांडवली अवस्थेत त्यांचे आवाजच नाहीसे करून टाकले जात आहेत. सामान्यांच्या अस्तित्वालाच या काळाने बेदखल केले आहे. अशा काळात काही एक ध्येयाने व अंतरिक ऊर्जेने धडपडणारी काही मंडळी एखाद-दुसऱ्या कोपºयात दिसतात. त्यापैकीच कॉ. संपत देसाई हे एक होत. श्रमिक मुक्ती दलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते असणारे देसाई गेल्या बावीस वर्षांहून अधिक काळ कष्टकºयांच्या चळवळीत सक्रिय आहेत. त्यांच्या सहकाºयांसह ते पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील धरणग्रस्तांचे संघटन करत आहेत. चित्री प्रकल्पाचा यशस्वी लढा त्यांच्या नेतृत्वाखाली झाला.
अनेकदा लोकलढ्यात आणि सांस्कृतिक कार्यक्रमांत ते हसतमुख चेहºयाने आघाडीवर दिसतात. त्यांचा तरुणांशी विशेष संवाद जुळतो. अंगी कार्यकर्तेपण पुरेपूर भिनलेले. देहबोलीत विश्वासक अस्वस्थता. आपल्याकडे एकेरी सामाजिक संघर्ष हा फारसा सफळ ठरत नाही याचे त्यांना नेहमी भान असावे, त्यामुळेच या संघर्षाला ते नेहमी संवादाची साथ देत आले आहेत. बोलत राहणं आणि आपल्या भूमिकांवर ठाम राहून मार्ग काढत राहणं यावर त्यांचा विश्वास असावा. एखाद्या डोंगरवस्तीवरील डंगे धनगराशी ते जेवढ्या आत्मियतेने बोलतात तेवढ्याच सहजतेने कॉलेज तरुणांशी वा अभ्यासकांशीही जिव्हाळ्याचा संवाद साधतात. अलीकडेच मुंबईच्या शब्द पब्लिकेशनने त्यांचे ‘एका लोकलढ्याची यशोगाथा’ हे धरणग्रस्तांच्या चळवळीवरील पुस्तक प्रसिद्ध केले आहे. सर्वधर्मसमभावाच्या आग्रही भूमिकेमुळे त्यांना कडव्या हिंदुत्ववाद्यांच्या धमकीलाही सामोरे जावे लागले आहे.
आधुनिकीकरणाने जशा विधायक गोष्टी पुढे आल्या तशाच नकाराच्या काही बाजू पुढे आल्या. सामान्यांचे शोषण आणि बहुविध पर्यावरणाचे गुंतागुंतीचे ताण-तणाव या काळात आकाराला येत आहेत. विकास हवा आहे; परंतु कोणता विकास आणि कोणासाठी? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. विकासाच्या दुखºया ठणकांनी सामान्य माणूस हतबल आहे. माणूस विरुद्ध निसर्ग, शहरे विरुद्ध खेडी आणि जंगलवस्त्या असे पराकोटीचे संघर्ष आकाराला येत आहेत. विकासाच्या नावाखाली दुसरेच काही घडविले जात आहे. धरणे हवी आहेत; पंरतु धरणाच्या नावाखाली विस्थापितांचे अमानवी शोषण त्यांच्याच भूमीवर होत आहे. या संघर्षाची गाथा देसाई यांनी या ग्रंथात मांडली आहे. आजरा परिसरात धरण उभे राहते आणि रायवाडा, अवंडी, गावठाणवाडी ही तीन छोटी गावे आणि त्यांचे धनगरवाडे उद्ध्वस्त होतात. या विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी श्रमिक मुक्ती दलाने जो संघर्ष लढा उभा केला त्याची कहाणी या पुस्तकातून शब्दबद्ध केली आहे. शून्यातून उभ्या राहिलेल्या या सामूहिक चळवळीचे यशस्वी लढ्यात रूपांतर होते. एकाबाजूला विकासाची अपरिहायर्ता तसेच शासन व प्रशासनाच्या मुजोरवृत्तीचा सामना करत उभी राहिलेली संघर्षकथा या ग्रंथात शब्दबद्ध केली आहे. मुळांपासून तुटलेपणाचा आणि विस्थापितांचा शाप घेऊन जगणाºयांच्या या शोषण समूहकथा आहेत. याबरोबरच आरोग्य चळवळीपासून ते सांस्कृतिक, वैचारिक चळवळीतील त्यांच्या सहभागाचे चित्रण आहे. हे लेखन केवळ चळवळीचे माहितीस्वरूप सांगणारे नाही, तर त्यास अनेक परिमाणे आहेत. हा वंचितांच्या लढाईचा इतिहास आहे. तसेच या चळवळीचा इतिहास सांगत असताना आजरा, आंबोली तेथील लोकजीवन व तेथील बहुविध जैवविविधतेचे अत्यंत समरसून चित्रण केले आहे. झाडा पाना-फुलांपासून पाऊसमान, शेती, डोंगरदºयांची, धनगरवाड्यांची व लोकव्यवहाराची सजीव चित्रे रेखाटली आहेत तसेच स्थानिक इतिहासही त्यात नोंदविला आहे. आजरा परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, जातीय ठेवण-घडणीविषयी आलेली माहिती फार महत्त्वाची आहे. ब्राह्मणी संस्थांनी गाव, पोतुर्गीज ख्रिश्चन, लिंगायत, मुस्लिम, कष्टकरी बहुजन अशा बहुजिनसी समाजजीवनाचा आलेला आलेख स्थानिक इतिहासावर वेगळा प्रकाश टाकतो. प्रदेशसमाज कसा आकाराला येतो, याची वेगळी अशी ही माहिती आहे. लोकपरंपरा, भाषा, जीवनरहाटी, लोकाविष्कारातून वाहत आलेल्या जीवनाची माहिती वैशिष्ट्यपूर्ण आहे. उदार सहिष्णुतावादी दृष्टिकोनाचा त्यांच्या भाषेवर प्रभाव आहे. मानवतावादी दृष्टीने आकाराला आलेले हे ओघवते प्रवाही गद्यरूप आहे. वंचितांचे लढे विरत असताना आणि त्याविषयीचा आस्थाभाव आटत असताना अशी कहाणी समाजाला नेहमीच प्रेरक ठरेल.

(लेखक शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्राध्यापक आहेत.)
kollokmatpratisad@gmail.com

Web Title: Co Sampat Desai ---- Sahitya Bhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.