अजित नरदे - साखर उद्योगावरील गाढा अभ्यासक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 12:40 PM2020-02-04T12:40:44+5:302020-02-04T13:01:22+5:30
शेतकरी चळवळीतील माझे ज्येष्ठ सहकारी तसेच साखर डायरीचे संपादक अजित नरदे यांचे सकाळी निधन झाले. काल रात्रीच कोल्हापूर येथील रूग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलो होतो. आज सकाळी ही बातमी कळाल्यानंतर कालची भेट ही अखेरची भेट ठरेल असं वाटले नव्हते.
शेतकरी चळवळीतील माझे ज्येष्ठ सहकारी तसेच साखर डायरीचे संपादक अजित नरदे यांचे सकाळी निधन झाले. काल रात्रीच कोल्हापूर येथील रूग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलो होतो. आज सकाळी ही बातमी कळाल्यानंतर कालची भेट ही अखेरची भेट ठरेल असं वाटले नव्हते.
३० ते ३२ वर्षापूर्वी स्व. शरद जोशी यांच्या शेतकरी चळवळीत जिल्हासंपर्क प्रमुख या पदावर काम करत असताना माझी त्यांच्याशी भेट झाली. चळवळीमध्ये मी हिरारीने सहभागी घ्यावा, अन्यायाविरूध्द वाचा फोडावी, यासाठी त्यांनी मला चळवळीमध्ये सातत्याने मार्गदर्शन केले.
अजित नरदे यांनी खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थन करत जी. एम. तंत्रज्ञानाचा वापर करावा, शेती क्षेत्रातील खुल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी त्यांनी आपली मते परखडपणे मांडली.
कै. शरद जोशींच्या यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी चळवळीत कार्यरत असताना त्यांचा साखर उद्योगावरील गाढा अभ्यास वाखाण्याजागा होता. त्यांची साखर डायरीत अतिशय प्रसिध्द आहे. या डायरीच्या माध्यमातून राज्यातील संपूर्ण साखर कारखानदारीचा लेखाजोखा त्यांनी संग्रहीत केला होता. आजही साखर डायरीतील संग्रहाचा या उद्योगाला मार्गदर्शन होत आहे.
साखर उद्योगातील नेमक्या दुखण्यावर बोट ठेवत आपल्या लिखाणातून त्यांनी स्पष्टपणे वेळोवेळी प्रहार केला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळायचे असेल तर कारखानदारीवर वचक ठेवले पाहिजे. अवास्तव मागणी त्यांना कधीच पटत नव्हती. जेवढे मिळतयं तेवढं घ्यायचं, मात्र हे करत असताना शेतकऱ्यांवर अन्याय कधी होऊ नये, यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असायचे. त्यांच्या अभ्यासू लिखाणामुळे साखर उद्योगातील प्रश्न समोर आली गेली.
शेतकऱ्यांची बाजारपेठ ही ठराविक व्यापाऱ्यांची मक्तेदारी अडकलेली आहे. ही मक्तेदारी मोडीत काढायची असेल तर खुली अर्थव्यवस्था निवडली गेली पाहिजे. त्यासाठी कै. जोशी सरांनी मांडलेल्या खुल्या अर्थव्यवस्थेचे वेळोवेळी समर्थन केले आहे.
जी.एम. तंत्रज्ञानामुळे शेती उद्योगाला चालना मिळेल, जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पट होईल, तसेच याचा लाभ शेतकऱ्यांना होईल, या उदात्त हेतूने त्यांनी जी.एम. बियाण्यांचं त्यांनी समर्थन केले होते. यासाठी त्यांनी अनेक परदेश दौरे केले होते. त्यांच्या या अकाली निधनाने शेतकरी चळवळीमध्ये कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे.
- राजू शेट्टी
संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना