‘श्रवणमित्र’- जडणघडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 08:23 PM2018-08-29T20:23:58+5:302018-08-29T20:26:58+5:30

मागील दोन-तीन लेखांपासून आपण श्रवणयंत्रासाठी ‘श्रवणमित्र’ हा शब्द वापरत आहोत.

'Shravan Mitra' - Jadnaghadan | ‘श्रवणमित्र’- जडणघडण

‘श्रवणमित्र’- जडणघडण

googlenewsNext

डॉ. शिल्पा हुजुरबाजार

मागील दोन-तीन लेखांपासून आपण श्रवणयंत्रासाठी ‘श्रवणमित्र’ हा शब्द वापरत आहोत. आजच्या भागात आपण हा आपला ‘श्रवण मित्र’ आपल्याला नीट ऐकू येण्यासाठी काय काय क्लृप्त्या करतो, त्याच्या अंगी काय आणि किती गुण आहेत व ते कसे निवडायचे, यांची माहिती देणार आहोत.
आपण आजपर्यंत चार प्रकारचे दोष पाहिले; पण प्रत्येक दोषाचे कारण भिन्न असू शकते व त्या कारणानुसार कानात होणारी झीज भिन्न असू शकते. जसे ध्वनी प्रदूषणामुळे पेशी निकामी होणे आणि वयपरत्वे निकामी होणे यात खूप फरक आहे. जन्मजात कर्णबधिरत्व व इतर कारणांमुळे पुढे येणारे कर्णबधिरत्व ही जरी वरकरणी कायमस्वरूपी दोष दाखवत असली तरी पूर्णत: भिन्न आहेत.
आपण जेव्हा आवाज ऐकतो व आपण जेव्हा संभाषण ऐकतो तेव्हा आपण ऐकण्याचीच क्रिया करीत असतो; पण पहिल्या स्थितीत आवाजाची जाणीव मध्य मेंदूपर्यंत सिमित असते.
जर पार्श्वभूमीचा आवाज जास्त अथवा मोठा असेल. उदा. बाजारात असणारी कलकल अथवा मोठ्या यंत्राचा आवाज असेल, तर एकाग्रतेसोबत निरीक्षण शक्तीचा वापर करून अर्धवट ऐकलेल्या शब्दांचा आजूबाजूच्या शब्दांवरून अर्थबोध करून घेणे, असे अनेक बदल मेंदू आपल्या न कळत करीत असतो आणि म्हणूनच आपण विनासायास ऐकत असतो.
आता जेव्हा ही प्रक्रिया बिघडते तेव्हा आपण श्रवणमित्राची मदत घेतो.
ज्या व्यक्तीला श्रवणदोष आहे. त्याची या मित्रांकडून साधी सरळ अपेक्षा असते की, मला समोरच्या माणसाचे बोलणे ऐकू येत नाही तेवढे ऐकू यावे; पण इतर आवाज ऐकू येऊ नये; पण वरील मेंदूतील घडामोडींचा विचार केला तर या छोट्या मित्राकडून आपण खूप जास्त अपेक्षा ठेवत आहोत, असे लक्षात येईल.
जेव्हा श्रवणयंत्राचा शोध लागला तेव्हा हेच सूत्र वापरले जात होते की, किती आवाज कमी येतो तेवढा वाढवून दिला की काम झाले; पण जसा जसा ‘श्रवणमित्र’ वापरणारा वर्ग वाढत गेला तसा तसा त्यांचा अनुभव, गरजा, अडचणी या सगळ्यांवरील संशोधन पण वाढत गेले. गेल्या दशकांत मात्र नॅनो टेक्नॉलॉजीच्या प्रगतीमुळे याही क्षेत्रात क्रांती झाली व खूप नवनवीन शोध वापरून ‘श्रवणमित्रा’चे कार्य सुलभ करण्याचे प्रयत्न झाले.
आपण सध्या उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती घेऊया.
श्रवणयंत्रातून वाढविला जाणारा गोंगाट ही एक गंभीर समस्या होती. त्यासाठी सध्या गोंगाट ओळखून त्या लहरी कमी वाढविण्याचे तंत्र विकसित झाले आहे. यात एक स्रोत कमी करणे ते अनेक स्रोत कमी करणे असे अनेक प्रकार आहेत. श्रवणदोष असणारी व्यक्ती कोणत्या परिस्थितीत राहते आहे. आजूबाजूला किती गोंगाट आहे, हे बघून या तंत्राची निवड करण्यात येते. याबरोबरीने वाऱ्याचा आवाज कमी करणारे तंत्रज्ञानही उपलब्ध आहे.
‘श्रवणमित्र’ घातलेली व्यक्ती जवळ बसली असेल तर काहीवेळा त्याच्या हालचालींमुळे कानातील आवाज बाहेर पडून कुई असा आवाज ऐकू येतो. नवीन तंत्रज्ञानामुळे श्रवणमित्र हा आवाज बाहेर पडू नये व आलाच तर तो लगेच बंद व्हावा यासाठी सुसज्ज आहे. काहीवेळा श्रवणालेख बघताच लक्षात येते की, काही ध्वनिलहरी ह्या अजिबातच ऐकू येत नाही आहेत, तर काही लहरींना ऐकणे बºयापैकी शिल्लक आहे. या समस्येला तोंड द्यायला श्रवणमित्रामध्ये दोन सुविधा असतात. एक म्हणजे ऐकू येणाºया लहरी अजून ठळक करण्याचे ज्यामुळे मिळणारी अपुरी माहिती अजून सुस्पष्ट व्हावी व दुसरी न ऐकू येणाºया लहरींमधून मिळणारी माहिती ऐकू येणाºया लहरींमध्ये रूपांतरित करण्याची.
या दोन्ही तंत्रज्ञानाचा फायदा जन्मजात कर्णबधिरत्व असणाºया मुलांना भाषा वाढीच्या टप्प्यात खूप सुंदररीत्या होताना दिसतो. तसेच ज्यांचा दोष गंभीर अथवा अती गंभीर स्वरूपाचा आहे अशांना देखील हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरलेले आहे. याव्यतिरिक्त वाढलेल्या आवाजामुळे बºयाचदा दचकायला होते किंवा खूप मोठे आवाज अजून मोठे झाल्याने त्रास होतो. यासाठीही आवाज मृदता हे तंत्र वापरण्यात येते.
तसेच एखाद्या व्यक्तीस लहान आवाज, मध्यम आवाज व मोठे आवाज त्याच्या स्वत:च्या आवडीप्रमाणे कमी-जास्त करण्याची मुभा आधुनिक तंत्रज्ञानामुळे श्रवणमित्रांमध्ये उपलब्ध आहेत. वर नमूद केलेले सर्व तंत्रज्ञान हे आम्ही श्रवणतज्ज्ञ संगणकाद्वारे श्रवणमित्रांमध्ये साठवू शकतो. तसेच हा छोटा मित्र एकूण किती वेळ त्याचा वापर झाला, कोणकोणत्या लहरींचे आवाज, किती तीव्रतेचे आवाज त्या व्यक्तीने ऐकले याची माहिती आम्हा श्रवणतज्ज्ञांना देत असतो. त्यामुळे सखोल जुळवणी सहज शक्य झाली आहे. तर असा आहे हा आपला छोटा ‘श्रवणमित्र’ याची मूर्ती लहान असली तरी कार्य मात्र महान आहे.

(लेखिका वाचा, भाषा व श्रवणतज्ज्ञ आहेत.)
kollokmatpratisad@gmail.com

Web Title: 'Shravan Mitra' - Jadnaghadan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.