अनंत दीक्षित-आता फक्त आठवणी.... !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 04:12 PM2020-03-12T16:12:51+5:302020-03-12T16:14:39+5:30

आठवणींचा एक सोनेरी कोपरा निखळून पडला!! अनंतरावांची आणि माझी गाठ प्रथम पडली ११ मार्च २००० रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात. संगीतकार नौशाद यांचा सत्कार गंगुबाई हनगल यांच्या हस्ते झाला तेव्हा. मध्यंतरात मी नौशादांना भेटून माझ्या संग्रहाबद्दल सांगून घरी येण्याची विनंती केली. ते फक्त हसले. पण, माझा पूर्वपरिचय नसताना अनंतरावांनी माझा हात धरला व ‘मी बघतो’ असं आश्वासन दिलं.

Now just the memories ....! | अनंत दीक्षित-आता फक्त आठवणी.... !

अनंत दीक्षित-आता फक्त आठवणी.... !

Next
ठळक मुद्देअनंत दीक्षित-आता फक्त आठवणी.... !एक सोनेरी कोपरा निखळून पडला

नंतराव दीक्षित गेले! आठवणींचा एक सोनेरी कोपरा निखळून पडला!! अनंतरावांची आणि माझी गाठ प्रथम पडली ११ मार्च २००० रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात. संगीतकार नौशाद यांचा सत्कार गंगुबाई हनगल यांच्या हस्ते झाला तेव्हा. मध्यंतरात मी नौशादांना भेटून माझ्या संग्रहाबद्दल सांगून घरी येण्याची विनंती केली. ते फक्त हसले. पण, माझा पूर्वपरिचय नसताना अनंतरावांनी माझा हात धरला व ‘मी बघतो’ असं आश्वासन दिलं.

दुसरे दिवशी १२ मार्च २००० रोजी खरोखरंच अनंतराव नौशादांना घेऊन आमच्याकडे आले. अनंतरावांनी विचारलं, फोटोग्राफरला बोलावलं आहे ना? पण, आम्हाला ते सुचलंच नव्हतं, इतके आम्ही भांबावून गेलो होतो. दीक्षितांनी मोबाईलवरून फोन करायचा प्रयत्न केला. पण, रविवार असल्यानं फोटोग्राफर उपलब्ध नव्हता. तेव्हा त्यांनी विचारलं, ‘घरात कॅमेरा आहे का? माझ्या मुलाने... धनंजयने... आतून कोडॅकचा बॉक्स कॅमेरा आणला. त्यात रोल होता व सुदैवाने पंधरा फोटोंची फिल्म शिल्लक होती.

दीक्षित म्हणाले, ‘आणा इकडं, मी उत्तम फोटोग्राफर आहे बरं का ?’ आणि त्यांनी फोटो काढायला सुरुवात केली. एव्हढा मोठा माणूस! पण आमच्या घरातील खुर्च्या बाजूला करीत होता. फोटोंचा अ‍ॅँगल मिळावा म्हणून बूट, चप्पल्स बाजूला सारून कोपऱ्यात उभा राहत होता.

आमच्या आयुष्यातील एक दिवस त्यांनी सोन्याचा केला. आता फक्त आठवणी उरल्या. नुकतंच त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं होतं. ‘कोल्हापूरच्या आठवणी’ त्यांनी लिहून काढल्यात, असं म्हणाले होते. पण, त्यांच्या हयातीत त्या प्रसिद्ध होण्याचा योग नव्हता.

- प्रा. श्रीकृष्ण कालगांवकर
 

 

Web Title: Now just the memories ....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.